राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अच्युत बडाख यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी केली आहे.
अच्युत बडाख हे मालुंजा बुद्रुकचे सरपंच असून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा कृषिभूषण तसेच आदर्श सरपंच पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
बडाख यांच्या निवडीबद्दल माजी आमदार भानुदास मुरकुटे, अशोक कारखान्याचे अध्यक्ष सुरेश गलांडे, उपाध्यक्ष माणिकराव शिंदे, इंद्रनाथ थोरात, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती सुनीता बनकर, उपसभापती कैलास कणसे, नगरसेविका भारती कांबळे, पक्षप्रतोद मंजुश्री मुरकुटे, निर्मला मुळे आदींनी अभिनंदन केले.