भारतीय उद्योग क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती होताना दिसत आहे. नवनवीन व्यवसायांना चालना मिळत आहे. भारतातील उद्योग क्षेत्रात आता पुरुषांबरोबरच महिलांनाही समान संधी मिळत आहे. अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जागतिक उद्योगक्षेत्रात भारताची मान उंचावली आहे. यातीलच एक नाव म्हणजे अश्नी बियानी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- डॉ. अक्षता कृष्णमुर्ती ठरली मंगळ ग्रहावर रोव्हर चालवणारी पहिली भारतीय नागरिक; जाणून घ्या तिचा प्रेदणादायी प्रवास

भारतातील प्रसिद्ध फ्यूचर ग्रुपच्या किशोर बियाणी यांची कन्या अश्नी बियाणी हीसुद्धा प्रसिद्ध उद्योजिका आहे. शिक्षणानंतर अश्नीने वडिलांचाच फ्यूचर ग्रुप जॉईन केला. अश्नी सहा वर्षांहून अधिक काळ फ्यूचर कंझ्युमर लिमिटेड (FCL) कंपनीत व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत होती. आपल्या कार्यकाळात तिने कंपनीचा महसूल १३०० कोटींवरून तीन हजार कोटींपर्यंत नेला होता. २०२२ मध्ये अश्नीने आपल्या पदाचा राजीनामा दिला. राजीनाम्यानंतर अश्नीने स्वत:चा व्यवसाय सुरू केला

हेही वाचा- प्रेरणा देवस्थळी, भारतीय नौदलाच्या युद्धनौकेचे नेतृत्व करणारी पहिली महिला अधिकारी

अश्नीचा जन्म मुंबईत झाला. तिला समाज आणि संस्कृतीचा अभ्यास करण्याची आवड आहे. अश्नी ही भारतीय शास्त्रीय संगीताचीही विद्यार्थिनी आहे. तिने बंगळूरुमधील सृष्टी स्कूल ऑफ आर्ट डिझाईनमधून इंडस्ट्रीयल डिझाइनमध्ये पदवी प्राप्त केली आहे. तसेच अश्नीने पार्सन्स स्कूल ऑफ डिझाइनबरोबरच न्यूयॉर्कमधील स्टैनफोर्ड विद्यापीठातून टेक्सटाइल डिझाइनिंगचे प्रशिक्षणही घेतलं आहे.

हेही वाचा- एकीकडे पतीचा मृतदेह दुसरीकडे पोस्टमॉर्टम, २२ हजार मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या मंजू देवीची कहाणी

अश्नीच्या या कर्तृत्वानंतर तिला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. २०१८ मध्ये फोर्ब्स इंडियाज टायकून ऑफ टुमारो पुरस्काराने तिला गौरवण्यात आले. २०१९ साली फॉर्च्यूनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भारतातील सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत तिचा समावेश करण्यात आला होता.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashni biyani founder of think9 consumer former md of rs 169 crore company dpj