विविध ऑनलाइन ॲप्सवर लागणारे सेल आणि त्यात मोठमोठ्या ब्रॅण्डस्च्या उत्पादनांवर मिळणारी जंगी डिसकाउंटस् ही फॅशन आणि ‘ब्रॅण्ड’प्रेमींच्या आनंदाची पर्वणी असते. मात्र अजूनही असे अनेक लोक आहेत, ज्यांना ऑनलाइन खरेदी करणं तितकंसं विश्वासार्ह वाटत नाही. यातला सर्वांत प्रमुख मुद्दा असा असतो, की ॲप कितीही विश्वासार्ह असलं, कितीही उत्तम डिसकाउंट मिळत असलं, तरी कपडे किंवा बूट-चपला खरेदी करताना ‘साईज’ आणि ‘फिटिंग’ ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते.

ब्रॅण्डेड वस्तूंमधला आपला नेमका साईज जर आपल्याला माहिती नसेल, तर ऑर्डर केलेल्या वस्तूचा साईज फारच छोटा किंवा फारच मोठा होण्याची शक्यताच अधिक असते. असं होऊन नंतर ‘रीटर्न’ आणि ‘रीफंड’ची कटकट ओढवून घेण्यापेक्षा नकोच ना ती ऑनलाइन खरेदी, असं खूप जण म्हणतात. यातसुद्धा एकवेळ कपड्यांमध्ये आपल्याला कोणता साईज बसेल, हे तुलनेनं लवकर समजण्याजोगं असतं. बूट-चपलांचा साईज हा मात्र जरासा ‘ट्रिकी’ प्रकार असतो बरं. या अडचणींवर मात करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. यामुळे तुम्हाला तुमचा बूट-चपलांचा नेमका साईज कोणता आहे, हे काढणं सोपं जाईलच, पण यातल्या आणखीही काही टिप्स लक्षात ठेवल्यात, तर बूट-चपलांच्या ऑनलाइन खरेदीत तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुम्ही त्यात लवकरच तरबेज होऊन जाल.

Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
5 home remedies to get rid from mosquitoes how to get rid from mosquito home
डासांच्या उच्छादामुळे रात्री झोपणंही कठीण? मग किचनमधील ‘या’ ५ गोष्टींचा करा वापर, डास होतील गायब

हेही वाचा – पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षकाविरुद्ध महिला पोलिसांच्या तक्रारी… ‘असा’ दिला त्रास

असा मोजा पायाचा साईज :

आपल्याकडे वापरात असलेल्या जवळपास सर्व ऑनलाइन शॉपिंग ॲप्सवर तुम्हाला दोन प्रकारचे साईज बघायला मिळतील. ‘यूके’ (UK) साईज आणि ‘यूरो’ (Euro) साईज. आपल्याकडे ‘यूएस’ अर्थात अमेरिकेत वापरला जाणारा साईज चार्ट वापरलेला बघायला मिळत नाही. त्यामुळे यूके आणि यूरो साईज तुम्ही एकदा जाणून घेतलात की तुमची ऑनलाईन बूट- चपला खरेदी सोपी होऊन जाते.

‘यूके’ साईज आपल्याला टेपनं मोजावा लागतो आणि त्यावरून यूरो साईजही लगेच सांगता येतो. आता खरं तर इंटरनेटवर तुम्हाला पावलांचा साईज मोजण्याच्या विविध पद्धती दिसतील, पण त्यातल्या बहुतेक गोंधळात टाकणाऱ्याच असतात. अमुक मोजा, त्यात इतके मिळवा, इतके वजा करा, वगैरे काहीही भानगडी न करता अगदी सोप्या पद्धतीनंसुद्धा पावलांचा साईज ओळखता येतो. याची अगदी ढोबळ पद्धत अशी, की साधा कापड मोजायचा मेजरिंग टेप घ्यायचा किंवा लहान मुलांच्या दप्तरातली फूटपट्टी घेतली तरी चालेल! आणि पावलाचा साईज- अर्थात टाचेपासून अंगठ्याच्या ‘टिप’पर्यंतचं अंतर सेंटीमीटरमध्ये मोजायचं. ऑनलाईन ॲप्सवरच्या चपला-बूट उत्पादनांमध्ये साईज चार्ट दिलेला असतो. त्याच्याशी तुम्ही मोजलेलं माप पडताळून बघा. तुम्ही मोजलेला पावलाच्या लांबीचा आकडा त्या चार्टमध्ये ‘फूट लेंग्थ इन सेंटीमीटर’ या कॉलममधल्या कोणत्या आकड्याच्या जवळ जातोय ते बघा. चार्टमधला तो साईज तुमचा फूट साईज असेल.

उदा. पावलाची लांबी मोजल्यावर त्यानुसार साईज चार्टमध्ये तुमचा ‘यूके’ साईज ७ असेल, तर तुमचा ‘यूरो’ साईज असेल ३९. आपल्याला आवडलेली चप्पल वा बुटाचा साईज चार्ट पाहात दुसरीकडे पावलाची लांबी मोजण्याचा एग्झरसाईज तुम्हाला केवळ खरेदीच्या पहिल्या १ ते २ वेळाच करावा लागेल. तोही पडताळणी होण्यासाठी. त्यानंतर फूटपट्टीची काहीही गरज उरणार नाही. एकदा आपल्याला आपला ‘यूके’ वा ‘यूरो’ साईज समजला, की तो जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्रॅण्डस् ना चालतो, हे कळेल.

हेही वाचा – पुण्यात पावसाला सुरुवात; मोसमी पाऊस दाखल झाल्याची हवामान खात्याकडून घोषणेची शक्यता

भारतीय ब्रॅण्डस्चं वेगळेपण :

आपल्या ‘यूके’ वा ‘यूरो’ साईजनुसार काही भारतीय ब्रॅण्डस्ची चप्पल घेतली, की मात्र ती आपल्या पावलांपेक्षा लहान असल्याचं लक्षात येतं. असं का होतं? हे लक्षात ठेवा, की अनेक भारतीय ब्रॅण्डस् – यात तुलनेनं कमी किंमत असलेले, सामान्यजनांना सहज परवडणारे चपला-बूट बनवणारे ब्रॅण्डस् प्रामुख्यानं येतात. (इथे किंमत कमी म्हणजे दर्जा वाईटच- असा अर्थ नाही बरं का!) त्यामुळे अशा भारतीय ब्रॅण्ड्सच्या चपला-बूट घेताना आपल्या नेहमीच्या यूरो किंवा यूके साईजपेक्षा एक साईज मोठाच घ्यावा.

चपला-बुटांच्या आकार-प्रकारानुसार साईज वेगळा :

चपला आणि बुटांच्या आकारानुसार वा त्यांच्या प्रकारानुसार (-म्हणजे पायांची बोटं खुली ठेवणारे किंवा बंदिस्त ठेवणारे, इत्यादी.) त्यांना लागू पडणारा ‘यूके’ वा ‘यूरो’ साईज वेगळा असतो. विशेषत: जेव्हा तुम्ही पावलं बंदिस्त ठेवणारे बूट घेता, तेव्हा तुम्हाला एक साईज वरचा घेण्याची गरज भासते. उदा. ज्या चप्पल वा बुटात बोटं खुली राहतात, त्याला तर ‘यूरो’ साईज ३९ लागत असेल, तर पावलं बंदिस्त ठेवणाऱ्या बुटांना किंवा स्नीकर्सना ‘यूरो’ साईज ४० लागण्याची शक्यता खूप मोठी असते. काही वेळा ‘वेजेस’ या प्रकारच्या चपलांनाही एक साईज मोठा घ्यावा लागतो.

साईज व फिटिंगमध्ये क्वचित प्रसंगी आपला अंदाज चुकण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पण त्यातूनही आपल्याला ‘साईज आणि फिट’ दोन्ही कळायला मदतच होते. त्यामुळे या टिप्स वापरात आणून ऑनलाईन खरेदी नक्की करून बघा. तुम्हाला चपला-बूट निवडणं सोपं होईल.