राजकन्या म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर छान, लांब झगा घातलेली, सोनेरी केसांची, ऐषारामात राहणारी, फुलाच्या पाकळीसारखी नाजूक मुलगी येते. जिचे वडील राज्याची सेवा करत असतात, तर राजकुमारी सुखासीन जीवन जगत असते. तिचे लग्नही राजकुमाराशी होते. त्यामुळे दुःख, वेदना, समाजाप्रति कळकळ अशा काही भावना इथे नसतात. परंतु, उदयपूरची राजकुमारी याला अपवाद ठरली आहे. अनेक सामाजिक कामांसह महिलांच्या सक्षमीकरणात तिने सहभाग घेतला आहे. जाणून घेऊया पद्मजा कुमारी परमारविषयी…

हेही वाचा : ‘द व्हॅक्सिन वॉर’मधील ‘तो’ श्लोक आणि सृष्टिनिर्मितीचे रहस्य…

Raj Thackeray, mahayuti support
राज ठाकरे यांच्या भूमिकेत कायमच सातत्याचा अभाव
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
MLA Ram Satpute criticizes Sushilkumar Shinde on the issue of Hindutva
“…म्हणूनच सुशीलकुमारांच्या मुखातून हिंदू दहशतवाद शब्द निघाला”, आमदार राम सातपुते यांचे टीकास्त्र


पद्मजा कुमारी परमार या मेवाडच्या राजघराण्यातील आहे. त्यांचे बालपण उदयपूर येथे गेले. घरामधूनच त्यांना सामाजिक कार्य करण्याचा वारसा मिळाला. केवळ राजघराण्याचा उपभोग न घेता आधुनिकतेची दृष्टी ठेवून तिने आपल्या भागातील स्त्रियांचा विकास केला. महिला मुक्ती, सांस्कृतिक वारशांचे जतन करणे, आरोग्यसेवा पुरवणे, महिलांना शिक्षणास प्राधान्य देणे अशा अनेक कार्यांमध्ये पद्मजा कुमारी यांनी सहभाग घेतला आहे.
२०१३ मध्ये त्यांनी फ्रेंड्स ऑफ मेवाड या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत अनेक सामाजिक कामे केली जातात. ही ना नफा तत्त्वावर चालणारी संस्था आहे. उदयपूर सारख्या ऐतिहासिक शहराचा वारसा जपणे, हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे. ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, ऐतिहासिक दस्तावेज साठवणे असं काम ही संस्था करते. उदयपूरमधील सामाजिक स्तरावर मागे राहिलेल्या महिलांसाठीही ही संस्था काम करते. घुंगटाच्या पलीकडे जाऊन महिलांना सक्षम करणे, त्यांना रोजगार मिळवून देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. तसेच आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी ही संस्था मदत करते.

हेही वाचा : सहीऐवजी अंगठ्याचे ठसे घेण्याची पद्धत कधीपासून सुरू झाली ? जाणून घ्या अंगठाछाप पद्धतीचा इतिहास…
एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्स या व्यवसायाच्या विकास कार्यकारी संचालक पद्मजा आहेत. त्यांच्या घरी हॉटेल व्यवसायाचा वारसा आहे, तो त्यांनी पुढे सुरू ठेवला. न्यूयॉर्कमधील फोर सीझन्स हॉटेलसह काम करण्याचा अनुभव त्यांना यामध्ये उपयुक्त ठरला. आपल्या विविध हॉटेल्सना आंतराष्ट्रीय दर्जा देत, सोयीसुविधा यांचा विचार त्यांनी या हॉटेल्समध्ये केला. त्या कार्यरत असणाऱ्या एचआरएच ग्रुप ऑफ हॉटेल्सची सध्याची किंमत ५० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स, फतेह प्रकाश पॅलेस यासारख्या हॉटेल्सकरिता त्या कार्यरत असतात.

पद्मजा यांचा विवाह डॉ. कुश परमार यांच्याशी झाला, आणि त्यानंतर त्या बोस्टन येथे स्थायिक झाल्या. उदयपूर येथील राजघराण्यातून आलेल्या पद्मजा यांनी अमेरिकेतही आपल्या कामाची छाप सोडली. फ्रेंड्स ऑफ मेवाडचे एक कार्यालय त्यांनी अमेरिकेत सुरू केले. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी आणि हार्वर्ड मेडिकल स्कूल सारख्या संस्थांमध्ये त्या आपले आर्थिक आणि बौद्धिक योगदान देतात. अमेरिकेतील महिलांकरिताही त्या काम करत आहेत.
मुलगी सासरी गेली की ती दोन घरांना जोडते, असे म्हणतात. पद्मजा कुमारीही त्याला अपवाद नाहीत. उदयपूर आणि अमेरिका यांना जोडण्याचे कार्य पद्मजा यांनी केले. अमेरिकेत असणाऱ्या भारतीयांप्रति आपुलकीची भावना, मदतीसाठी कायम तत्पर असणे, अमेरिकेतील स्थानिकांनाही मदत करणे, अशी कामे पद्मजा कुमारी करू लागल्या.

हेही वाचा : चांगला नवरा मिळवण्यासाठी उपवास का ?

पद्मजा कुमारी परमार या सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतात. त्यांना स्वतःला खेळायला आवडते. पोहणे, टेनिस, घोडेस्वारी हे त्यांचे छंद आहेत. तर प्रवास करणे, चित्रपट पाहणेही त्यांना आवडते.

पद्मजा या केवळ राजकुमारी आहेत, राजघराण्यातील आहेत म्हणून सुखोपभोग न घेता, समाजासाठी त्यांनी कार्य केले. उदयपूरच्या इतिहासाचे जतन करण्यापासून ते अमेरिकेतील संस्थांना योगदान देण्याचेही काम त्यांनी केले. त्यामुळे त्या नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्या आहेत.