पड घालण्यास छतावर गेलेल्या महिलेच्या घरातून १ लाख ३९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविण्यात आले. शहरातील पशुपतिनाथ नगर, कन्हेरीतांडा येथे हा प्रकार घडला.आदर्श रेसिडेन्सीमध्ये वर्षां प्रताप गुणाले यांचे घर आहे. वर्षां गुणाले दुपारच्या सुमारास पापड घालण्यासाठी घराला कडीकोंडा लावून छतावर गेल्या होत्या. चोरटय़ांनी ही संधी साधून घरात प्रवेश केला व कपाटातील १ लाख ३९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने पळवून नेले. खाली आल्यावर गुणाले यांना घर उघडे असल्याचे व कपाटातील दागिने लंपास केल्याचे आढळून आले. त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.