09 July 2020

News Flash

वेडिंग प्लानर

वेिडग प्लॅनर हे लग्न सोहळ्यांसाठी सर्व प्रकारचे आराखडे तयार ठेवतात.

लग्नसोहळ्याच्या आयोजनाच्या सर्व बाजू सांभाळणाऱ्या वेडिंग प्लानर या आगळ्यावेगळ्या करिअर संबंधित अभ्यासक्रमांची माहिती..

अलीकडे लग्नसोहळे देखणे आणि ग्लॅमरस झाले आहेत आणि लग्नसोहळ्याला इव्हेंटचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आपले लग्नसोहळे अधिकाधिक उत्तम व्हावे याकरता वधू-वरांकडील मंडळी प्रयत्न करतात. त्यांच्या या प्रयत्नांना सहज सोपे आणि सुलभ करण्याचे काम वेिडग प्लॅनर करत असतात. मेहंदी ते बिदाईपर्यंतच्या संपूर्ण सोहळ्याच्या संस्मरणीय आयोजनाची आणि संनियंत्रणाची जबाबदारी पार पाडणारे हे वेगळ्या प्रकारचे सेवा क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर विस्तारले आहे. अनेक कुटुंबे या घटकाच्या सेवा  त्यांच्या आíथक क्षमतेनुसार घेतात. प्रत्येक वर्षी अशा सेवा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे आणि त्यामुळे या क्षेत्रातील मनुष्यबळाची गरजही वाढत आहे.

वेिडग प्लॅनर हे लग्न सोहळ्यांसाठी सर्व प्रकारचे आराखडे तयार ठेवतात. ग्राहकाची इच्छा, आकांक्षा, अपेक्षा आणि आíथक बाजू लक्षात घेऊन उत्तम आराखडा देण्याची क्षमता लग्नसोहळ्याच्या या कर्त्यांसवरत्यांकडे असावी लागते.

वेिडग प्लॅनरला लग्न सोहळ्याशी संबंधित खानपानसेवा, मंडपापासून स्टेजची बांधणी, नावीन्यपूर्णरीत्या सजावट, मेहंदी, संगीत ते लग्न सोहळा, पाहुण्यांची सरबराई, निवासाची व्यवस्था, वधू-वरांचे आणि कुटुंबीयांचे मेकअप, ड्रेस डिझायिनग आदी विविध बाबींकडे लक्ष पुरवावे लागते. ग्राहकांना या बाबी अचूक आणि कोणताही गोंधळ न होता पार पाडणे अपेक्षित असते. सध्या ‘डेस्टिनेशन वेिडग’कडे कल असून उच्चभ्रू कुटुंबांना त्यांच्याकडील लग्ने देशातील राजवाडय़ांपासून परदेशातील विविध नयनरम्य वास्तू अथवा परिसरात व्हावीत, अशी इच्छा असते. त्यांची ही इच्छा समर्थपणे व सक्षमपणे पार पाडण्याचे कौशल्य वेिडग प्लॅनरला अंगी बाणवावे लागते. असे कौशल्य प्राप्त केलेल्या वेिडग प्लॅनरला या करिअरमध्ये खणखणीत यश मिळते.

अथपासून इतिपर्यंत लग्नसोहळा आयोजनाची जबाबदारी ही वेिडग प्लॅनरवर असल्याने त्याला आणि त्याच्या टीमला काटेकोरपणे काम करावे लागते. वेळेचे व्यवस्थापन सूक्ष्मपणे करता येणे गरजेचे असते. हे क्षेत्र अतिशय परिश्रमाचे आहे. संयम आणि समन्वय ही दोन महत्त्वाची सूत्रे या व्यवसायाच्या यशाशी निगडित आहेत.

लग्न सोहळ्याच्या आयोजनाचा कोणताही तणाव वधू-वराकडील मंडळी घेऊ इच्छित नाही. लग्न सोहळ्याचा त्यांना मनसोक्त आनंद घ्यायचा असतो. त्यामुळे संपूर्ण तणाव हा वेिडग प्लॅनरवर असतो. या तणावाला कोणत्याही प्रकारे बळी न पडता सोहळा उत्तमरीत्या साजरा कसा होईल याचे सूक्ष्म नियोजन

वेिडग प्लॅनरला करावे लागते.

वेिडग प्लॅिनग कंपन्या आता व्यावसायिक पद्धतीने चालवल्या जातात. ही शाखा आता आंतरशाखीय स्वरूपाची झाली आहे. यामध्ये व्यवस्थापन, डिझायनर्स, सजावट, कॅटिरग, म्युझिक आदी बाबींचा समावेश होतो. वेिडग प्लॅनरला लग्न सोहळ्याच्या आयोजनाची फी जरी मिळत असली तरी त्यास हा सोहळा कृत्रिमरीत्या पार पाडायचा नसतो. त्यात जीव ओतून स्वत:च्या घरातील लग्नासाठीच्या भावना असतात त्याच भावनेने त्यास झोकून देऊन काम करावे लागते.

वेिडग प्लॅनरच्या यशामध्ये त्याने निर्माण केलेल्या नेटवìकगचा मोठा हातभार लागतो. या नेटवìकगची निर्मिती त्याचा प्रामाणिकपणा, सेवेची गुणवत्ता आणि दर्जा यावर अवलंबून असते. तुमची प्रसिद्धी मौखिकरीत्या अधिक होते ही बाब लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे या क्षेत्रात शॉर्टकटला अजिबात थारा देऊ नये.

वेिडग प्लॅिनगचे क्षेत्र विस्तारत असल्याने त्याला तज्ज्ञ मनुष्यबळाची गरजही तेवढीच भासू लागली आहे. इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम केलेल्यांना या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते. तथापि, या क्षेत्राचा सतत वाढता विस्तार लक्षात घेऊन आता वेिडग प्लॅिनग या विषयाचे वैशिष्टय़पूर्ण प्रशिक्षण काही संस्थांनी सुरू केले आहेत. या अभ्यासक्रमात लग्न सोहळ्याच्या विविध बाजूंवर आणि पलूंवर लक्ष केंद्रित केले जाते. या संस्था वेिडग प्लॅिनगचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांना वेिडग प्लॅिनग कंपन्यांमध्ये प्लेसमेंट मिळवून देण्यासाठी साहाय्य करतात. काही काळ अनुभव घेतल्यावर स्वत:चा व्यवसायसुद्धा करता येऊ शकतो.

काही शिक्षणसंस्था :

  • ग्रुम एक्स फिनििशग अ‍ॅकॅडेमी : या संस्थेने वेिडग प्लॅनर कोर्स सुरू केला आहे. या अभ्यासक्रमात विविध बारीकसारीक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. त्यात वेिडग प्लॅनरची जबाबदारी आणि भूमिका, यशस्वी होण्यासाठीचे कौशल्य, लग्न सोहळ्यांची परंपरा, भारतीय लग्नपद्धती तसेच पाश्चिमात्य लग्न पद्धती, खास प्रकारचे लग्न सोहळे, लग्न सोहळ्याचा अर्थसंकल्प, खर्च कमी करण्याच्या पद्धती, लग्नासाठीच्या पेहरावांची निवड,  कॅटर्सशी संपर्क आणि समन्वय, सोहळ्याचे डिझाइन, निर्मिती, डीजे- पुष्प सजावटकार- छायाचित्रकार- व्हिडीयोग्राफर यांच्यासोबत करार, सोहळ्याच्या आयोजनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता, वित्तीय बाबींची अचूक नोंदणी व जमाखर्च अहवाल, व्यवसाय वाढीसाठीचे नियोजन व व्यूहनीती, समाजमाध्यमांचा व्यवसाय वाढीसाठी उपयोग, नेटवìकगची कौशल्ये, मनुष्यबळाचे नियोजन व व्यवस्थापन, डेस्टिनेशन वेिडग, लग्न सोहळ्यासाठी आवश्यक असणारे साहित्य, वस्तू व इतर साधनांचा पुरवठा या विषयांचा समावेश आहे. संपर्क- ग्रुम एक्स फिनििशग अ‍ॅकॅडेमी, २६, १६ क्रॉस, १८ मेन, फाइव्ह फेज, जे. पी. नगर, बंगळुरू- ५६००७८. संकेतस्थळ- groomxfa.com
  • वेिडग अ‍ॅकॅडेमी : या संस्थेने डिप्लोमा इन वेिडग प्लॅिनग हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. कालावधी- सहा महिने. या अभ्यासक्रमात लग्न सोहळ्यासंदर्भातील सर्जनशील संकल्पना, डिझाइन, अर्थसंकल्प, खर्चाचा अंदाज, विधी आणि परंपरा, डेस्टिनेशन वेिडग, पुष्पसजावट, स्टेज डेकोरेशन, विद्युत रोषणाई, मनोरंजन, व्हिडीओ, छायाचित्रे, कॅटिरग, लग्न सोहळ्याची ठिकाणे, उद्योजकता यांसारख्या विषयांची माहिती दिली जाते. संपर्क – ११/१२, पहिला मजला, फोरम बििल्डग, रघुवंशी मिल्स कम्पाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ- पश्चिम, मुंबई- ४०००१३. संकेतस्थळ-www.weddingacademy.in
  • इम्पॅक्ट इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट : या संस्थेने पुढील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. * सर्टिफिकेशन कोर्स इन वेिडग प्लॅिनग. कालावधी- सहा महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. * सर्टिफिकेशन कोर्स इन डेस्टिनेशन वेिडग. कालावधी- तीन महिने. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. संपर्क- इम्पॅक्ट इन्स्टिटय़ूट ऑफ इव्हेंट मॅनेजमेंट, जी- ५, लेव्हल ३, बीजीएस शोरूम, साऊथ एक्स्टेंशन पार्ट एक, नवी दिल्ली – ११००४८. संकेतस्थळ- www.iiemdelhi.com  ई-मेल-admissions@iiemdelhi.com
  • कॉलेज ऑफ इव्हेंट्स अ‍ॅण्ड मीडिया : या संस्थेने ११ महिने कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट मास्टर लेव्हल प्रोगॅ्रम, मास्टर प्रीपरेटरी प्रोगॅ्रम, अ‍ॅडव्हान्स्ड डिप्लोमा, इंटरमिजिएट डिप्लोमा, पूर्णवेळ पदविका या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. काही अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अर्हता- पदवी आणि पदव्युत्तर पदवी आहे तर काही अभ्यासक्रमांना बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. संपर्क- कॉलेज ऑफ इव्हेंट्स अ‍ॅण्ड मीडिया डेक्कन कॅम्पस, अकरावी गल्ली, प्रभात रोड, एरंडवणे, पुणे- ०४.  संकेतस्थळ- www.coemindia.com

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 4:45 am

Web Title: career opportunity in wedding planning
Next Stories
1 माहिती तंत्रज्ञानाचे विश्व
2 पुरातत्त्वशास्त्राचा अभ्यास
3 माध्यमांच्या जगात..
Just Now!
X