“गार्गी, तुला एकदा सांगितलेलं कळतं नाहीये का? मी तुला त्या पार्टीला जायला परवानगी देणार नाहीये.”

“आई, खूप दिवसांनी आम्ही सर्वजण भेटणार आहोत. दिवसभर कुणालाच जमत नाहीये, म्हणून शनिवारी रात्रीचा कार्यक्रम ठरवला आहे आणि आता मी काही लहान आहे का? माझं मलाही कळतं, कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं ते. रेवा आता लंडनला जाणार आहे. नंदिनी, रवी, राहुल सर्वजण येणार आहेत. पुन्हा आम्ही कधी भेटू माहीत नाही. माझं ऐकून तरी घे आम्ही कशासाठी भेटणार आहोत ते.”

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
AAP MP Sanjay Singh
“केजरीवालांचा तुरुंगात छळ होतोय”, आप खासदार संजय सिंहांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्या पत्नीलाही…”
arvind kejriwal
तुरुंगात अरविंद केजरीवालांचं ४.५ किलो वजन घटलं, आप नेत्या आतिशी म्हणाल्या, “त्यांना काही झालं तर…”

“मला काहीच ऐकायचं नाहीये.”

“मग मलाही तुझं काही ऐकायचं नाहीये, मला जे करायचं ते मी करणारच.”

गार्गी आणि आईमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. ती बेडरूममध्ये गेली आणि तिनं खाडकन दरवाजा लावून घेतला.

वैशालीची चिडचिड चालूच होती. समोर बसलेल्या सासूबाईंच्याकडं ती तक्रार करीत होती. “बघितलं आई, गार्गी कशी उद्धट झालीये ते. हल्ली आजिबात ऐकत नाही. स्वतःचंच खरं करते. सतत मित्र मैत्रिणी आणि फोन यामध्ये बिझी असते. काही ना काहीं कारणं काढून बाहेर असते. आज ही मैत्रीण, उद्या तो मित्र, परवा काय कॉलेजच्या जुन्या मित्र- मैत्रिणींचे गेट-टुगेदर सतत हिचं काही ना काही चालूच असतं. आता तिच्या लग्नाचा आपण विचार करतोय, तर घरात थोडं तरी लक्ष घालायला नको का? घरात तिची आजिबात मदत नाहीये. शिक्षण झालं. आता नोकरी करायला लागली, म्हणजे स्वतःच्याच मर्जीनं वागायचं का?”

नीताताई सर्व ऐकून घेत होत्या. वैशालीचं गार्गी-पुराण संपत नव्हतं. दोघी आपापल्या जागी बरोबर आहेत हे त्यांना माहिती होतं, म्हणूनच त्या दोघींच्याही मध्ये पडल्या नाहीत, पण आज वैशाली गार्गीचं म्हणणं ऐकून न घेता तिला विरोध करीत होती. ‘नाईट आउट पार्टी’चं नाव घेताच तिचा पारा चढला होता.

तिची चिडचिड पाहून त्या तिला म्हणाल्या, “वैशाली, अगं किती त्रास करून घेतेस स्वतःला? आणि तू अशी चिडचिड केलीस, रागावलीस, म्हणजे ती तुझं ऐकेल असं तुला वाटतं का? तुझ्या अशा वागण्यामुळं ती तुझ्यापासून दूर जाते आहे. तुमच्या दोघींमध्ये पूर्वीसारखे संवाद होत नाहीत, वाद मात्र वाढत चालले आहेत.”

“आई, म्हणजे तुम्हांलाही मीच चुकीची वाटते का? तिचं सगळं वागणं पटतंय तुम्हांला? मी काय शत्रू आहे का तिची? आईच आहे ना? तिचं चांगलंच व्हावं हेच मला वाटतं ना? तिचं पाऊल वाकडं पडू नये, तिला समाजात कुणी नावं ठेवू नये म्हणूनच मी बोलते ना तिला, पण तिला माझं पटतं नाही आणि तुम्हांलाही माझं वागणं पटतं नाही.”

वैशाली आज चांगलीच चिडली होती. तिला समजावून सांगण्यासाठी त्या म्हणाल्या, “वैशाली, गैरसमज करून घेऊ नकोस, आई म्हणून तुला गार्गीची काळजी वाटणं साहजिकच आहे. तिचं जे वागणं पटतं नाही त्याबद्दल विरोध करणं, तिला योग्य मार्ग दाखवणं हे आजिबात चुकीचं नाही, पण तू जो मार्ग अवलंबतेस तो चुकीचा आहे. मुलांवर रागावून चिडचिड करून उपयोग नाही, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, त्यांच्यावर विश्वास दाखवणंही गरजेचं आहे. आपल्या मुलांवर बंधन लादली म्हणजे ते संस्कारी होतात असं नाही.आज केवळ ‘नाईट आउट पार्टी’ आहे इतकं ऐकून तू गार्गीला विरोध करू लागलीस. तिच्याशी प्रेमानं बोलून तिचं नक्की काय ठरलंय हे समजावून घेण्याचा प्रयत्नही केला नाहीस. पालकांनी संवाद टाळला की मुलं ही संवाद टाळतात. आई वडिलांचे उपदेशाचे डोस म्हणजे त्यांना कटकट वाटू लागते. आपलं म्हणणं हे समजून घेऊच शकत नाहीत असं त्यांनाही वाटू लागतं आणि नात्यातील अंतर वाढतं. खरं तर तुमच्या दोघांच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करण्यासाठी तिला सर्व मित्र मैत्रिणींच्या मदतीनं प्लॅनिंग करायचं आहे. आता सगळेचजण नोकरी व्यवसायात असल्याने पूर्वीसारखे केव्हाही भेटू शकत नाहीत म्हणून बाहेर डिनर करून ते रेवाच्या प्लॅटवर रात्री जमणार आहेत. तुला व वरदला सरप्राईज द्यायचं असं तिनं ठरवलं आहे आणि तू मात्र तिच्यावरच रागावते आहेस.”

नीताताईंचं बोलणं ऐकून वैशाली नरमली. आपल्याच मुलीबद्दल आपण उगाचच वाईट विचार मनात आणले. प्रत्येकवेळी मुलं चुकतात असं नाही,पण आपणच त्याच्याकडे एकाच चष्म्यातून पाहतो, आपल्या संस्कारांवर आणि आपल्या मुलांवर आपण विश्वास ठेवायला हवा, हे वैशालीच्या लक्षात आलं. तिने गार्गीशी बोलायचं ठरवलं.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)