नोकरी-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी स्वत:ची व्यावसायिक प्रतिमा निर्माण करावी लागते आणि जपावीही लागते. याकरता संभाषणकौशल्य आणि भाषाशैलीवर तुमची पकड असणे महत्त्वाचे ठरते. व्यावसायिक जगात जसे पेहरावाबाबत शिष्टाचार आहेत, तसेच संभाषणाविषयीही काही संकेतांचे पालन करणे आवश्यक असते. नीटनेटके कपडे आणि अ‍ॅक्सेसरीजबाबत दक्ष असणाऱ्या युवावर्गाने शिष्टसंमत संभाषणाविषयीही काटेकोर असायला हवे. खरेतर तुमच्या बारूपाइतकेच तुमच्या संवादकौशल्यातून आणि तुमच्या भाषेतून तुमचे व्यक्तिमत्त्व प्रतििबबित होत असते. कार्यालयीन स्तरावर संवाद साधताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल?

अचूक भाषेचा उपयोग करा.
– तुम्ही कामाच्या ठिकाणी वापरत असलेली भाषा तुमचा कामाबद्दलचा दृष्टिकोन प्रतीत करते. भाषेतील निष्काळजीपणातून कामाबाबतची अनास्था आणि निष्काळजीपणा दिसून येतो. चुकीच्या शब्दयोजनेमुळे गरसमज निर्माण होऊ शकतात. इंग्रजीतून बोलताना नेहमीच अचूक स्पेिलग व व्याकरण वापरणे आवश्यक आहे.
– उदा. ओळख करून देताना- kMyself Aditil किंवा kMy good name is Aditi. असे म्हणणे व्याकरणदृष्टय़ा चुकीचे आहे. त्याऐवजी, I am Aditi किंवा My name is Aditi म्हणणे बरोबर ठरेल. तसेच ‘क I am having all the documents चा अर्थ I am having lunch प्रमाणे ‘मी सर्व कागदपत्रे खात आहे’ असा होतो. त्याऐवजी kI have all the documents. असे म्हणता येईल.

Loksatta kutuhal The technology behind perfect intelligence
कुतूहल: परिपूर्ण बुद्धिमत्तेमागील तंत्रज्ञान
Centre for Development of Advanced Computing (C-DAC), ICT electronic, pune, pune news
वर्धानपनदिन विशेष : ‘सीडॅक’, इलेक्ट्रॉनिक ‘आयसीटी’त देशाला स्वावलंबी बनवण्याचा वसा!
BEML RECRUITMENT 2024
BEML Recruitment 2024: भारत अर्थ मूव्हर्समध्ये भरती प्रक्रिया सुरु, अर्ज करण्यासाठी काय कराल? शेवटची तारीख काय? सविस्तर वाचा
How to deal with a difficult boss
तुमचा बॉस निर्दयी स्वभावाचा आहे का? खडूस बॉसबरोबर कसे वागावे? तज्ज्ञांनी सांगितल्या खास टिप्स….

थोडक्यात आणि स्पष्ट बोला.
सर्वच क्षेत्रांतील कामे अतिशय वेगाने केली जात असतात. अशा वेगवान जगात आपले म्हणणे थोडक्यात तरीही स्पष्ट आणि प्रभावीपणे मांडण्याचा सराव करा. एकच मुद्दा पुन्हापुन्हा सांगण्याचे टाळा. तसेच ‘मी काय म्हणत होतो..’k Do you know…? kReally I wanted to sayl, kActually what happened is.. अशा अनावश्यक वाक्यरचना वगळून थेट व मुद्देसूद बोलण्याचा प्रयत्न करा. The meeting is at 3 pm in the afternoon अशी थेट माहिती द्या आणि अनावश्यक पुनरावृत्ती होईल अशी वाक्ये टाळा.

औपचारिक भाषा वापरा.
घरात किंवा मित्र-मत्रिणींशी बोलताना वापरलेली उत्स्फूर्त भाषा कामाच्या ठिकाणी वापरणे विसंगत ठरेल. बोलताना आपल्या क्षेत्राला आणि पदाला साजेसे औपचारिक शब्द वापरा. एखादा शब्द/वाक्यरचना पुरेशी औपचारिक आहे का हे ओळखण्यासाठी एक सोपा निकष वापरता येईल. हे शब्द तुम्ही लेखी पत्रात वापराल का? या प्रश्नाचे उत्तर ‘नाही’ असल्यास ते शब्द/ वाक्य अनौपचारिक आहेत असे समजायला हरकत नाही. उदा. Hey, whatls up? Awesome to see you. या अनौपचारिक स्वागताऐवजी Hello, how are you? I am happy to meet you. असे म्हणता येईल.
सहकाऱ्यांशी किंवा इतरांशी बोलताना मिसेस, मिस्टर, डॉक्टर किंवा मॅडम/सर यांपकी आदर व्यक्त करणारे योग्य संबोधन वापरा. अमेरिकन पद्धतीप्रमाणे काही कार्यालयांत सर्वजण एकमेकांना नावाने हाक मारतात; यात ज्येष्ठ-कनिष्ठ पदाचाही भेद करत नाहीत. तसेच कोणीच एकमेकांना मॅडम/ सर म्हणत नाहीत. मात्र ही अनौपचारिक संस्कृती भारतात अजूनही सर्वमान्य झालेली नाही. त्यामुळे भोवतालचे वातावरण लक्षात घेऊनच अनौपचारिक भाषेचा वापर करायचा की नाही, याचा सावधपणे निर्णय घ्यावा. औपचारिक बोलावं की अनौपचारिक अशी साशंकता असेल तेव्हा नेहमी औपचारिक भाषा वापरा.’

संभाषणाची पूर्वतयारी करा.
प्रभावी संभाषणाकरता पूर्वतयारी महत्त्वाची आहे. विषयाची संपूर्ण माहिती करून घ्या आणि आपल्याला मांडायचे असलेले मुद्दे तयार करा. जरूर वाटल्यास त्यासंबंधीची टिपणे सोबत बाळगा. मीटिंग किंवा चच्रेत विषयांतर झाल्याने एखादा महत्त्वाचा मुद्दा वगळला जाऊ शकतो. थोडय़ाशा पूर्वनियोजनामुळे बोलताना होणारा गोंधळ टाळता येतो.
सविस्तर बोलायचे असल्यास तुम्ही जी माहिती देणार आहात, त्याची रूपरेषा समोरच्या व्यक्तीसमोर मांडा. उदा. Now I am going to explain the USP of our product. Then I shall go ahead to explain the other features. Finally, I shall describe the pricing options.’ तुम्ही जर आधी रूपरेषा मांडलीत तर समोरची व्यक्ती त्यांच्या गरजेनुसार त्यात बदल सुचवू शकते. या पारदर्शी दृष्टिकोनामुळे दोघांचाही वेळ व मेहनत यांची बचत होऊ शकते.

‘एसएमएस लँग्वेज’ वापरू नका.
एसएमएस व चॅटिंगच्या सतत वापरामुळे लिखित भाषेचे एक नवीन संक्षिप्त रूप उदयास आले आहे. Later, Before, See you असे शॉर्ट फॉम्र्स रूढ झाले आहेत. L8r, B4, Cya चा वापरही सर्रास होऊ लागलाय. व्यावसायिक क्षेत्रात अजूनही संपूर्ण शब्द आणि वाक्यांचा वापर अपेक्षित आहे. कामासंबंधी एसएमएस, ई-मेल किंवा चॅट करताना असे शॉर्ट फॉम्र्स किंवा emoticons वापरू नका. त्यांचा वापर अनौपचारिक संभाषणांपुरताच मर्यादित ठेवा.

बेफिकिरीची भाषा टाळा.
Cool, Dude, Buddy शब्द हल्ली चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांमुळे लोकप्रिय झाले आहेत. या शब्दांबरोबरच आयटम, खल्लास, लय भारी असे मराठी slang शब्दही युवावर्गाच्या तोंडात सहज रुळतात. नाक्यावर, कट्टय़ावर तुमचा भाव वाढवणारी उडती, बेफिकिरीची (slang) भाषा ऑफिसपासून लांबच ठेवा. कामाविषयी तुम्ही पुरेसे गंभीर नसल्याचा आभास slang वापरून निर्माण होतो.
कामाच्या तणावाखाली शिष्टाचाराचे भान ठेवून विविध लोकांशी प्रभावी संवाद साधणे ही एक प्रकारे तारेवरची कसरतच आहे. सतत सराव, पूर्वनियोजन व परिस्थितीनुसार योग्य बदल केल्यास तुम्ही संभाषणकुशल होऊन व्यावसायिक यशाकडे वेगवान वाटचाल कराल.

प्रतिसाद अजमावणे महत्त्वाचे!
* आपल्या बोलण्याचा आशय समोरील व्यक्तीला अचूक समजला का हे पाहण्यासाठी त्यांच्या प्रतिक्रियांकडे लक्ष द्या. त्यांना प्रश्न किंवा शंका विचारण्याची संधी द्या. समोरील व्यक्तीने स्वत:हून प्रतिक्रिया न दिल्यास ‘ठीक आहे? मी पुन्हा माहिती देऊ का? यासंबंधी तुम्हाला काही प्रश्न आहेत का?’ असे विचारून खात्री करून घेता येईल.

दृष्टिकोन महत्त्वाचा!
* संभाषण हे दोन व्यक्तींमध्ये घडते. त्यामुळे बोलताना समोरील व्यक्तीच्या गरजा लक्षात घ्या. सगळी माणसे सारखी नसतात, तसेच त्यांच्याशी एकाच प्रकारे संवाद साधणे शक्य नसते. व्यक्ती आणि परिस्थितीनुसार आपली संभाषणशैली बदलून आवश्यक तसा परिणाम साधता यायला हवा.
* उदा. अनुभवी व्यक्तीला थोडक्यात सूचना देऊनही काम करून घेता येते. तर नवीन असलेल्या सहकाऱ्याला सविस्तर सूचना द्याव्या लागतात.

सौजन्यपूर्वक बोला..
* कामासंदर्भात कुणाशीही सौजन्यपूर्वकच बोलावे. ‘कृपया’, ‘माफ करा’, ‘धन्यवाद’ या जादूई शब्दांचा वापर केल्याने संभाषण अधिक सौजन्यपूर्ण होते. वयाने, अनुभवाने किंवा पदाने लहान असलेल्या व्यक्तींशीसुद्धा आदरपूर्वक बोला. शब्दच नव्हे तर बोलण्याची शैलीही सौजन्यपूर्ण असावी.
* आपला आवाज नेहमी शांत, स्पष्ट आणि प्रसन्न असावा. वैयक्तिक कारणांमुळे व कामाच्या ताणामुळे निर्माण झालेला राग इतरांवर ओरडून व्यक्त करू नये. चिडचिड करण्यापेक्षा भावनांवर नियंत्रण ठेवून आपले विचार शांतपणे मांडायचा प्रयत्न करा.
* मतभेद झाल्यास आपली बाजू बोलण्यातील आवेशाने नव्हे तर विचारांच्या बळावर सिद्ध करा. बोलताना विनाकारण हसणे, मोठय़ा आवाजात किंवा लाडीक स्वरात बोलणे तुमच्या व्यावसायिक प्रतिमेला बाधक ठरेल.
* सहकारी हे आपले जवळचे मित्र असले तरीही कामाच्या ठिकाणी योग्य अंतर ठेवून बोला.
* टोपणनावांचा वापर, वैयक्तिक गप्पा आणि हास्यविनोद कामाच्या वेळेत करू नका.
* एखाद्यासमोर त्याला न समजणाऱ्या भाषेत इतरांशी बोललात तर त्या व्यक्तीला अवघडल्याप्रमाणे वाटू शकते किंवा गरसमजही निर्माण होऊ शकतो. उदा. इंग्रजी भाषिकासमोर इतरांशी िहदीत बोलणे टाळा.
* द्वयर्थी विनोद तसेच वय, धर्म, भाषा इत्यादीवरून केलेले विनोद किंवा टिंगल असभ्य तर मानली जातेच, पण ती करणाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल करून रीतसर कारवाईसुद्धा होते.
* सहज हलक्याफुलक्या मस्करीत कुणाचा अवमान होणार नाही अथवा त्यांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घ्या.

गायत्री गाडगीळ. gayatri.gadgil@gmail.com