कोणाची सखी, तर कोणाची प्रेयसी, कोणाची तर चक्क अर्धागिनीच, कोणाची हमसफर, कोणाची सुखदु:खात सहभागी होणारी जिवाभावाची मत्रीण.. आपल्या बाइकविषयी वाटणारे ममत्व शब्दांत व्यक्त करता येणे कठीण असते, मात्र असे असले तरी गेल्या वर्ष-सव्वा वर्षांपासून सुरू असलेल्या ‘मी बाइकवेडा’ या सदरात अनेकांनी आपल्या बाइकप्रेमाविषयी भरभरून लिहिले. अगदी कॅलिफोíनयापासून ते मुंबई, दुबई, तळकोकण, कोल्हापूर, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, शेजारचे इंदूर या ठिकाणांहून बाइकवेडय़ांनी आपल्या बाइकविषयीच्या भावना, कटुगोड प्रसंग या सदरात व्यक्त केले. अगदी बाइकवेडय़ा महिलाही यात मागे नव्हत्या. अनेकांच्या पत्रांना या सदरात न्याय देण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न केला. काही बाइकप्रेमींची पत्रे या सदरात प्रसिद्ध होऊ शकली नाही, याबद्दल क्षमस्व. आता वेळ आली आहे गुड बाय म्हणण्याची. ‘बाइकवेडा’ या सदराला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल समग्र बाइकवेडय़ांचे आभार. नवीन वर्ष सर्वाना सुखाचे, समृद्धीचे आणि सुरक्षिततेचे जावो, ही प्रार्थना. बाइकवेडय़ांनी बाइकबरोबरच स्वत:च्या सुरक्षेचीही काळजी घ्यावी. हेल्मेटचा वापर करावा. वेगाच्या प्रेमात जास्त पडू नका, वाहतुकीच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करा, या आवाहनासह बाय बाय! कळावे, लोभ असावा..

dr06ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. शिकताना अनेकदा मजेशीर अनुभव येतात. काही अनुभव गंभीर असतात. शिकण्याच्या या प्रक्रियेतून तावूनसुलाखून बाहेर पडल्यानंतर मिळालेले ड्रायिव्हग लायसन्स अनोखा आनंद देऊन जाते. तुमचा हा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, काही अडचणी आल्या का, तुमचा फर्स्ट हँड अनुभव कसा होता, आता तुम्ही किती सफाईदारपणे गाडी चालवता.. थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची. सोबत कारबरोबरचा तुमचा फोटोही पाठवायचा. शब्दमर्यादा २००च असावी. मग टाका गीअर आठवणींचा..
मेल करताना त्यावर ‘माझी कारकीर्द’साठी असा उल्लेख अवश्य असावा. माहिती मेल करा.. ls.driveit@gmail.com