सरकारी शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या दिव्याला लहानपणापासूनच अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या आहेत. लहान असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. मात्र, गरिबी आणि बिकट परिस्थिती असतानादेखील दिव्याचे मोठी, प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याचे ध्येय असून तिने ते साध्य केले आहे. तिने केलेल्या या खडतर आणि प्रेरणादायी प्रवासाबद्दल जाणून घेऊ. तिचा संघर्ष पाहून, एखादी गोष्ट करण्याचे मनाशी घट्ट ठरवल्यानंतर तुम्हाला कुणीही अडवू शकत नाही हे दिसून येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिव्या हरियाणामधील महेंद्रगड येथील असून, सुरुवातीला तिचे शिक्षण सरकारी शाळेमध्ये झाले आहे. नंतर तिची महिंद्रगडमधील नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आली होती. २०११ साली दिव्या केवळ ८ किंवा ९ वर्षांची असतानाच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आणखीनच बिकट झाली होती.

हेही वाचा : तब्ब्ल ‘१६’ सरकारी नोकऱ्या नाकारून, पहिल्याच फटक्यात UPSC परीक्षेत उत्तीर्ण होणारी ‘ही’ IPS अधिकारी कोण? जाणून घ्या…

संपूर्ण कुटुंबाला सांभाळण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी दिव्याची आई, शेतामध्ये मजुरीची कामे करत असे. तसेच शिवणकाम करून दिव्या आणि तिच्या दोन भावंडांचा सांभाळ करायची.

अशा सर्व हलाखीच्या परिस्थितीचा सामना करून, दिव्याने विज्ञान क्षेत्रात पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण होताच तिने ताबडतोब UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. ही परीक्षा देणे आणि त्यात उत्तीर्ण होणे हे दिव्याचे लहानपणीपासूनचे स्वप्न होते.

मात्र, इतरांप्रमाणे दिव्याला या परीक्षेचे कोचिंग परवडणारे नव्हते. तरीही ऑनलाइन उपलब्ध असलेल्या सर्व माहितीचा आणि चाचणी परीक्षांचा वापर करून, प्रचंड मेहेनत दिव्याने घेतली. २०२१ मध्ये तिने आपली पहिली UPSC परीक्षा दिली. त्यामध्ये संपूर्ण देशात ४३८ वा क्रमांक पटकावला आणि दिव्या भारतातील सर्वात कमी वयात IPS बनलेली पहिली व्याक्ती ठरली.

परंतु, दिव्या इतक्यावरच थांबली नाही. तिने पुन्हा २०२२ साली UPSC परीक्षा दिली. यात तिने देशभरातून १०५ हे स्थान पटकावले आणि IAS बनली. हे सर्व तिने कोणत्याही प्रकारचे कोचिंग न लावता, स्वतःच्या मेहेनतीवर करून दाखवले आहे.

हेही वाचा : सामाजिक बंधने झुगारून माउंट एव्हरेस्ट सर करणारी ‘पहिली भारतीय महिला’; पाहा कसा झाला या गिर्यारोहकाचा प्रवास…

तिच्या या प्रवासामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली आहे. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून, इच्छुक उमेदवारांना अधिक प्रोत्साहन देण्याचे काम ती माहिती आणि सामग्री पोस्ट शेअर करून करत असते. तिचे या सोशल मीडिया माध्यमावर ९७ हजार इतके फॉलोवर्स आहेत, अशी सर्व माहिती DNA च्या एका लेखावरून समजते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl who became the youngest ips officer at the age of 21 passed upsc without any course what is her story check out dha
First published on: 29-01-2024 at 16:46 IST