राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी येथील अमोल खताळ यांची वर्णी लागली आहे. याआधी खताळ राष्ट्रीय महासचिव या पदावर काम करीत होते. त्यांच्या निवडीने तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
केंद्रीय कृषिमंत्री व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दिल्लीतील पक्ष कार्यालयात रविवारी पार पडली. राष्ट्रीय अध्यक्ष मनीष बाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत खताळ यांची निवड करण्यात आली. केंद्रीय कृषी व खाद्य राज्यमंत्री तारिक अन्वर यांच्या हस्ते खताळ यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. खताळ यांनी काही काळ राष्ट्रीय सचिव म्हणून काम केल्यानंतर त्यांना महासचिवपदी बढती देण्यात आली होती. मुंबई, गोवा व गुजरात या तीन राज्यांचे प्रभारीपदही त्यांच्याकडे होते. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांचे संघटन व त्यांच्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी काम केले आहे.
खताळ यांचे शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस खासदार डी. पी. त्रिपाठी, माजी खासदार गोविंदराव आदिक, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी अभिनंदन केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Khatal elected for vice chairman of rashtrawadi vidyarthi congress
First published on: 27-06-2013 at 01:42 IST