जोरदार वाऱ्यामुळे वीजवाहक तारा चिकटून मुख्य वीज वाहत तार तुटली व दुपारपासून शहराचा अध्र्या परिसराचा वीज पुरवठा खंडीत झाला. कर्मचाऱ्यांनी सलग ४ तास काम करून तो थेट सायंकाळी सव्वासात वाजता पूर्ववत केला.
कनिष्ठ अभियंता विशाल बोंदार्डे यांनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले. दुपारी २ च्या सुमाराच अर्बन फिडरचा वीज पुरवठा अचानक खंडीत झाला. तत्पुवी जोरदार वारे सुटले होते. त्यामुळे बुरूडगाव रस्त्यावरील दोन वीजवाहक तारा एकमेकींना चिकटल्या, त्याचा परिणाम म्हणून दौंड रस्त्यावर रेल्वे क्रॉसिंगजवळ मुख्य वीजवाहक तारच तुटली व खाली पडली.
ही तार ताण देऊन बसवावी लागते, त्यासाठी गाडी, कर्मचारी लागतात. त्यामुळे लगेचच बोंदार्डे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बरोबर घेऊन घटनास्थळी गेले. त्यांनी ट्रॅक्टरचा वापर करून सलग ३ तासांच्या प्रयत्नानंतर व्यवस्थित ताण देऊन तार बसवली. पुन्हा तासभर त्यांना सर्व तांत्रिक कामकाज करावे लागले. त्यानंतर सायंकाळी सव्वासात वाजता वीज पुरवठा पुर्ववत झाला.