News Flash

भरदिवसा सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने लांबविले

पड घालण्यास छतावर गेलेल्या महिलेच्या घरातून १ लाख ३९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. शहरातील पशुपतिनाथ नगर, कन्हेरीतांडा येथे हा प्रकार घडला.

| April 3, 2013 02:25 am

पड घालण्यास छतावर गेलेल्या महिलेच्या घरातून १ लाख ३९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. शहरातील पशुपतिनाथ नगर, कन्हेरीतांडा येथे हा प्रकार घडला.
आदर्श रेसिडेन्सीमध्ये वर्षां प्रताप गुणाले यांचे घर आहे. वर्षां गुणाले दुपारच्या सुमारास पापड घालण्यासाठी घराला कडीकोंडा लावून छतावर गेल्या होत्या. चोरटय़ांनी ही संधी साधून घरात प्रवेश केला व कपाटातील १ लाख ३९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेले.
खाली आल्यावर गुणाले यांना घर उघडे असल्याचे व कपाटातील दागिने लंपास केल्याचे आढळून आले. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:25 am

Web Title: robbery of 1 25 lakhs gold ornaments
टॅग : Gold Ornaments,Robbery
Next Stories
1 सामाजिकशास्त्र विद्या शाखेतील दुसऱ्या पदाकडे ९ वर्षे दुर्लक्ष!
2 ‘पाणी’ व ‘दुष्काळ’वर मराठवाडा करंडक स्पर्धा
3 चारा छावण्यांच्या देयकांसाठी मुंडे उपोषणाच्या पवित्र्यात
Just Now!
X