आरामाची अनुभूती, उच्चभ्रूंची पहिली पसंत इत्यादी इत्यादी कितीही भूषणे-विशेषणे लावली तरी ती कमीच पडतील की काय, असे वाटायला लावणारे नाव म्हणजे मर्सडिीज. मर्सडिीज रस्त्यावरून गेली असता तिच्या दिमाखदार मॉडेलकडे माना वळवून न बघणारे विरळाच. आपणही गाडी चालवावी, असं जेव्हा वाटायला लागतं, त्या वेळी अर्थातच पहिलं स्वप्नं असतं मर्सडिीज घेण्याचं. मात्र, प्रत्येकालाच ते शक्य असतं असं नाही. तर या मर्सडिीजचा नुकताच १२०वा वाढदिवस मोठय़ा दिमाखात साजरा झाला. 

29जर्मन तसे जात्यातच हुशार आणि कष्टाळू. त्यामुळेच जगातील ज्या ज्या नावाजलेल्या गाडय़ा आहेत, त्यातील अनेकांची निर्मिती जर्मनीतच झाली. मर्सडिीजही काही त्याला अपवाद नाही. तर या मर्सडिीजला रस्त्यावर येऊन आता १२० र्वष झाली. एक शतक आणि दोन दशकांच्या या काळात मर्सडिीजच्या रंगरूपात अनेक बदल झाले. तंत्रज्ञानात बदल झाला. गाडीच्या मॉडेल्समध्ये बदल झाला वगरे. या बदलाच्या काळाला उजाळा देण्यासाठी मर्सडिीज बेन्झ इंडियातर्फे मुंबईत नुकतेच मर्सडिीज कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. मर्सडिीजच्या जुन्या तसेच नव्या अशा तब्बल १०० गाडय़ा या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. त्यात सर्वात जास्त आकर्षण ठरली ती काळ्या रंगाची मर्सडिीज एसएलएस एएमजी कार.
30या कारमध्ये फॉम्र्युला वन सुपरकारच्या गाडीचे काही सíकट असल्याने तिच्याविषयी जास्त आकर्षण होते. वरच्या दिशेने दारे उघडणाऱ्या या गाडीचे मर्यादित उत्पादन करण्यात येणार आहे. १९४६ मध्ये युद्धभूमीवर वापरण्यासाठी तयार करण्यात आलेला मर्सडिीज युनिमॉग हा लष्करी ट्रकही या रॅलीत सहभागी झाला होता, हे विशेष. मर्सडिीज बेन्झ इंडियाचे सीईओ एबरहार्ड केर्न यांनी या रॅलीचे उद्घाटन केले.