तहान लागल्यामुळे पाणी प्यावयासाठी कालव्याजवळ गेलेला वृद्ध शेतकरी तोल जाऊन कालव्यात पडल्याने वाहून गेला. शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे हा प्रकार घडला.
संभाजी बोंढारे (वय ७०) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. कालव्यात वाहून गेल्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत त्यांचा शोध घेतला जात होता. आखाडा बाळापूर बाजार समितीचे सभापती शेषराव बोंढारे यांचे ते वडील होत.
सकाळी घरातून बाहेर पडलेले संभाजी बोंढारे शेतावर पोहोचले कसे नाहीत, याचा शोध घेतला असता कालव्याच्या काठावर त्यांची चप्पल व काठी सापडली.
त्यावरून कालव्यात पडून ते वाहून गेल्याचा अंदाज बांधून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू झाले.