येथील रामानंदनगर मध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरटय़ांनी घरातील १ लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याबाबत करवीर पोलीस ठाण्यामध्ये सुखदेव संतू दावणे यांनी फिर्याद दिली आहे. दावणे हे रविवारी संध्याकाळी कुटुंबीयांसोबत दवाखान्यात गेले होते. घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरटय़ांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप कटावणीने उचकटले. त्यांनी घरात प्रवेश करून दोन तोळ्याची सोनसाखळी, अध्र्या तोळ्याचे मंगळसूत्र, अध्र्या तोळ्याची बोरमाळ असा सुमारे १ लाख रूपये किमतीचा ऐवज लंपास केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 lakh stolen from break house
First published on: 11-06-2013 at 01:38 IST