संदीप चव्हाण

उपयुक्त भाजीपाला पिकवण्याबरोबर घरात आल्यावर विसाव्याचे ठिकाण म्हणून गच्चीवरची बाग सजवता आली तर दुग्धशर्करायोगच! गच्ची वा बाल्कनीमध्ये मर्यादित जागेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेण्याचेही आव्हान असते. म्हणूनच व्हर्टिकल फार्मिंग पर्याय अलीकडे लोकप्रिय होऊ लागला आहे. यासाठी बाजारात उपलब्ध असणारी सच्छिद्र जाड तारेची लोखंडी वा प्लास्टिकची जाळी मिळते, या जाळीचा उपयोग करता येतो. ही जाळी एखादी बादली अथवा टबमध्ये तेवढ्याच आकाराएवढी व ३-४ फूट उंचीची जाळी बसवावी. त्यास आतून हिरव्या रंगाच्या शेडनेटचे किंवा कापडाचे अस्तर द्यावे.

Yamaha Fascino S launched with ‘Answer Back’ feature 2024 Yamaha Fascino S Launched In India
Yamaha Fascino S : यमाहाने लाँच केली भन्नाट स्कूटर; बाईकला टक्कर देणारे जबरदस्त फिचर्स, किंमत १ लाखांहून कमी
Instagram new feature ad breaks forces users to stop and view an ad for specified period before they can continue scrolling
रील्स स्क्रोल करताना आता थांबावच लागणार; इन्स्टाग्रामचं हे नवीन फीचर काम करणार ‘असं’
try the tasty Rava Omelet
व्हेज ऑम्लेट खायचंय? मग नक्की ट्राय करा टेस्टी ‘रवा ऑम्लेट’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Netflix has a total of four prepaid plans in India mobile basic standard and premium Check prices benefits and more
Netflix plans 2024: फक्त १४९ रुपयांत मिळणार नेटफ्लिक्सचे ‘मोबाईल सबस्क्रिप्शन’; जबरदस्त फायदे अन् ‘या’ चार प्लॅन्सची यादी पाहाच
Mumbai’s BMC urges citizens to avoid street food during summers here’s why you should be careful too
“उन्हाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊ नका”, BMC चे आवाहन; विक्रेत्यांसह ग्राहकांनी कशी बाळगावी सावधगिरी?
Heatwave alert What are top cooling herbs that you can have every day
Heatwave alert : शरीराला थंडावा देण्यासाठी ‘या’ औषधी वनस्पती आहेत सर्वोत्तम, रोजच्या आहारात करा समावेश
Portfolio Low leverage attractive valuation Indian Metals and Ferro Alloys Limited Company market
माझा पोर्टफोलियो : अत्यल्प कर्जदायित्व, मूल्यांकनही आकर्षक!
sadhav shipping starts ferry service for ongc offshore employees
ओएनजीसीच्या ऑफशोअर कर्मचाऱ्यांसाठी साधव शिपिंगची फेरी बोट सेवा

आणखी वाचा : ‘गंगा भागिरथी’ म्हणत २१ व्या शतकातील महिलांना पुन्हा पुरातन काळात नेण्याचा प्रयत्न का?

त्यानंतर माती व पोषण भरावे. ठरावीक अंतरावर या जाळीत बियाणे पेरावीत म्हणजे संपूर्ण गोलावर हिरवाई फुलवता येते. या जाळीवरचे व्हर्टिकल गार्डन खुलून दिसते. या जाळीच्या तळाशी असलेल्या बादली अथवा टबमधील पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी भोके पाडावीत. जाळी कलंडणार नाही याची काळजी घ्यावी. हा प्रकार बागेच्या मध्यभागी ठेवल्यास चारही बाजूने प्रकाश मिळतो. जागेचा जास्तीत जास्त वापर आपल्याला पालक, मेथी, लाल माठ, शेपू अशा पालेभाज्या यात मस्त येतात. तसेच या कल्पकतेमुळे बागेचे सौंदर्यही वाढते.

आणखी वाचा : गच्चीवरची बाग: जमिनीवरील वाफे…

किचन ट्रॉलीचे पसरट ट्रे आता बऱ्यापैकी उपलब्ध होऊ लागले आहेत. त्यास छानपैकी ४ ते ९ इंचाची खोली असते तसेच वरती पसरटपणाही असतो. या ट्रेलासुद्धा हिरव्या शेडनेट कापडाचे किंवा साडीचे आवरण द्यावे. यातही छान भाजीपाला पिकवता येतो. हे ट्रे हाताळण्यास सोपे असतात. याशिवाय नादुरुस्त व बिघडलेल्या बॅटरीची खोकी भंगार बाजारात मिळतात, तीसुद्धा फुलझाडं फुलवण्यासाठी आपण वापरू शकतो. विविध आकारात व रंगात या बॅटऱ्या मिळत असल्यामुळे बागेत त्या उठून दिसतात. लांबलचक व बऱ्यापकी खोल असल्यामुळे यांचा उत्तम वापर चाफा, कन्हेर अशी तुलतेने मोठी फुलझाडे लावण्यासाठी करता येऊ शकतो.

आणखी वाचा : आहारवेद: रोगप्रतिकारकशक्तीसाठी कवठ खा!

प्लास्टिक आवरणाच्या बॅटऱ्या टिकावू असतात, तरी शक्यतो यात भाजीपाला पिकवू नये. या बॅटरीमध्ये शिसाचे प्रमाण असल्यामुळे ते झाडांना व मनुष्याच्या आरोग्यालाही हानिकारक ठरू शकते. या बॅटरी टेरेसवरील भिंतीवर एका ओळीत ठेवल्या तरी चालतात. तसेच यास उत्तम प्रतीची साखळी किंवा तार वापरल्यास त्याचा हँगिंग गार्डनसाठी उपयोग करता येतो.
sandeepkchavan79@gmail.com