प्रत्येक व्यक्तीचे एखाद्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये काम करण्याचे स्वप्न असते. अनेक जण त्यासाठी भरपूर मेहनत घेऊन, यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत असतात. मात्र, अशा नावाजलेल्या कंपनीत काही निवडक लोकांनाच मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळते. नोकरीसाठी व्यक्तीने पाठविलेली त्याची माहिती म्हणजेच बायोडेटा किंवा सीव्ही हा लहान, सुटसुटीत व मोजका असावा, असे अनेकदा आपण ऐकले आहे. मात्र सोनाक्षी पांडेला नावाच्या व्यक्तीने हे सर्व समज खोडून काढले आहेत.

फेसबुक, ॲमेझॉन, ॲपल, नेटफ्लिक्स आणि गूगल म्हणजेच ‘FAANG’ मध्ये नोकरी करण्याचे अनेकजण स्वप्न पाहताना मात्र, सोनाक्षी पांडेला गूगल आणि ॲमेझॉन या दोन टेक जायंट्स कंपन्यांकडून नोकरीची ऑफर मिळाली होती.

हेही वाचा : पद्मश्री पुरस्काराने सन्मानित ‘ट्रॅक्टर क्वीन’ कोण? जाणून घ्या भारतातील सर्वांत श्रीमंत महिला उद्योजकाची माहिती….

अहवालांनुसार तिच्या दोन पानी रेझ्युमेमुळेच तिला तिच्या स्वप्नातील गूगल आणि मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये नोकरी मिळवून देण्यास मदत केली आहे. सुरुवातीला सोनाक्षी ॲमेझॉनमध्ये सॉफ्टवेअर इंजिनीयर या पदावर काम करीत होती. जिथे तिने तिचे कॉम्प्युटर सायन्समधील मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर तीन वर्षांत तिच्या कोडिंग कौशल्यांमध्ये अधिक कुशलता प्राप्त केली. सोनाक्षी एक अबोल आणि अंतर्मुख [introvert] स्वभावाची व्यक्ती असूनही तिच्यामधील विशेष गुणांमुळे ती सर्वांपेक्षा वेगळी ठरली होती. तिने नंतर मायक्रोसॉफ्ट आणि गूगलसारख्या कंपनीमध्ये अर्ज करण्याचा निर्णय घेतला.

त्याआधी तिने ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस (AWS)मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हा विभाग सोडून, सोल्युशन आर्किटेक्चर या विभागात काम करण्यास सुरुवात केली होती. तब्ब्ल पाच वर्षे ॲमेझॉनममध्ये काम केल्यानंतर, तिला मायक्रोसॉफ्ट आणि गूगल या प्रतिष्ठित कंपन्यांकडून नोकरीची ऑफर मिळाली. इतकी वर्षं वेगवेगळ्या क्षेत्रात काम केल्याने, सोनाक्षीकडे दोन युनिक कौशल्ये असल्याने तिला या मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळण्यास मदत झाली आहे.

हेही वाचा : सिंगापूरमध्ये उभारली शाळा, सुरू केला ‘३३० कोटी’ रुपयांचा स्टार्टअप! जाणून घ्या कोण आहे ही भारतीय इंटरप्रेन्योर?

AWS मध्ये काम करत असताना, सोनाक्षीने ॲमेझॉनच्या क्लाउड कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्मसाठी एक ब्लॉगदेखील डेव्हलप केला होता. इतकेच नाही, तर तिने सहभाग घेतलेल्या स्वयंसेवक प्रकल्पांमुळे आणि मार्गदर्शन प्रकल्पांमुळे तिचा सीव्ही इतर सर्वांमध्ये वेगळा ठरण्यास मदत झाली. ॲमेझॉनममध्ये असताना सोनाक्षीला ज्यांनी मार्गदर्शन केले, ज्यांनी तिला विविध पुस्तके वाचण्यासाठी आणि पॉडकास्ट ऐकण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याचीदेखील आज तिला नोकरी मिळवण्यासाठी मदत झाली असल्याचे सोनाक्षीचे मत आहे.

सोनाक्षीच्या अशा कमालीच्या सीव्हीमुळे आज ती अमेरिकेतील सिएटल शहरात असणाऱ्या गूगलच्या ऑफिसमध्ये, ‘डेटा आणि प्रॉडक्ट मॅनेजर’ या पदावर कार्यरत आहे, अशी माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळते.