अश्विनी कुलकर्णी

सध्या ‘जेन झी’मध्ये आणि कपल्समध्ये, सोशल मीडिया प्लेटफॉर्मस् वरती सगळीकडे एकच चर्चा आहे, ती म्हणजे बार्बी आणि ओपनहाइमर! या दोन चित्रपटांनी थिएटर्सवरती अक्षरशः कल्ला केला आहे. यातलं एक विशेष असं, की ‘बार्बी’ या चित्रपटाच्या जागतिक तिकीट विक्रीनं १ बिलियन डॉलरच्या पुढे गल्ला गोळा केला आहे. एक स्त्री दिग्दर्शकानं (Greta Gerwig) बनवलेल्या चित्रपटानं एवढी जागतिक कमाई करण्याची ही पहिलीच वेळ!

Commenting on the problems of senior citizens Old furniture marathi movie Director Mahesh Manjrekar
रंजक नाटय़ाची फोडणी
The Phenom Story A Dream Come True entrepreneur Srikanth bolla
फेनम स्टोरी: स्वप्न सत्यात उतरवणारा श्रीकांत
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
This video of an elderly cobbler and two stray dogs in Mumbai
“जगातील सर्व श्रीमंतापेक्षा श्रीमंत आहे हा व्यक्ती”! भटक्या कुत्र्यांना प्रेमाने थोपटणाऱ्या काकांचा हृदयस्पर्शी Video Viral

तसं पाहिलं, तर आपल्यापैकी अनेकांनी खरंच लहानपणीच्या फोटोंमध्ये ,आठवणींमध्ये डोकावून बघितलं, तर ती निळ्या डोळ्यांची, सोनेरी केस असलेली, गोड फ्रॉक घातलेली ‘बार्बी’ मुलींच्या खेळण्यांमधली सगळ्यात लाडकी असायची. बार्बीचा एखादा छान फोटो किंवा वाढदिवसाला बार्बीची बाहुली भेट म्हणून मिळाली, की सगळ्यात भारी वाटायचं. हळूहळू आपण मोठे होत जातो आणि हातातलं बाहुलीचं, बार्बीचं बोट कधी सुटून जातं कळत नाही. घरातली ती छोटीशी मुलगी कधी ताई होते, कालांतराने ताईची ‘आई’ही होते, पुढे तिची खरीखुरी, छोटीशी, क्यूटशी हसणारी गोंडस मुलगी बार्बीशी खेळू लागते. आता थोडीशी ‘ऍडव्हान्स्ड’ बार्बी असते या छोटीच्या हातात. पण असा हा बार्बीचा वारसा पिढ्यानपिढ्या चालूच आहे! त्यामुळे या बहुलीचत चित्रपटाबाबत जगभर सर्वांना कुतूहल असणं साहजिकच. सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मस् वर, इंस्टाग्रामर्स, युट्युब यांच्यात सगळीकडे बार्बी चित्रपटाबद्दल बराच गाजावाजा आणि वादविवादसुद्धा होताना दिसतोय.

मुख्यतः ‘बार्बी’ चित्रपटाबद्दल असं म्हटलं जातंय, की हा चित्रपट काही गृहीतकं लादतो. उदाहरणार्थ काही मुद्दे बघितले, तर पहिला विषय अर्थातच ‘फेमिनिझम’शी संबंधित. महिला सक्षमीकरण आणि स्व- स्वीकृती. ‘बार्बीलँड’मध्ये- अर्थात बार्बीच्या जगात सगळीकडे खूप सक्षम महिला दाखवणं, ही एक छान गोष्ट आहेच, पण हे दाखवताना पुरुषांवर अन्याय होतोय का, हे बघायला हवं होतं, हा यातल्या तक्रारीचा सूर आहे.
यातली बार्बी थोडं स्वतःचंच खरं करणारी, स्वतःच्या अटींवर चालणारी दिसते. पण स्त्री सक्षमीकरण याचा अर्थ पुरुषांना वाईट कमी लेखणं असा होत नाही.

लहान मुलींच्या मनात बार्बीबद्दलची ती म्हणजे खूप छान, ‘फॅसिनेटिंग’ अशी इमेज घर करून बसलेली असते. मग बार्बीलँड मध्ये पुरुषांना दुय्यम दाखवताना नकळत आपण लहान मुलामुलींना काही चुकीचं दाखवतोय का? यावर विचार व्हायला हवा, असं खूप लोक, पालक सोशल मीडियावर म्हणताहेत.

चित्रपटात बार्बी जेव्हा रिअल वर्ल्डमध्ये- खऱ्याखुऱ्या माणसांच्या जगात येते, तेव्हा तिला पुरुषप्रधान समाजाचं वाईट चित्र बघायला मिळतं. यामध्ये असाही एक ग्रह होऊ शकतो, की सगळे पुरुष अन्याय करणारे, वाईट असतात. लहान मुलांच्या भावनिक विश्वाचा विचार करता त्यावर या विचारच परिणाम होऊ शकतो. अनेक पालक हे मुद्दे आपल्या पोस्ट्स मधून मांडत आहेत. शिवाय स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक असून त्यांचं निरोगी- अर्थात कुणी एक जण दुसऱ्यावर वरचढ नाही, तर सर्व एकमेकांना सहाय्य करताहेत, असं सहजीवन, को-एगझिस्टन्स दाखवायला हवा होता, असं खूप लोक मांडताहेत.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे चित्रपटात मुद्दाम वापरलेला गुलाबी रंग! नकळत्या, छोट्या वयात, जेव्हा नव्यानेच रंग माहिती झालेले असतात, मुलं रंग ओळखू लागतात तेव्हाच त्यांच्या मनावर इतकं बिंबवलं जातं, की गुलाबी रंग हा मुलींचा, निळा रंग हा मुलांचा! (तुम्हाला आठवत असेल, तर काही वर्षांपासून लहान मुलांसाठीच्या एका लोकप्रिय चॉकलेट कंपनीनं चक्क मुलींसाठी गुलाबी चॉकलेट, मुलांसाठी निळ्या रॅपरमधलं चॉकलेट, असंसुद्धा मार्केटिंग केलं आहे.) आपण आतापर्यंत बार्बीचे ड्रेस, लिपस्टिक, नेलपेंट, शूज, पर्स, बॅग, सगळं गुलाबी रंगाचं बघत आलेलो आहोत. त्यामुळे नकळत बालमनावर त्या गुलाबी रंगाची एक विशिष्ट छबी पडते. या गुलाबी रंगाचा मार्केटिंगसाठी अगदी पुरेपूर वापर या चित्रपटामध्ये झाला आहे.

चित्रपटातल्या सामाजिक संदर्भ असलेल्या काही गोष्टी लहान मुलांना न कळणाऱ्या आहेत त्यावरही आक्षेप घेतला जातोय.

एकूणच हा ‘बार्बी’ चित्रपट मुली, महिलांबाबतचा एक छान विषय मांडताना थोडा पुरुषांवर अन्याय करणारा असल्याच्या आरोपानं वादग्रस्त ठरतो आहे. पण नक्की या चित्रपटात आहे तरी काय, याबद्दल उत्सुकता वाटून थिएटर्समध्ये गर्दी होते आहे हे नक्की! तुम्ही बघितला का ‘बार्बी’? तुमचं काय मत आहे? मग आम्हालाही ते नक्की सांगा!

ashwinikulkarni91@gmail.com