आजकाल मोबाईल-इंटरनेट जवळपास प्रत्येकाकडे आहे. फेसबूक, इंस्टाग्राम, ट्विटर, युट्यूब सारख्या सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर अकाऊंट आहे. याच सोशल मीडियाचा योग्य वापर करून लोकांचे मनोरंजन करून, उपयुक्त माहिती देऊन कित्येक लोक पैसे कमावत आहे. अशा लोकांचे सोशल मीडिया फ्लॅटफॉर्मवर लाखोंमध्ये चाहते आहेत. त्यांना सोशल मीडिया इंन्फ्युएन्सर्स म्हणून ओळखले जाते. सोशल मीडिया इंन्फ्युएन्सर्स हे नवीन क्षेत्र म्हणून उदयाला येत आहे. गेल्या काही वर्षात इंन्फ्युएन्सर्सची संख्या झपाट्याने वाढली आहे. तरुण-तरुणींचा इंन्फ्युएन्सर्स होण्याकडे कल जास्त आहे. अशातच वयाशी पन्नाशी ओलांडलेल्या काही महिला इंन्फ्युएन्सर्सच्या जगात स्वत:चे स्थान निर्माण करत आहे. या महिलांपैकी कोणी सुंदर चित्र रेखाटते, कोणी मॉडेलिंग करत आहेत, कोणी कथाकथन (Storytelling) करत आहेत, कोणी आपल्या आयुष्यातील अनुभव सांगत आहेत आणि तर कोणी स्वादिष्ट पाककृती बनवत आहेत. वयांच्या पन्नाशी ओलांडल्यानंतरही नेटकऱ्यांच्या मनावर छाप पाडत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

येथे काही भारतीय महिला इंन्फ्युएन्सर्स आहेत ज्यांचे वय ५०पेक्षा जास्त आहे….

सीमा आनंद

सीमा आनंदने लैंगिक आरोग्य आणि त्यांच्या कथाकथनाची आवड या दोन्हीचा मेळ बसवून आपले इंस्टाग्राम सुरु केले. “इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या प्रत्येक पोस्टमधून प्रत्येक वेळी ती जग बदलण्याचा प्रयत्न करत आहे” असे त्यांनी त्यांच्या इंस्टाच्या बायोमध्ये लिहिले आहे. पौराणिक इतिहासापासून ते २०२४ मधील डेटिंगपर्यंत सीमा यांच्या ज्ञानाच्या खजिन्यासाठी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंट ओळखले जाते. याशिवाय हे सर्व सांगणे त्यांना मनापासून आवडते.

द आर्ट्स ऑफ सेडक्शनच्या या ६२ वर्षीय लेखिकेचे १.४ इंस्टाग्राम फॉलोअर्स आहेत. SheThePeople ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी महिलांना सल्ला दिला की, “स्वत:ची गोष्ट स्वत: मांडा. तुमचे मत इतरांनी ऐकायला हवे असेल तर तुम्हाला फक्त बोलत राहावे लागेल. तुम्हाला ती गोष्ट सांगत राहावी लागेल.”

राजिनी चांडी ( Rajini Chandy)

अभिनेत्री राजिनी चांडीयांनी ( Rajini Chandy ) गृहिणी म्हणून काही वर्ष आपले घर सांभळले. त्यानंतर २०२१ ची सुरुवातीला त्यांच्या फोटोशूटने Instagramवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फोटोग्राफर अथिरा जॉयने (Athira Joy) हे फोटोशूट केले होते. खास फोटोशूटमध्ये ७२ वर्षीय राजिनी यांनी साडी, रिप्ड जीन्स आणि डेनिम ड्रेसपासून जंपसूटपर्यंत सर्व प्रकारचे फॅशनेबल कपडे परिधान केले.

६५ व्या वर्षी मल्याळम चित्रपटांमध्ये पदार्पण केलेल्या आणि बिग बॉसमध्ये दिसलेल्या चांडीने बीबीसीला सांगितले, “मी फक्त तेच करत आहे जे मला आनंद देते. मी ड्रम वाजवायला शिकत आहे, मी परिपूर्णतेचे ध्येय ठेवत नाही, मी फक्त सर्व गोष्टींचा आनंद घेत आहे. जोपर्यंत तुम्ही कोणाला त्रास देत नाही तोपर्यंत तुम्हाला हवे ते करणे योग्य आहे असे मला वाटते.”

हेही वाचा – “मी वाईट आई आहे का?” Mamaearth Co-founder गझल अलघ यांची भावनिक पोस्ट चर्चेत

चांडीचा हा दृष्टिकोन मात्र नेटकऱ्यांना फारसा आवडला नाही. अनेकांची त्यांच्या वयाची खिल्ली उडवली. त्यांच्या पोस्टवर कमेंट करून टिकाही केली. “त्यांच्या वयासाठी हे फोटोशूट खूपच मादक आहे”असे सांगितले. पण त्यांनी लोकांच्या टिका फारशी मनावर घेतली नाही. लोकांच्या टिकेला सडेतोड प्रत्यूत्तर दिले.

मंजरी वर्दे

मंजरी वर्दे ही अभिनेत्री समीरा रेड्डीची सासू म्हणून लोकप्रिय आहे. ती इंस्टाग्राम सक्रिय आहे. त्यांच्या इंस्टाग्रामवर रंगबेरंगी चित्र पाहायला मिळतात. ७० वर्षाच्या मंजरी वर्दे या चित्रकार आहेत ज्या अमूर्त (abstract), दैवी (divine) आणि पारंपारिक कलेची( traditional art) श्रेणी दर्शवणारे चित्र रेखाटतात. त्यांच्या इंस्टाग्रामवर ६५ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत ज्यांना सर्जनशील जगाची झलक पाहता येते.

हेही वाचा – “एकदिवस अचानक मला मुलांची आठवण आली अन् रडू आले”; सुधा मूर्ती यांनी सांगितला मेनोपॉजदरम्यान अनुभवलेला प्रसंग

त्यांचे लेबल सामंजरी ‘वेअरेबल आर्ट’ ला (परिधान करण्यायोग्य कलेला) प्रोत्साहन देते. इंस्टाग्रामवर वर्दे यांना सॅसी सासू (Sassy mother-in-law) म्हणून ओळखले जाते. मेस्सी मम्मा (Messy mama) म्हणून त्यांची सून अर्थात समीरा रेड्डीला ओळखले जाते.

ही जोडी भारतातील सासू सुनांच्या नात्याकडे नकारात्मकतेने पाहिल्या जाणाऱ्या दृष्टीकोनाला तडा देतात. वर्दे आणि रेड्डी या नेहमी मजेशीर डान्स व्हिडिओ पोस्ट करतात. सासू सुनेचे नाते किती मैत्रीपूर्ण असू शकते याचे उत्तम उदाहरण ही जोडी आहे.

हेही वाचा – “मी वाईट आई आहे का?” Mamaearth Co-founder गझल अलघ यांची भावनिक पोस्ट चर्चेत

रवि बाला शर्मा

रवी बाला शर्माच्या यांच्या इंस्टाग्रामवर मोजक्या काही पोस्ट आहेत, परंतु त्यांचे फॉलोअर्स ११४ लाखांपर्यत आहे. ही आजी ट्रेंडिंग गाण्यावर जितक्या सहजतेने नाचते तितक्याच सहजतेने ती पारंपारिक गाण्यांवर थिरकते.

इंस्टाग्राम फीडवर तुम्हाला पिंगापासून ते “मोह मोह के धागेपर्यंत सर्व प्रकारच्या गाण्यांवर नृत्य करताना रवि बाला शर्मा दिसतील. दिलजीत दोसांझच्या G.O.A.T.वर त्यांचा डान्स तुफान व्हायरल झाला होता. इंस्टाग्रामवरील माहितीनुसार, त्यांनी तबल्याचे व्यावसायिक प्रशिक्षणही घेतले आहे. पूर्वी शिक्षिका असलेल्या शर्मा म्हणतात की, ” त्यांनी कथ्थक गुरू त्यांंचे वडील होते.”निवृत्तीनंतर, ती आता त्यांच्या मनोरंजक आवड जपत आहे. स्वतःसाठी तसेच त्यांच्याकडे पाहणाऱ्या इतर सर्व वृद्ध महिलांसाठी नवीन ध्येय निश्चित करत आहे”.

शांती रामचंद्रन

शांती रामचंद्रन ही एक फुड व्लॉगर आहे जिच्या हातात जादू आहे. पारंपारिक दैनंदिन जेवणापासून ते पाश्चिमात्य खाद्यपदार्थही ती अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचे जेवण बनवतात. पूर्वी बँकर अससेल्या शांती यांनी पोरियालपासून पराठ्यांपर्यंत सर्व खाद्यपदार्थ बनवण्याचे आपले पाककौशल्य दाखवण्यासाठी इंस्टाग्राम खाते सुरु केले

रामचंद्रन यांच्या इंस्टाग्रामला भेट देणाऱ्यांना लोकांना आईच्या हातच्या जेवणाची झलक पाहून आपलेपणाची भावना जाणवते. त्यांच्या इंस्टाग्राम खात्यावर ५२ लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.

वहिदा रहमान

सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसल्या तरी वहिदा रेहमान या अनेकदा इन्स्टाग्रामवर त्यांची मुलगी काश्वी रेखीच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये दिसतात. गाईड, खामोशी, सीआयडी, आणि ‘कागज के फूल’ यांसारख्या लोकप्रिय हिंदी चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या अभिनेत्रीने ८० च्या दशकात अभिनय क्षेत्राबाहेरील त्यांच्या अभिनय कौशल्याची झलक दाखवली आहे.

प्रशिक्षित वन्यजीव छायाचित्रकार असण्याबरोबरच त्यांनी काही प्रकल्पांदरम्यान भारत आणि आफ्रिकेचा प्रवास केला आहे. वयाच्या ८६व्या वर्षी देखील वहिधा यांना जलक्रीडामध्येही (water sports) खूप आवड आहे. अंदमानमध्ये त्यांच्या मुलीबरोबर स्नॉर्कलिंग करतानाचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते ज्यामध्ये अभिनेत्री हॅवलॉक बेटावर समुद्राच्या खोल पाण्यात पोहताना दिसत आहे.

वहिदा रेहमान अजूनही त्यांच्या १९६० आणि ७०च्या दशकातील चित्रपटसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेंत्रमध्ये उच्च स्थानी आहेत. स्कूबा डायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्याची त्यांची योजना असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fab over 50 these women are rocking the instagram influencer game chdc snk