डॉ. उल्का नातू गडम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहिंसा व सत्य हे महत्त्वाचे नियम पाहिल्यानंतर तिसरा महत्त्वाचा यम म्हणजे ‘अस्तेय’. पतंजली मुनींनी योगसूत्रांमध्ये याचे वर्णन ‘अस्तेय प्रतिष्ठायां सर्व रत्नो स्थानम्’ असे केले आहे. म्हणजेच अस्तेयवृत्ती एकदा प्रस्थापित झाली म्हणजे पृथ्वीवरील सर्व रत्ने/ सर्व साधनसंपत्ती त्याच्यापुढे ( त्याने लोककल्याणार्थ इच्छा प्रकट करताच) उपस्थित होते. ‘स्तेय’ या शब्दाचा अर्थ चोरी. ही चोरी केवळ साधनसंपत्तीची नाही तर विचारांची, लेखनाची, कसलीही असू शकते. ‘अस्तेय’ म्हणजे चोरी न करणे. म्हणजेच निरपेक्ष वृत्तीने जो लोकांची सेवा करतो /करते, कुठलाही स्वार्थ, अभिलाषा न बाळगता लोभी वृत्ती न ठेवता साधनसंपत्तीचा दुरुपयोग करत नाही, त्या व्यक्तीला कार्यामध्ये नियती मदत करते ही उदाहरणे आजही समाजात आपण पाहतो.

आज आपण दंड स्थितीतील एका आसनाचा सराव पाहणार आहोत. या आसनाचे नाव आहे एकपाद प्रणामासन. या आसनाच्या सरावासाठी प्रथम दंड स्थितीतील विश्रांती अवस्थेत या. दोन्ही पायांत अंतर, हात पाठीमागे. एका हाताने दुसऱ्या हाताचे मनगट पकडा. आता पूर्वस्थितीत या.

आणखी वाचा : “बडबड बडबड, थकतच नाहीत रे, या बायका.. !”

आता नजर समोर स्थिर करा एक पाय गुडघ्यात दुमडून टाच विरुद्ध पायाच्या मांडीच्या आतील भागावर ठेवा. दोन्ही हात नमस्कार मुद्रेत करून छातीच्या पुढे ठेवा. जर सवय नसेल तर अंतिम स्थिती डोळे मिटू नका. शरीराचा तोल जाण्याची शक्यता आहे. साधारण पाच ते सहा श्वास आसनाच्या अंतिम स्थितीत थांबून सावकाश पूर्वस्थितीला या. विरुद्ध पायाने हीच कृती पुन्हा करा.

आणखी वाचा : थायरॉइडसाठी उपयुक्त योगासन

या आसनच्या सरावाने शरीराचे, मनाचे संतुलन राखायला मदत होते.‌ पाऊल, पाय, गुडघा घोटा येथील स्नायू व सांध्यांचे स्वास्थ्य सुधारायला मदत होते. नमस्कार मुद्रेत समर्पण भाव मनात येतो. थोडासा अहंकार कमी होण्यास मदत होते.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to do eka pada pranamasana know the benefits nrp
First published on: 19-09-2022 at 15:03 IST