बाइक म्हटले की, माझ्या डोळ्यासमोर फक्त बुलेटच उभी राहते. बुलेटची फायिरग ऐकली की, माझ्या हृदयाची धडधड अगदी तेज होते. त्यामुळे साहजिकच बुलेट हे माझे स्वप्न आहे आणि ते मी रोज पाहतो व जगतो. गाडय़ांमध्ये रस असल्याने बारावीनंतर मी पॉलिटेक्निकला प्रवेश घेऊन मेकॅनिकलला प्राधान्य दिले, मात्र पहिल्याच वर्षी मला पॉलिटेक्निकला रामराम करावा लागला. आता मी शेतीची कामे करून स्पर्धा परीक्षांची तयारी करतो आहे. मी हे जाणतो की, शेतकऱ्याच्या मुलाने बुलेट गाडी घेण्याचे स्वप्न पाहणे म्हणजे जरा अतिच होते; परंतु तरीही मी नेटाने काम करून आणि स्वकष्टाने बुलेट घेण्याचे ठरवले आहे. माझ्या चुलत्यांकडे ही गाडी आहे. कधी संधी मिळाली तर मी ती खूप स्टाइलने चालवतो आणि मनमुराद आनंद लुटतो. माझे मित्र नेहमी गाडय़ांविषयीच गप्पा मारतात. गप्पांमध्ये जर मी माझ्या बुलेटविषयक स्वप्नाविषयी बोललो, तर माझी ते थट्टा करतात. खरे तर मला जास्त आवाज करणाऱ्या गाडय़ाच खूप आवडतात. ‘सिंघम’ चित्रपटात बाजीराव सिंघम जसा ऐटीत बुलेट घेऊन गावात फिरतो, तसेच मलाही फिरायचे आहे; पण बुलेट माझ्या स्वकमाईची असेल, मी वाट पाहातोय.. त्या दिवसाची.

तुमच्या बाइकविषयीच्या आठवणी आम्हाला कळवायच्या. त्या आम्ही शब्दबद्ध करून ‘ड्राइव्ह इट’ पानावर प्रसिद्ध करू. सोबत तुमचा व बाइकचा फोटो असणे अत्यावश्यक. ‘मी बाइकवेडा’ या सदरासाठी असा उल्लेख जरूर करा. मग, चला उचला लेखणी आणि मारा किक.. आठवणींना..!
शब्दमर्यादा : २०० शब्द. ई-पत्ता : vinay.upasani @expressindia.com