नवीन वर्ष सुरू झालं आहे. सरत्या वर्षातल्या कटु आठवणींना मागे सारून येत्या वर्षात काही छान आठवणींसाठी आपण सज्ज होऊयात. आपल्यापैकी अनेकींची मागच्या वर्षी ठरवलेल्या येाजना पूर्ण झाल्या असतील, तर काहींच्या अपूर्ण राहिल्या असतील. पण काहीच हरकत नाही, आता या वर्षात आपण पुन्हा नव्यानं सुरुवात करू शकतोच की!

स्त्रीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती असते. अनेक आघाडींवर ती एकाच वेळेस काम करत असते. अनेक आव्हानांना सामोरं जाते, अनेक अडथळे पार करते, अनेक समस्या सोडवते. यासाठी अर्थातच प्रचंड शारीरिक आणि मानसिक क्षमता लागते. पण घरातल्या सगळ्यांच्या आरोग्याची काळजी करता करता आपण स्वत:ला तर विसरून जात नाही ना? यावर्षी मात्र आपण ठरवूयात की स्वत:कडे लक्ष द्यायचं. घरातल्या स्त्रीचं आरोग्य चांगलं असेल तर संपूर्ण घराचं आरोग्य उत्तम राहतं. आता २०२३ सुरू झालं आहे. आपण यानिमित्तानं नवीन २३ रेझोल्युशन्स ठरवूया. आपल्या व्यस्त जीवनशैलीमध्ये थोडासा फरक करूया. अधिक आरोग्यदायी आणि अधिक आनंदी होण्याचा प्रयत्न करूया. ही आपणच आपल्याला दिलेली वचनं आहेत, जी पूर्ण करण्याची जबाबदारी आपलीच असणार आहे. आपलं ह्रदय, आपली त्वचा, आपलं शरीर आणि आपलं मन सगळंकाही चांगलं ठेवण्याची ही २३ वचनं बघूयात. यातलं तुम्हाला काय जमतंय ते बघा आणि करा नव्या वर्षाची आपल्या स्वत:साठीची धमाकेदार सुरुवात…

do you have Leg Cramps in night
Video : रात्री झोपताना खूप पाय दुखतात? मग हे व्यायाम करा, व्हिडीओ एकदा बघाच
Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
big boss winner munawar faruqui
‘बिग बॉस’ विजेता मुनावर फारुकीवरून दुकानात येण्यावर दोन व्यावसायिकांमध्ये वाद, सात जणांवर गुन्हा दाखल

१. मी माझी त्वचा आणि केसांची काळजी घेईन- रोजचं स्कीन केअर रुटीन सेट करून घ्या.
२. मी रोज भरपूर पाणी पिणार आहे- समोर पाण्याची बाटली भरून ठेवा आणि त्यासाठी रिमाईंडर लावा.
३. रोज थोडा वेळ तरी व्यायामासाठी नक्की काढेन- व्यायाम आपल्या शरीरासाठी आवश्यकच आहे हेही लक्षात ठेवा.
४. मी रोज थोडा वेळ तरी मोकळ्या हवेत चालायला जाईन- हा वेळ नवी ऊर्जा देणारा असतो.
५. जंक फूड खाणं कमी करेन- आवडतं आणि सोयीचं आहे म्हणून खूप खाल्लं जातं. पण नवीन वर्षात हे प्रमाण कमी करूया.
६. प्रोसेस्ड, इन्स्टंट फूडचं प्रमाण कमी करेन- लगेचच होणारं असलं तरी त्याचे दुष्परिणामही होतात. त्यासाठीचे हेल्दी पर्याय शोधूया.
७. जेवणातल्या डाळी, हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण वाढवेन- प्रथिने, व्हिटॅमिन्स सगळंच आपण खाणं गरजेचं आहे.
८. इतरांबरोबरच स्वत:चे आवडते पदार्थही करेन- आपल्यालाही स्वत:चे लाड करण्याचा अधिकार आहे.
९. वजन कमी करण्याबरोबरच हेल्दी राहण्यासाठी प्रयत्न करेन- फक्त वजन कमी करणं नाही तर तब्येत चांगली ठेवणं हेही महत्त्वाचं आहे.
१०. किमान ८ तास तरी झोप घेईन- पुरेशी झोप होणं प्रत्येक स्त्रीसाठी अत्यावश्यक आहे.
११. वेळ व्यवस्थापन शिकेन आणि ते पाळेन- यामुळे आपलाच गोंधळ कमी होईल आणि कामंही वेळेत पूर्ण होतील.
१२. थोडा वेळ तरी उन्हामध्ये जाईन- डी व्हिटॅमिनसाठी उन्हात रोज थोडावेळ तरी जाणं गरजेचं आहे.
१३. प्रत्येक गोष्टीचा त्रास करून घेणार नाही – मी प्रत्येक वेळेस चुकीची नाही, हे लक्षात ठेवेन.
१४. ज्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्याचा ताण घेणार नाही.
१५. सुपरवुमन होण्याचा प्रयत्न करणार नाही- प्रत्येकीलाच सगळ्या गोष्टी जमतात किंवा यायला हव्यात असा अट्टहास नाही.
१६. ज्या गोष्टी पटत नाहीत त्यांना ‘नाही’ म्हणायला शिकेन- उगाचच सगळ्या गोष्टींना ‘हो’ म्हणून आपला त्रास वाढतो.
१७. नकारात्मक विचारांना सामोरे जाण्याचा प्रयत्न करेन.
१८. नकारात्मकता पसरवणार नाही.
१९. एखादे ध्येय ठेवून ते गाठण्यासाठी त्यादृष्टीने प्रयत्न करत राहीन- हे ध्येय छोटंसं का असेना, पण ते माझ्यासाठी मी ठरवलेलं असेन.
२०. आठवड्याभरातून किंवा महिन्याभरात माझ्या मैत्रीणींना भेटेन, त्यांच्याशी फोनवरून संपर्कात राहीन- मैत्रीणींना भेटणं, गप्पा मारणं हे नवीन ऊर्जा देणारं असतं.
२१. रोज थोडावेळ तरी वाचन करेन- पुस्तकं आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातात.
२२. सध्याच्या जगाशी अपडेट राहीन, नवीन तंत्रज्ञान शिकेन- नवनवीन तंत्रज्ञान प्रत्येकीला येणं गरजेचं आहे.
२३. मोबाइलच्या अति आहारी जाणार नाही- झोपताना खूप वेळ मोबाईल बघणं टाळेन. आवश्यक तेवढाच त्याचा वापर करेन.

अर्थातच या सगळ्या गोष्टी एकदम होतील असं नाही, पण आपण हळूहळू सुरुवात तर नक्की करू शकतो. हवं तर एक एक उद्दीष्ट समोर ठेवा आणि त्यादृष्टीने प्रयत्न करायला तर सुरुवात करा. त्यासाठी शुभेच्छा आणि HAPPY NEW YEAR

शब्दांकन- केतकी जोशी