तुमच्या संगणकात तुम्ही फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम वापरत असाल आणि ‘सेव्ह पासवर्ड इन धीस कम्प्युटर’ हा पर्याय जर तुम्ही स्वीकारला असेल तर सावधान.. तुमच्या संगणकातील ही माहिती हॅकर्स किंवा सायबर गुन्हेगारांच्या हातात मिळू शकते. तुमच्या संगणकात ‘बलादािबदी’ नावाचा व्हायरस शिरला असेल तर तुमच्या संगणकातील इतकेच काय तर तुम्ही संगणकाला पेन ड्राइव्ह जोडला तर त्यातील माहितीही गुन्हेगांरापर्यंत पोहोचवण्याचे काम हा व्हायरस करतो. देशात नुकताच ‘बलादािबदी’ नावाचा व्हायरस आढळून आला असून या व्हायरसमुळे आपल्या संगणकातील खासगी माहिती व्हायरस सोडणाऱ्या गुन्हेगारापर्यंत जाऊन पोहोचते, अशी माहिती ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम-इंडिया'(सीईआरटी-इन)ने प्रसिद्ध केली आहे. या माहितीमुळे सायबर क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मायक्रोसॉफ्टच्या िवडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर या व्हायरसचा सर्वाधिक धोका आहे.
हा व्हायरस पेनड्राइव्हच्या साह्याने पसरणारा असल्याची माहितीही ‘सीईआरटी-इन’ने दिली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून डाऊनलोिडग करत असताना हा व्हायरस संगणकाच्या प्रोग्रॅम फाइल्समध्ये शिरकाव करतो. एकदा त्याने शिरकाव केला की तो आपल्या संगणकातील सर्व माहिती चोरण्यास सुरुवात करतो. ती चोरत असताना तो फायरफॉक्स किंवा गुगल क्रोम या ब्राऊजरवर आपण सेव्ह केलेले पासवर्डही मिळवतो. व्हायरस शिरलेल्या संगणकाला पेन ड्राइव्ह लावल्यावर तो पेनड्राइव्हमधील माहिती तर चोरतोच शिवाय तो पेनड्राइव्हमध्येही शिरतो. यामुळे जर तो व्हायरस इफेक्टेड पेन ड्राइव्ह आपण दुसऱ्या संगणकाला लावला की तो व्हायरस त्या संगणकातही प्रवेश करतो, असा तपशील सीईआरटी-इनच्या तज्ज्ञांनी दिला आहे. हा व्हायरस संगणकात शिरला की तो आपल्यासोबत आणलेल्या इतर फाइल्सही संगणकात इतस्त: पसरवतो. यामुळे अनेकदा की-बोर्डची कळ दाबण्यात चुका होण्याचे प्रकारही होतात. म्हणजे हा व्हायरस की-बोर्डची यंत्रणा विस्कळीत करून टाकतो. अशा प्रकारे हा व्हायरस संगणकाच्या नियंत्रण प्रणालीत बाधा निर्माण करत असतो.
या व्हायरसपासून वाचण्यासाठी संगणकात कोणतीही फाइल डाऊनलोड करण्यापूर्वी ती स्कॅन करून मगच डाऊनलोड करावी. तसेच पेन ड्राइव्ह किंवा इतर कोणतेही बाहेरील उपकरण संगणकाला जोडले की तेही स्कॅन करावे आणि मग त्याचा वापर करणे योग्य ठरेल असेही सीईआरटी-इनतर्फे सांगण्यात आले आहे. असुरक्षित संकेतस्थळांना भेट देऊ नका, असा सल्लाही सीईआरटी-इनतर्फे देण्यात आला आहे.