जगभरात अगण्य अशी संकेतस्थळे उपलब्ध आहेत, पण त्यातील काही मोजक्याच संकेतस्थळांचा वापर आपण करीत असतो. या संकेतस्थळांमध्ये काही असेही आहेत की जे खरोखरीच आपल्याला उपयुक्त अशी आहेत. ज्याचा वापर करून आपण अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो किंवा अजब विश्वातील गजब माहिती मिळवून स्वत:चे मनोरंजनही करू शकतो. अशाच काही संकेतस्थळांविषयी.

शब्दार्थासाठी
आपल्याला अनेक भाषांमधील शब्द अडत असतात. यामुळे इंग्रजीतून मराठीत तर कधी मराठीतून इंग्रजीत शब्दार्थ समजून घेणे उपयुक्त ठरते. यासाठी काही संकेतस्थळांचा वापर आपण नियमित करू शकतो.
shabdkosh.com   इंग्रजी शब्दांचे हिंदीतील अर्थ यात शोधता येतील.
itrc.iiit.net :  या माध्यमातून विविध भाषांतील ऑनलाइन डिक्शनरी डाऊनलोड करता येतील. हिंदी, तेलगू, पंजाबी, बंगाली या भाषांतील डिक्शनरी या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
acharya.iitm.ac.in  : ( इंग्लिश-संस्कृत) : आचार्य मल्टििलग्वल कम्प्युटिंग फॉर लिटरसी अॅण्ड एज्युकेशन या मद्रास येथील संस्थेने तयार केलेल्या या संकेतस्थळावर लर्न संस्कृत या लिंकवर क्लिक केल्यास वेळ, मानवी अवयव, आहार, निसर्ग, दैनंदिन जीवन, व्याकरणातील संज्ञा, व्यवसाय, नाती, मापे, पृथ्वी आणि अन्य उपग्रह इत्यादींसाठी पर्यायी शब्द मिळतील.
poetry.com : काव्यात स्वारस्य असणाऱ्यांसाठी तसंच ललित लेखन किंवा अनुवाद करणाऱ्यांसाठी ही वेबसाइट अतिशय उपयुक्त आहे. यातील नीड हेल्प रहायिमग या ऑप्शनवर क्लिक केल्यास समानार्थी शब्द, व्याख्या, वाक्प्रचार आणि अन्यही बरेच काही मिळेल.
khandbahale.com : या इंग्लिश-मराठी, मराठी-इंग्लिश, इंग्लिश-हिंदी, इंग्लिश-इंग्लिश अशा स्वरूपातील शब्द उपलब्ध आहेत.
askoxford.com ( इंग्लिश-इंग्लिश) : आस्क द एक्स्पर्ट, एन्टायर ऑक्सफर्ड डिक्शनरी, कोटेशन्स डिक्शनरी, फर्स्ट नेम डिक्शनरी आणि एन्टायर युके बुक कॅटलॉग हे पर्याय या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. इंग्रजी शिकताना येणाऱ्या बहुतेक सर्व प्रकारच्या शंका ही डिक्शनरी सोडवू शकते.

World Heritage Day 2024 Monuments In India
World Heritage Day 2024: ‘हेरिटेज डे’ म्हणजे काय? ‘या’ यादीतील किती ठिकाणांना दिलीये तुम्ही भेट?
Vipreet Rajyog
विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार
how to plant flower plant it garden
Gardening tips : उन्हाळ्यातही सदा बहरलेली राहील सदाफुली! रंगीबेरंगी फुलांसाठी लक्षात ठेवा ‘या’ टिप्स
pune marathi news, computer engineer young girl crime marathi news
विवाहविषयक संकेतस्थळावर झालेली ओळख महागात; संगणक अभियंता तरुणीची ४० लाखांची फसवणूक

हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यासाठी
भारतामध्ये साधारणत: दर आठ मिनिटांमागे एक मूल हरवते किंवा पळविले जाते. यातील चाळीस टक्केमुले सापडत नाहीत. भारतात साधारणत: ४४ हजार मुले दरवर्षी हरवतात. गेल्या वर्षी हरविलेल्या ६० हजार मुलांपकी २२ हजार मुले अद्याप सापडलेली नाहीत. मूल हरविल्याची माहिती वेबसाइट आणि सोशल नेटवìकगच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचल्यास ते सापडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे हरवलेल्या मुलांची माहिती एकत्रित करण्याच्या उद्देशाने लता एज्युकेशन सोसायटीतर्फे <www.missingperson-india.in/>हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर माहिती सातत्याने अद्ययावत होत असते.

तारीख आणि वेळ
तुम्ही सातत्याने प्रवास करीत असाल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला मोबाइल नेणे शक्य नसेल किंवा मोबाइलवर रिमाइंडर लावणे शक्य नसेल तर तुम्ही <http://www.timeanddate.com/&gt; या संकेतस्थळाचा वापर करता येणार आहे. या संकेतस्थळावर तुम्हाला जगभरातील विविध शहरांचा टाइम झोन समजणार आहे. याचबरोबर आपण असलेल्या ठिकाणापासून जगात आता किती वाजले आहे वेळांमध्ये किती फरक आहे याची माहितीही यामध्ये मिळते. याशिवाय तुम्हाला दोन तारखांमधील वर्ष, महिने आणि दिवस यातील नेमका फरक काढावयाचा असेल तरीही हे संकेतस्थळ नक्कीच मदत करू शकेल. तसेच कोणत्या तारखेला कोणता दिवस होता हेही तुम्हाला या संकेतस्थळावरून समजू शकते. यात तुम्ही तुमचे वेळापत्रक तयार करून ते पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करता येऊ शकते आणि त्याची िपट्रही घेता येऊ शकते.

गणित सोडवा
तुम्हाला कोणत्याही प्रकारचे गणित सोडवत असताना अडचण आली किंवा एखादे गणित कसे सोडवायचे हे समजत नसेल तर तुम्ही <https://www.mathway.com/&gt; या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. या संकेतस्थळावर मूलभूत गणित, बीजगणित, भूमिती असे गणितातील विविध विषयांचे विविध विभाग देण्यात आले आहेत. या विभागांनुसार येणारी चिन्हे आणि सूत्रे यामध्ये देण्यात आली आहेत. यामध्ये तुम्हाला विविध आलेखही तयार करता येऊ शकणार आहेत. यामध्ये जर तुम्ही तुमची नोंदणी केली तर तुम्हाला एखादे गणित कसे सोडविले हे समजू शकेल, पण जर नोंदणी केली नसेल तर थेट उत्तरच तुम्हाला समजू शकेल.

सरकारी संकेतस्थळे
देशात ई-गव्हर्नन्सचा प्रभाव वाढत आहे. यामुळे सर्वच सरकारी विभागांची संकेतस्थळे उपलब्ध झाली आहेत. यामध्ये केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्याच्या राज्य सरकारच्या संकेतस्थळांचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर रेल्वे तिकिटापासून इतर अनेक सेवा पुरविण्यासाठीही संकेतस्थळे सुरू करण्यात आली आहेत. या सर्व संकेतस्थळांची लिंक तुम्हाला एकत्रित हवी असेल तर <http://goidirectory.nic.in/index.php&gt; या संकेतस्थळाला भेट द्या. यावर तुम्हाला केंद्र सरकारच्या तसेच विविध राज्य सरकारांच्या विविध विभागांच्या सेवांची माहिती उपलब्ध होणार आहे. याशिवाय देशातील विविध न्यायालयांची माहितीही या संकेतस्थळावर तुम्हाला मिळू शकेल. राज्यनिहाय किंवा विभागनिहाय विभागणी केल्यामुळे पाहिजे ते संकेतस्थळ शोधणेही सोपे होणार आहे.

मन मोकळे व्हा
आपल्या मनात अनेक गोष्टी असतात. अनेक ताण असतात, पण हे ताण शेअर करण्यासाठी आपल्याजवळ कुणी व्यक्ती नसते. हीच सध्याची समस्या ओळखून  <http://www.sharingdard.com/&gt; हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर अभ्यासाचे टेन्शन असो वा मित्र-मत्रिणींची भांडणे, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम, ब्रेकअप, बॉसची कटकट, कामाचा ताण अशा अनेक समस्या तुम्ही शेअर करू शकता. तसेच याची उत्तरेही तुम्हाला मिळू शकतात. यासाठी या संकेतस्थळामध्ये १६६ तज्ज्ञ डॉक्टरांची टीम समुपदेशनाचे काम करते. यामुळे जर तुम्हाला कधी ताण आला आणि एकटेपणा वाटला तर तुम्ही नक्की या संकेतस्थळाला भेट द्या. कदाचित तुमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळू शकेल.