महाबळेश्वरचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून, पाणीटंचाई मुख्याधिकाऱ्यांनी चार दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे सांगितले आहे.
नागरिकांना पाणी पुरवठा करण्यास जुनीपाणी पुरवठा योजना सक्षम नसल्याने नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण केली असून त्याची चाचणी आता सुरू होत आहे. येत्या चार दिवसात वितरण व्यवस्थेतील त्रुटी दूर करून महाबळेश्वर शहरास सुरळीत पाणीपुरवठा होईल, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व नगरसेवक व नागरिकांनी पालिका कार्यालयात मुख्याधिकारी मयूरा शिदेकर यांची भेट घेऊन आपल्या संतप्त भावना त्यांच्या कानावर घातल्या.