News Flash

शिरपूर वरवाडे नगर परिषद कर्मचारी संघटनेचा संप स्थगित

मुंबई येथे आयोजित बैठकीत नगरपालिका प्रशासन संचालकांनी बहुतेक मागण्या मान्य केल्याने शिरपूर वरवाडे नगर परिषद कर्मचारी संघटनेने सुरू केलेला संप बुधवारी स्थगित करण्यात आला.

| April 12, 2013 12:20 pm

मुंबई येथे आयोजित बैठकीत नगरपालिका प्रशासन संचालकांनी बहुतेक मागण्या मान्य केल्याने शिरपूर वरवाडे नगर परिषद कर्मचारी संघटनेने सुरू केलेला संप बुधवारी स्थगित करण्यात आला.
नगर परिषद कर्मचाऱ्यांनी आठ एप्रिलपासून बेमुदत संप सुरू केला होता. महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत पालिका प्रशासन संचालकांसमवेत झालेल्या बैठकीत मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत संचालकांकडून लेखी निवेदन करण्यात आले. त्यानुसार साहाय्यक अनुदानाची (महागाई भत्त्यासह) २९५ कोटी रुपये दोन दिवसांत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. २००८-०९ ते २०१२-१३ या वर्षांतील वाढीव साहाय्यक अनुदान १२३० कोटी रुपये २०१२-१३ या वर्षांत एप्रिल ते मार्च या कालावधीत प्रत्येक महिन्यात टप्प्याटप्याने वितरित करण्यात येणार आहेत. संवर्ग कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रस्ताव त्वरित शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतील. सफाई कर्मचाऱ्यांची घरे बांधणीसाठीचा स्वतंत्र आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येईल. एक एप्रिल २०१३ च्या बैठकीतील इतिवृत्तात नमूद केलेले प्रस्ताव विनाविलंब मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येतील. १० मार्च १९९३ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे शिरपूर वरवाडे नगर परिषद कर्मचारी संघटनेने संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 12:20 pm

Web Title: shirpur varwade municipal council employees strike deferred
टॅग : Demand,Strike
Next Stories
1 दुष्काळाच्या छायेत गुढीपाडवा
2 दिवस आंदोलनांचा
3 अवैधपणे मनोरे उभारणाऱ्या मोबाइल कंपन्यांविरोधात गुन्हा
Just Now!
X