पुणे : लोकसभा निवडणुकीचा सर्वच राजकीय पक्षाकडून जोरदार प्रचार सुरू आहे. तर यंदाच्या वर्षी सर्वाधिक उन्ह असल्याने, मतदानाची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे आगामी निवडणुकीच्या टप्प्यात होणाऱ्या मतदानाची टक्केवारी वाढावी,यासाठी सर्वच राजकीय पक्षाचे प्रयत्न असणार आहेत.

पण निवडणुक आयोगाने यंदा प्रथमच ८५ पेक्षा जास्त वय असलेले नागरिक आणि ४० टक्कयांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या नागरीकांसाठी यावेळी प्रथमच लोकसभा निवडणुकीत घरुन मतदान करण्याची सुविधा दिली आहे.त्या पार्श्वभूमीवर माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच ८९ वय आणि मतदान केंद्रावर त्यांना जाणे शक्य नसल्याने त्या घरूनच मतदान करणार आहे.

हेही वाचा…आरटीई प्रवेश प्रक्रियेतील बदलास आता पुण्यातूनही आव्हान, न्यायालयात जनहित याचिका

यंदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांसह अपंग व्यक्तींना घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील करणार घरुन मतदान करणार आहेत. त्यासाठी आवश्यक १२ ड फॉर्म जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे. तर १३ मे या मतदान दिवसाच्या पूर्वसंध्येला १२ मे रोजी निवडणुक अधिकारी घरी जाऊन टपाली मतदानाप्रमाणे त्यांचे मतदान करुन घेणार आहेत. या मतदानाचे चित्रिकरण होणार असून त्यावेळी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी देखील स्थित राहणार आहेत.