डॉ. तेजस्विनी कुलकर्णी

काही दिवसांवरच मातृदिन येईल. मग माझी आई (असलेली स्त्री) ही कशी सुपरमॉम आहे, आमच्या घरातली खरी तर सुपरहिरोच आहे आणि एकाच वेळी ऑफिस, घर, सर्वांची काळजी घेणं, अशा किती विविध गोष्टी चेहऱ्यावर हसू ठेवून करते… अशा अर्थाच्या पोस्ट वेगवेळ्या समाजमाध्यमांवर पाहायला मिळाल्या/मिळतील. मात्र ते करताना तिच्यातील स्त्री ही शेवटी माणूस आहे आणि तितकीच मानसिक तणावाला व आजारांना बळी पडू शकते हे मात्र आपण विसरून जातो. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं आहे की कॉर्पोरेटमधे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी ५६ टक्के महिलांना मानसिक आजाराचा धोका आहे हे उघड झालं आहे. या मानसिक ताण-तणावाचा व आजारांचा परिणाम अनेकदा शारीरिक आरोग्यावरही झालेला पाहायला मिळतो पचन संस्था रक्ताभिसरण संस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती यांच्यावर तो अनेक संशोधनांमध्ये दिसून आला आहे. अशा नाजूक परिस्थितीत आपण आपली स्वतःची काळजी घेणं व मानसिक आरोग्य जपणं महत्त्वाचं. त्यासाठी या काही गोष्टी उपयुक्त ठरतील.

hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
survey shows citizens have no confidence in food inspection agencies
खाद्यपदार्थांची तपासणी करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा अविश्वास, सर्वेक्षणातून माहिती उघडकीस
How to treat heat-related illnesses
उष्णतेच्या लाटेचा कसा करावा सामना? सरकारने मार्गदर्शक सुचना केल्या जारी
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…

हेही वाचा >>> आहारवेद: आरोग्यदायी लोणी

१) आपल्याला मानसिक/ शारीरिक तणावाला सामोरं जावं लागत आहे हे नाकारू नका. झोपेच्या समस्या, स्नायूंमधे ताण, अपचन, पित्त, छातीत धडधड, सततचा थकवा, चिंता, कामात लक्ष न लागणं अशा प्रकारची कोणती लक्षणं तुम्हाला जाणवत असतील तर मला ताण आलेला असू शकतो या शक्यतेला मान्यता द्या.

एकदा का हे मान्य केलं की आपल्याला ताण कमी करण्यासाठी रोजच्या आयुष्यात वापरता येतील असे उपाय आत्मसात करायला हवे.

२) जर रोजचं काम बैठं असेल, तर शारीरिक हालचाल ही ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. व्यायामामुळे आपल्या शरीरात एन्डॉर्फिन्स नावाचं रसायन पाझरतं व ते मेंदूवरचा ताण कमी करायला मदत करते. योगासनं, सूर्यनमस्कार, पिलाटीज, चालणं यांसारखे व्यायामाचे वेगवेगळे प्रकार तर आहेतच. याशिवाय मनमोकळेपणानं नृत्य करणं, नवी नृत्यशैली शिकणं, पोहणं, बॅडमिंटन, टेनिस वा टेबलटेनिस यांसारखे व इतर सर्व मैदानी खेळ खेळणं हेही शारीरिक हालचालींसाठी थोडे रंजक असे प्रकार आहेत. रोज किमान ३० मिनिटं अशा प्रकारच्या शारीरिक हालचालींसाठी वेगळी काढणं आवश्यक. तसंच वेळ मिळत नाही या कारणाला आपल्याला फाटा देऊन शारीरिक हालचालीला प्राधान्य द्यावं लागेल.

हेही वाचा >>> गच्चीवरची बाग: भाजीपाला फुलवताना…

३) आपल्या आजचा गुंतागुंतीच्या आयुष्यामध्ये घर आणि काम यांचा मेळ साधणं कठीण होऊ शकतो त्याच सोबत कामाच्या कामाचा नात्यांवर आणि नात्यांमधल्या तानाचा कामावर देखील परिणाम होणं अनेकांनी अनुभवलं असेल. अशावेळी आपल्या मनात असणाऱ्या भावनिक कोलाहल कमी करण्यासाठी आणि नकारात्मक भावनांमुळे मनावर येणारा ताण कमी करण्यासाठी या भावना व्यक्त व्हाव्यात, त्यांचा निरोगी मार्गानं निचरा व्हावा यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या विश्वासातल्या जवळच्या व्यक्तींशी याबद्दल मोकळेपणानं बोलू शकता किंवा तुम्हाला कोणाशी बोलायचं नसेल तर स्वतःशीच लिहून देखील ते बोलू शकता. जर्नल मध्ये मनावर असलेल्या तणावा विषयी त्रासदायक भावनांविषयी किंवा समस्यांविषयी लिहून त्यावर उपाय शोधणे सोपे होईल. यामुळे महत्त्वाचे निर्णय घेणे किंवा महत्त्वाच्या समस्या सोडवणं यांसाठी विचारांना स्पष्टता येईल.

४) निसर्गामध्ये वेळ घालवणं, घरात किंवा फक्त ऑफिसमध्ये चार भिंतींच्या आत जास्त वेळ न घालवता दिवसातला काही वेळ घराच्या बाहेर मोकळ्या हवेमध्ये घालवता येतोय का? सूर्यप्रकाशामध्ये आपण काही काळ जाऊ शकतो का? तेही पाहणं आवश्यक आहे.

५) तुमच्या प्रेमाच्या माणसांशी पुन्हा नव्यानं जोडलं जाणंसुद्धा तुम्हाला ताण कमी करायला उपयोगी पडेल. तुमच्या दिवसभरातल्या किंवा आठवड्यातला काही वेळ ठरवून तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींशी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक किंवा तुमच्या पालकांशी जाणीवपूर्वक संवाद साधू शकता, त्यांच्यासोबत काही वेळ घालवू शकता. कोणत्याही विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज् करू शकता. आपल्या आयुष्यात असलेली अर्थपूर्ण नाती आपला ताण कमी करायला मदत करतात. नात्यांचा अनुभव स्वतःला देण्यासाठी संधी निर्माण करा.

हेही वाचा >>> चॉइस तर आपलाच : सहीचा अर्थ

६) माईंडफुलनेसचा अवलंब करा. माईंड फुलनेस म्हणजे आपण वर्तमान क्षणांमध्ये जे करतो आहोत जिथे आहोत तो अनुभव निर्मळपणे घेणं. आत्ता जे अनुभवतो आहोत त्याचा कोणत्याही गोष्टीशी संबंध न लावणं किंवा त्याचा कोणत्याही प्रकारे विश्लेषण न करता फक्त वर्तमान क्षणांमध्ये अनुभव घेणं. माईंड फुल असताना ताण कमी करण्यासाठी खूप फायदा होतो हे अनेक संशोधनांनी दाखवून दिलं आहे. ध्यान हा याचाच एक प्रकार. डोळे बंद करून शरीर शिथिल करून शांतपणे फक्त श्वासोस्वासावर लक्ष देणे हा माईंड फुलण्याचा सोपा प्रकार तुम्ही आजमावून पाहू शकता. रोज सकाळी किंवा संध्याकाळी तुमच्या वेळेनुसार दिवसातून किमान दहा ते पंधरा मिनिटं या माईंड फुलनेसचा सराव केला तर मन शांत होण्यासाठी आणि ताण कमी होण्यासाठी उपयोग होईल. यामुळे कामातील एकाग्रता देखील वाढेल.

हेही वाचा >>> झोपू आनंदे : घोरणे

७) सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्या आयुष्यात घडत असलेल्या घटनांची सकारात्मक बाजू शोधण्याचा प्रयत्न करा. तसंच आपल्याला मिळालेल्या वस्तू, शिक्षण, सुख-सोयी, व्यक्ती, नाती आणि आपण संपादन केलेलं यश, प्रगतीमध्ये गाठलेले टप्पे, यासाठी कृतज्ञता मनामध्ये बाळगा. तुमच्या जर्नलमध्ये रोज दिवसभरामध्ये घडलेल्या या पाच गोष्टींसाठी मी मनापासून कृतज्ञ आहे असं लिहून ठेवा. या सकारात्मक गोष्टींची यादी रोज वाढवत जा. त्यामुळे आपल्या मनाला सकारात्मक राहण्याची सवय लागेल. हे करताना आपण जबरदस्तीने किंवा विषारी सकारात्मकतेकडे तर जात नाही आहोत ना, याचीही काळजी घेणं आवश्यक आहे. जेव्हा आपण मानसिक तणावामधून जात असतो, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक भावना आणि ताण यांच्यावर योग्य ते उपाय करणं गरजेचं असतं. फक्त सकारात्मक विचार करणं हे त्यासाठी उपयुक्त नाही. त्या त्रासदायक भावना दाबून जर सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्यासाठी जास्त धोक्याचं आहे. म्हणूनच आपण वर चर्चा केल्याप्रमाणे या सर्व भावनांना बाहेर काढणं, त्यांचा निचरा करणं हे अत्यावश्यक आहे. गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत घेणं, समुपदेशकांकडे किंवा मानसतज्ज्ञांकडे जाऊन मदत घेणे इष्ट. त्यांची मदत घेताना आप्त आणि समाजाविषयी कुठल्याही प्रकारचा गिल्ट मनात ठेवू नका.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःला आणि स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देऊन त्याची काळजी घेणं, ही आपली जबाबदारी आहे. ती त्वरित स्वीकारून त्यावर काम करायला सुरुवात करा. गरज पडेल तिथे मदत मागायला स्वतः:च पुढाकार घ्या. (लेखिका समुपदेशक आहेत.)