अंगभूत क्षमतांचा आणि गुणांचा जास्तीत जास्त उपयोग करून कामाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि आपल्या लक्ष्यापर्यंत जलद वाटचाल करण्यासाठी स्वयंप्रेरणा आवश्यक ठरते. स्वयंप्रेरणेच्या मदतीने अभ्यास जोमाने होतो.. कामाचा दर्जा राखला जातो.. आपली ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुकर होते. प्रत्येकाच्या कामगिरीत स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक बदल घडवून आणते.

ध्येयपूर्तीसाठी स्वयंप्रेरणा
– ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी काय करावे लागेल याचे नियोजन करा.
– ध्येयपूर्तीसाठी ज्या गोष्टी करायच्या आहेत, त्या प्राधान्यक्रमाने आणि एकावेळी एक करा. एका वेळेस एक काम केल्याने त्यावर लक्ष केंद्रित करता येते आणि ध्येयाच्या दिशेने कूच करता येते.
-लहान गोष्टीपासून सुरुवात करा. मनाशी ठरवलेले लहान उद्दिष्ट प्राप्त करता आले तर आपला उत्साह आणखी वाढतो आणि ध्येय साध्य करायला मदत होते.
– तुम्ही मनाशी जे ध्येय ठरवले आहे ते साध्य झाले आहे, अशी कल्पना (व्हिज्युअलायझेशन) करा.
– ध्येय अधिकाधिक सुस्पष्ट होण्यासाठी बारीकसारीक तपशीलांवर लक्ष द्या. कुठल्या गोष्टी कराव्या लागतील त्यांची यादी करा.
– समविचारी मित्रांची मदत घ्या. ध्येय साध्य करताना मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आवश्यकता भासल्यास मित्रांची मदत घ्या.
– नकारात्मक विचारांना थारा नको. आपण जे ठरवलंय ते साध्य होईल की नाही, याची भीती बाळगू नका.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : पर्यावरण पारिस्थितिकी, जैवविविधता
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Brown Rice or White Rice
कोणता भात खावा पांढरा की ब्राऊन? तज्ज्ञांनी सांगितला कोणता तांदूळ आरोग्यासाठी फायदेशीर…

स्वयंप्रेरणेचे मोल
– आयुष्यातील आव्हानांचा आणि संधींचा स्वीकार करण्यासाठी स्वयंप्रेरणा अत्यंत महत्त्वाची असते.
– भोवतालची परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वयंप्रेरणेच्या बळाच्या आधारे तुम्हाला तुमच्या आयुष्याचे नियोजन करणे शक्य होते. स्वयंप्रेरणेमुळे तुम्हाला तुमच्या आयुष्याची दिशा निश्चित करता येते, ध्येय ठरवता येते.
– स्वयंप्रेरणेमुळे जगण्याचा उत्साह वाढतो, समाधान वाढते.
– स्वयंप्रेरणेमुळे कठीण परिस्थितीशी आणि आयुष्यातील स्पर्धेशी दोन हात करण्याची ताकद मिळते.
– स्वयंप्रेरणेमुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वातील सकारात्मकता वाढते.
– तुमची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यास स्वयंप्रेरणा मोलाची मदत करते.

स्वयंप्रेरित व्हायचंय?
– तुम्हाला अमूक एक गोष्ट करायचीच आहे, असे स्वत:च्या मनाला बजावा.
– ध्येय गाठण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या गोष्टींवर नियंत्रण मिळवा.
– अत्यंत कठोर मेहनत करणाऱ्या लोकांसमवेत राहा.
– सकारात्मक राहा.
– काम करताना ‘का?’ हा प्रश्न सदैव लक्षात ठेवा.

स्वयंप्रेरणेची आवश्यकता
– दिलेल्या वेळेत कामे पूर्ण होण्यासाठी..
– कामाचा दर्जा उत्तम राखण्यासाठी..
– कामातील रूक्षता कमी व्हावी म्हणून..
– वाढीव आíथक लाभ प्राप्त होण्यासाठी ..
– कामाचे समाधान मिळावे म्हणून..
– मानसिकता सकारात्मक राहण्यासाठी..

स्वयंप्रेरित राहण्यासाठी..
– ध्येयप्राप्तीची मुदत निश्चित करा- कामाच्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी जसे स्वत:च्या मनाशी निश्चित ध्येय हवे तसेच ध्येयप्राप्तीचा कालावधी निश्चित करणेही तितकेच महत्त्वाचे असते. आपल्या महत्त्वाच्या ध्येयाची विभागणी करून लहान, सोपी पण महत्त्वाची उद्दिष्टे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने ध्येय साध्य करण्याचा हुरूप टिकतो.
– ज्ञानार्जन- ध्येयाशी निगडित, नवनव्या संकल्पना आणि विषयांची माहिती करून घेतल्याने अप्रत्यक्षरीत्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी
प्रोत्साहन मिळते.
– आनंदी, उत्साही संगत- नेहमी उत्साही, महत्त्वाकांक्षी आणि सकारात्मक व्यक्तींसोबत राहिल्याने आनंदी आणि सकारात्मक
मानसिकता होते.
– क्षमता आणि मर्यादांचे भान- स्वत:च्या मर्यादा आणि क्षमतांची वारंवार चाचपणी करून त्यानुसार आव्हाने स्वीकारणे गरजेचे ठरते. क्षमतेपेक्षा कमी किंवा जास्त आव्हानांचा स्वीकार प्रेरकशक्तीला मारक
ठरू शकतो.
– कृतिशीलता- स्वीकारलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे आणि ते काम करत राहणे प्रेरणादायी ठरते.
– वेळेचे व्यवस्थापन- वेळेत काम पूर्ण करण्यासाठी, वेळेचे नियोजन करणे आवश्यक ठरते. अप्रत्यक्षरीत्या आपल्या ध्येयपूर्तीसाठी ते साहाय्यभूत ठरते. यामुळे कामाची अचूकता वाढते तसेच कामाचा दर्जा आणि आनंदही वाढतो.
– सकारात्मक विचारसरणी- मिळालेली प्रत्येक संधी, जास्तीचा वेळ, झालेली टीका किंवा प्रशंसा या गोष्टींबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर आपण कामासाठी प्रोत्साहित होतो.

कामाच्या व्यवस्थापनासाठी प्रेरणा आवश्यक
व्यवसाय-उद्योगात कामासाठी प्रेरणा केवळ भत्ते, पगारवाढ, लाभांश (बोनस) या स्वरूपातच मिळू शकते असे नाही तर वरिष्ठांनी साधलेला अनौपचारिक संवाद, तक्रारी लक्षपूर्वक ऐकून घेणे आणि शंकांचे निरसन करणे या गोष्टीही कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करतात. काम करण्याची प्रेरणा प्रत्येक कर्मचाऱ्याला वेगवेगळ्या पद्धतीने मिळत असते. कामाच्या परिणामकारक व्यवस्थापनासाठी मोटिव्हेशनल स्किल्स आवश्यक असतात. हे प्रोत्साहन खालील प्रकारे देता येते..

– प्रत्येकाचा सहभाग मोलाचा- ध्येय साध्य होण्यासाठी सहकाऱ्यांमधील प्रत्येकाचा सहभाग नेमका किती आणि कसा महत्त्वाचा आहे, याबद्दल त्यांच्याशी संवाद साधल्याने, सहकाऱ्यांना जबाबदारीची जाणीव होते आणि आपले श्रम सत्कारणी लागल्याचे समाधान वाटून त्यांचा काम करण्यासाठीचा उत्साह दुणावतो.

– सुसंवाद- आपल्या समस्या, शंका यांचे योग्य व्यक्तीद्वारे निरसन करून घ्यावे. अडचणींबाबत शांत व संयमी भूमिका घेतल्यास मार्ग काढता येतो. काही वेळा औपचारिक संकेत बाजूला ठेवून वरिष्ठांनी सहकाऱ्यांशी केलेली अनौपचारिक बातचीत हीसुद्धा प्रोत्साहनाचे काम करू शकते. सहकाऱ्यांच्या अडचणी, मागण्या गरजेनुसार वरिष्ठांच्या अथवा कंपनीच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचवून, त्याबाबतीत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे हाही सहकाऱ्यांसाठी प्रोत्साहनाचा भाग ठरू शकतो.

– यशाचे हस्तांतरण – सहकाऱ्यांच्या उत्तम कामगिरीमुळे होणाऱ्या आíथक किंवा अन्य स्वरूपातील लाभाचे श्रेय, खुल्या दिलाने, योग्य प्रकारे विभागून हस्तांतरित केल्यास सहकारी आश्वस्त होतात आणि प्रोत्साहित होऊन पुढील कामगिरीसाठी सरसावतात.

शिफारस- वरिष्ठांनी बढती किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव, शिफारसपात्र सहकाऱ्यांची वरिष्ठांकडे शिफारस करून, त्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे गरजेचे ठरते. यामुळे सहकाऱ्यांना व्यवस्थापकाबद्दल विश्वास वाटतो आणि त्यांचे कामासाठी सहकार्य मिळते.

प्रशंसा आणि टीका – सहकाऱ्यांची सर्वासमोर आणि मोकळ्या मनाने प्रशंसा करणे अथवा एखाद्या कर्मचाऱ्याची चूक त्याला संयत स्वरूपात समजावून देणे आणि प्रत्येक सहकाऱ्याला सन्मान्य वागणूक देणे हा प्रोत्साहनाचाच मार्ग आहे. मुख्य म्हणजे यांत वरिष्ठांनी नि:पक्षपाती असणे सर्व कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी गोष्ट असते.