26 September 2017

News Flash

मोकाटांची मनमानी

म्हणूनच ट्रम्प यांनी एफबीआयच्या प्रमुखांना दूर केले

लोकसत्ता टीम | Updated: May 12, 2017 4:40 AM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

रशियाप्रकरणी आपली चौकशी होऊ नये म्हणूनच ट्रम्प यांनी एफबीआयच्या प्रमुखांना दूर केले, असा समज तेथील जनतेचा झाला असून तो अनाठायी म्हणता येणार नाही.

धडाडी म्हणजे पुढचा-मागचा विचार न करता वाटेल ती कृती करणे असे वाटणाऱ्या जगभरातील नेत्यांचे डोनाल्ड ट्रम्प हे मुकुटमणी. त्यांनी आपल्या ताज्या धडाडीदर्शक निर्णयाद्वारे अमेरिकी अंतर्गत गुप्तचर यंत्रणेचे, म्हणजे फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, एफबीआयचे प्रमुख जेम्स कोमी यांना सरळ पदावरून दूर केले. एफबीआयचे प्रमुख कोमी हे किती उत्तम कामगिरी करीत आहेत, ते किती धडाडीचे आहेत आणि आपल्याला त्यांचे कसे कौतुक आहे असे संदेश ट्वीट करून काही दिवस उलटायच्या आत ट्रम्प यांचे कोमी यांच्याबद्दलचे मत बदलले आणि त्यांनी ही कारवाई केली. एफबीआयच्या प्रमुखाची नियुक्ती ही दहा वर्षांसाठी असते. कोमी यांनी जेमतेम तीन वर्षे पूर्ण केली आहेत. ते माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या काळात नेमले गेले. यंदाच्या जानेवारी महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ट्रम्प हे कोमी यांच्या संदर्भात काही निर्णय घेतील, असे बोलले जात होते. परंतु ट्रम्प यांनी तसा निर्णय घेतला नाही आणि उलट आपला कोमी यांच्यावर किती विश्वास आहे, अशीच बतावणी सातत्याने केली. गतसाली ऐन निवडणुकीच्या काळात या कोमी यांनी ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांच्या खासगी मेल वापरण्याच्या कृतीवर टीका केली होती. त्या वेळी ट्रम्प यांनी असे धैर्य दाखवणाऱ्या कोमी यांचे कौतुकच केले. त्यानंतर दोन वेळा ट्रम्प यांनी कोमी यांची स्तुती केली. आणि अचानक अध्यक्षांनी त्यांना काढूनच टाकले. हे का घडले?

यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोमी करीत असलेली रशिया आणि ट्रम्प यांच्यातील साटेलोटय़ाची चौकशी. ट्रम्प यांना निवडणुकीच्या काळात रशियाकडून विविध मार्गानी रसद पुरवली गेली. ती आर्थिक नव्हती. तर ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांची बाजू जास्तीत जास्त लंगडी करणे हे या रसदीमागचे उद्दिष्ट होते. ते साध्य करण्यासाठी हिलरी यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यालयातील संगणकांत रशियन माहिती महाजाल चाच्यांनी घुसखोरी केली आणि ती विकिलिक्सच्या जुलियन असांज याच्या मदतीने ही घटना सर्वदूर पसरेल अशी व्यवस्था केली. हिलरी यांचा वैयक्तिक संगणक आणि हिलरी यांनाही यात लक्ष्य केले गेले. याचा फायदा अर्थातच ट्रम्प यांना होत गेला आणि जनमत त्यांच्या बाजूने झाले. अमेरिकेच्या या अध्यक्षीय निवडणुकीत रशियाचा हा हस्तक्षेप इतका ढळढळीत होता की त्याचा चांगलाच बभ्रा झाला. परिणामी या सगळ्याच्या चौकशीचे आदेश माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना द्यावे लागले. या चौकशीत ट्रम्प यांचा संभाव्य राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल फ्लिन यांनी रशियाशी संधान बांधलेले आढळून आले. युक्रेन आदी ठिकाणच्या रशियाच्या कृतीबद्दल अमेरिकेने त्या देशावर र्निबध जारी केले आहेत. ट्रम्प यांची एकदा का निवड झाली की हे र्निबध उठवले जातील असे आश्वासन या फ्लिन महाशयांनी रशियाला दिल्याचे या चौकशीत आढळून आले. ही बाब उघड झाली कारण एफबीआयकडून फ्लिन आणि रशियाचे अमेरिकेतील राजदूत किस्लियाक यांचे दूरध्वनी संभाषण नोंदवण्याचे आदेश दिले गेले होते म्हणून. या सगळ्याकडे काणाडोळा करीत ट्रम्प यांनी सत्ताग्रहणानंतर याच फ्लिन यांची सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केली. मात्र त्या वेळी फ्लिन यांच्या रशियन चुंबाचुंबीची माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवली गेली आणि परिणामी फ्लिन यांना पायउतार व्हावे लागले. ट्रम्प यांना हा मोठा धक्का होता.

त्यामुळे एफबीआयने आपल्या रशियन संबंधांपेक्षा सरकारी माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत जाते कशी याची चौकशी अधिक जोमाने करावी असा ट्रम्प यांचा आग्रह होता. ट्रम्प हे जगात सध्या अन्यत्र दिसून येतात तशा आत्मकेंद्री नेत्यांतील एक आहेत. व्यवस्था, परंपरा आदींची त्यांना काही पर्वा नाही. त्याचमुळे त्यांनी ओबामा यांच्यावर काही हीन आरोप केले. ओबामा यांनी आपल्या कार्यालयात हेरगिरीचा आदेश दिला होता हा त्यातील एक. एफबीआयने त्या आरोपास दुजोरा द्यावा असे त्यांचे म्हणणे. कोमी यांनी ते केले नाही. कारण तसे घडलेच नव्हते. तरीही एफबीआयने आपली तळी उचलावी असा ट्रम्प यांचा आग्रह होता. दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी निवडणुकीतील रशियन हस्तक्षेपाविषयी चौकशी समितीसमोर कोमी यांची साक्ष झाली. त्या वेळी कोमी यांनी हा हस्तक्षेप नाकारावा असे ट्रम्प यांना वाटत होते. कोमी यांनी तेही केले नाही. उलट रशियन हस्तक्षेपाच्या चौकशीची व्याप्ती वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तेव्हा कोमी आपल्याला डोईजड होत आहेत असा रास्त समज ट्रम्प यांनी करून घेतला आणि कायदा विभागातील आपल्या हुजऱ्या अधिकाऱ्यांकरवी कोमी यांच्या विरोधात अहवाल तयार केला. त्याचीच परिणती अखेर त्यांच्या हकालपट्टीत झाली. परंतु हा निर्णय जाहीर केल्यापासून ट्रम्प यांच्याच अडचणीत वाढ झाली असून जनमताचा झोका त्यांच्या विरोधातच जाताना दिसतो.

हा निर्णय इतका टोकाचा आणि अतिरेकी होता की ट्रम्प यांचे समर्थन करण्यासाठी पहिले जवळपास दहा-बारा तास एकही सरकारी अधिकारी माध्यमांसमोर आला नाही. कोणत्याही अन्य आत्मकेंद्रित नेत्याप्रमाणे ट्रम्प यांनी हा निर्णय घेताना अन्य कोणांस विश्वासात घेतले नव्हते. जाहीर करावयाच्या आधी फक्त एक तास आपल्या आसपासच्यांना बोलावून ट्रम्प यांनी या निर्णयाची कल्पना दिली. इतकेच काय या निर्णयापासून ट्रम्प यांनी आपल्या प्रसिद्धीप्रमुखासही लांब ठेवले. महत्त्वाचे मंत्री आदींना निर्णय जाहीर व्हायच्या वेळेलाच त्याची माहिती मिळाली. याचा परिणाम असा झाला की ट्रम्प यांच्या बचावार्थ कोणीही सुरुवातीला पुढे आलेच नाही. आपल्या विरोधात जनमत दाटत असल्याचे घरी बसून टीव्हीवर पाहणाऱ्या ट्रम्प यांनी अखेर संतापून अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तेव्हा कोठे ट्रम्प यांची बाजू समोर येऊ लागली. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. आपली रशियाप्रकरणी चौकशी होऊ नये याच हेतूने ट्रम्प यांनी कोमी यांना दूर केले असा समज अमेरिकी जनतेचा झाला असून तो अनाठायी म्हणता येणार नाही. अध्यक्षांच्या नाराजीचा झटका लागून दूर व्हावे लागलेले कोमी हे तिसरे अमेरिकी उच्चपदस्थ. स्थलांतरितांवर बंदी घालण्याच्या निर्णयास न्यायिक पाठिंबा न देणाऱ्या सॅली येट्स यांना ट्रम्प यांनी असेच दूर केले. न्यूयॉर्कचे धडाडीचे विधिप्रमुख प्रीत भरारा यांचीही ट्रम्प यांनी अशीच हकालपट्टी केली. आणि आता हे एफबीआयप्रमुख कोमी. हे सर्व ट्रम्प यांच्या राजवटीस सहा महिनेही झाले नसताना घडले. तेव्हा पुढे काय, हा प्रश्न आहेच.

या प्रकरणात ट्रम्प आणि रशियाचे पुतिन यांच्या निरंकुश सत्ताकारणाचे झालेले दर्शन हे काळजी वाढवणारे आहे. निवडून आलो म्हणजे आपण कसेही मोकाट सुटू शकतो, असे मानणारे नेते जगात अनेक देशांत आहेत. अमेरिकेतील या प्रकरणाने मोकाटांच्या या मनमानीचा जगाला असलेला धोकाच अधोरेखित होतो.

First Published on May 12, 2017 4:40 am

Web Title: donald trump fired james comey because he refused to end russia investigation marathi articles
 1. R
  Rakesh
  May 14, 2017 at 5:53 pm
  @Sameer, Mr. Kuber is the editor of Loksatta. Despite bhakt brigade full time emplo here to attack him, he is writing editorials and people are reading those that tells his authority. He has raised valid questions in this editorial. 1) why he has praised someone and then removed him when he sees that the person is not working for him but for the facts? 2) Why other ministers could not defend the decision for long time? And it is very evident that since there are no answers to these questions people have taken last shelter, written violence. By the way one of the Gujrat minister has been accused of "rape" by a women, and I am sure, that can be defended by bhakts. As long as this fire does not burn their own houses, bhakts will keep on defending. The day it happens with themselves and their family is impacted then they will realize.
  Reply
  1. S
   Santosh
   May 14, 2017 at 12:08 pm
   धडाडी म्हणजे पुढचा-मागचा विचार न करता वाटेल ती कृती करणे असे वाटणाऱ्या जगभरातील नेत्यांचे डोनाल्ड ट्रम्प हे मुकुटमणी - Sampurna Satya. Bhaktanna bombalu dya.
   Reply
   1. D
    dr snjay dev
    May 13, 2017 at 1:55 am
    The w criticism of Trump is prejudiced as expected from your paper. First this is only administration against Muslim extremists as against openly puppet administration of Democrats in the so called cooperation of Russia and USA from indian view point is not counterproductive but your papers open psudosecularism policy will not stop unless our own majority is brought to its knees and then your ultimate happiness will ensue in cal yourself the real destroyer of our nation. I strongly protest your views taken off late and hope some sanity will prevail.
    Reply
    1. R
     Rajesh
     May 12, 2017 at 10:35 pm
     अग्रलेखापेक्षा भक्तांच्या प्रतिक्रिया भन्नाट. ा वाटते की ते टृंप यांच्या जागी मोदी शोधतात . यातील बरेच परराष्ट्रसचिव होवु शकतील ईतकी विद्वत्ता ते इथे पाजळतात . अर्थात त्यात भुक्कड्पणा भरपूर. असो लोकसत्ता ने त्यांच्या साठी हे व्यासपीठ करुन देवुन विनोद निर्मितीकेली हे बरे झाले
     Reply
     1. समीर देशमुख
      May 12, 2017 at 9:00 pm
      @Rakesh अच्छा म्हणजे अग्रलेख वापस घेणारे व बालिश बुद्धी असणारे हे संपादक आणि त्यांचे तुझ्यासारखे चेले लाॅजिक वापरून लेख लिहीतात का? या लेखात काय लाॅजिक आहे? ट्रम्प जिंकल्यामुळे थोबाडावर आपटल्याने होणारी आग(कशाची ते विचारु नका) आणि तुमची ट्रम्पच्या अति अ िष्णू जमातीविरोधात(समुदाय विशेष) असणाऱ्या स्टँडमुळे होणारी जळजळ. हे लाॅजिक असणार दुसर काय. बरोबर ना!
      Reply
      1. उर्मिला.अशोक.शहा
       May 12, 2017 at 8:40 pm
       VANDE MATARAM- MR EDITOR HOW LONG WE HAVE TO TYPE COMMENTS IN ENGLISH ??? FOR MARATHI ARTICLES HOW IT IS WISE TO WRITE COMMENTS IN ENGLISH ???? PLEASE NEEDFUL AS EARLY AS POSSIABLE? JAGATE RAHO
       Reply
       1. R
        Rakesh
        May 12, 2017 at 5:32 pm
        Just because the editor writes about the policies, decisions from PM Modi, and mostly those are against, bhakt brigade is full time emplo here to counter him. The best part is that, since bhakts hate the editor, they always counter anything and everything he has written. These people can come up with bizzare logic to defend a "rape" also and can implicate the victim saying that the victim is traitor and thats why the "rape" is justified. Editor has written against Trump, and I am sure he has authority to write that, and the bhakts who are paid to bash him are unable to counter what he has written in logical manner so they resort to written violence here.
        Reply
        1. S
         Shrikant Yashavant Mahajan
         May 12, 2017 at 5:20 pm
         Power makes one blind untill one gets stuck in the mud self created
         Reply
         1. U
          umesh
          May 12, 2017 at 4:26 pm
          असे ऐकतो की संपूर्ण अमेरिकेत कुबेरसाहेबांचे ट्रंपविरोधातील अग्रलेखांचे म्हणजे इंग्रजीत अनुवाद केलेल्या चौकाचौकात वाचन होते आणि हिलरीबाईंना निवडून न देऊन आपण केवढी मोठी चूक केली आहे हे समजून अमेरिकन नागरिक एकमेकांच्या खांद्यावर डोके ठेवून ओक्साबोक्शी रडतात. लोकसत्ताने असे जागतिक विषयावर अग्रलेख लिहीणे म्हणजे फुणगूस समाचारने म्हणून आम्ही निक्सन साहेबांना निक्षून सांगतो की छाप अग्रलेखाची मोठी आवृत्ती
          Reply
          1. S
           Shriram Bapat
           May 12, 2017 at 3:28 pm
           @ Prasad . I congratulate you for your apt comments which hit the bull's eye most of the time.
           Reply
           1. H
            Hemant Kadre
            May 12, 2017 at 3:04 pm
            अमेरिकेच्या अध्यक्षांनी अमेरिकी गुप्तहेर संघटनेच्या प्रमुखाला पदावरून घालविण्यापूर्वी लोकसत्ता संपादकांशी विचारविनीमय केला असता तर आज जे अमेरिकी जनमत ट्रंप यांच्या विरोधात गेले ते गेले नसते. जगात लोकशाही असलेल्या देशांची संख्या मोजकीच आहे. यापैकी ज्या देशात "निवडून आलो म्हणजे आपण कसेही मोकाट सुटू शकतो, असे मानणारे" नेते असतील अशा देशांची नावे नमुद केली असती तर बरे झाले असते. लोकसत्ताकारांनी भारताचे नाव घेतले नसल्याने भारतात अशी स्थिती नाही असे लोकसत्ताकारांना वाटते असा निष्कर्ष निघतो. गात अनेक देशांत आहेत. रशियासारख्या देशातुन अमेरिकेत रसद पुरविली जाते व त्यायोगे ट्रंप यांच्याविरोधात कृती होते यावरून भारतातही अशी रसद बाहेरील देशांकडुन पुरविली जाते का? व त्या 'रसद' आधारे भारतातही एखाद्या राजकिय व्यक्तीविरोधात 'विकत'चे लिखाण, म्हणजे 'मोकाटांची मनमानी' होते का? हा मुद्दा समोर आला आहे. समजा असे काही असले तरी भारतीय जनता इतकी सुजाण आहे की अशा 'रसद' आधारे विरोध करणाऱ्यांना त्यांची जागा एक दिवस दाखविल्या जाईल.
            Reply
            1. S
             Suresh Raj
             May 12, 2017 at 2:24 pm
             Hyana he dakhvayache aahe.. ki hillary bai aalya astya tar sarv kahi sukhaanaiv chalale asate, Ek maatra baghta aalo aahot, hyana nischalikarana ne kkhup traas aajun sahan karave laagaat aahet, tyachya peksha loksatta la jaast traas hot aahe, Jara tya Laluprasada che godve gaanare tyachya aamrayad sampatti chya baddla bola fakt ARNAB ne theka ghetlaa aahe kaay, Purn deshat isis che atireki firat aahet tyanchya baddal kahi liha..
             Reply
             1. S
              SG Mali
              May 12, 2017 at 2:00 pm
              किती हा पराकोटीचा द्वेष. शरीराच्या रोमारोमात भरलेला द्वेष बाहेर निघत असताना सम्पादकाना किती किती यातना होत असतील याची कल्पना करणेही अतिशय कठीण आहे. जेव्हापासुन सम्पादक महाशयांच्या टुकार, द्वेषमूलक आणि भोंगळ विचारांना भीक न घालता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ट्र्म्प आणि जगातील अन्य आत्मकेंद्रीत नेते यांना त्या त्या देशातील जनतेने सत्तेवर प्रस्थापित करून सम्पादक महाशयांच्या पांडित्याचे पितळ उघडे पाडले तेव्हापसून तर या द्वेषाला पारावारच राहीला नाही आणि मग निव्वळ लाही लाही,आग, जळजळ इ.इ. उफाळून येण्याच्या मर्यादाच सुटल्या आहेत. अगदी अप्रत्यक्षपणे जनतेला मुर्ख समजणे हेपण यात आलेच. आणि शेवटी मोकाट म्हणून जे काही म्हटले आहे ते सम्पादक महाशयांना इतके चपखल लागू होते की हातात लेखणी आणि वृत्तपत्र असले व त्याबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य असले की खोट्या अ िष्णुतेच्या ख्याआडून सम्पादक किती मोकाट होतात त्याचे हे उत्तम उदाहरण.
              Reply
              1. S
               SG Mali
               May 12, 2017 at 1:08 pm
               किती हा पराकोटीचा द्वेष. शरीराच्या रोमारोमात भरलेला द्वेष बाहेर निघत असताना सम्पादकाना किती किती यातना होत असतील याची कल्पना करणेही अतिशय कठीण आहे. जेव्हापासुन सम्पादक महाशयांच्या टुकार, द्वेषमूलक आणि भोंगळ विचारांना भीक न घालता त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून ट्र्म्प आणि जगातील अन्य आत्मकेंद्रीत नेते यांना त्या त्या देशातील जनतेने सत्तेवर प्रस्थापित करून सम्पादक महाशयांच्या पांडित्याचे पितळ उघडे पाडले तेव्हापसून तर या द्वेषाला पारावारच राहीला नाही आणि मग निव्वळ लाही लाही,आग, जळजळ इ.इ. उफाळून येण्याच्या मर्यादाच सुटल्या आहेत. अगदी अप्रत्यक्षपणे जनतेला मुर्ख समजणे हेपण यात आलेच.. आणि शेवटी मोकाट म्हणून जे काही म्हटले आहे ते सम्पादक महाशयांना इतके चपखल लागू होते की हातात लेखणी आणि वृत्तपत्र असले व त्याबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य असले की खोट्या अ िष्णुतेच्या ख्याआडून सम्पादक किती मोकाट होतात त्याचे हे उत्तम उदाहरण.
               Reply
               1. J
                jit
                May 12, 2017 at 12:24 pm
                Editor shall write editorial to criticize Congress and Rahul hi, he will be immediately removed. In-fact daily writing article against BJP, Modi is nothing but Kuber's appointment on such work. I wonder, why he didn't write any article on DANAVE?
                Reply
                1. प्रसाद
                 May 12, 2017 at 11:45 am
                 तीस वर्षांपूर्वीच्या वेंकटेस्वरन प्रकरणाची आठवण झाली. मागचा पुढचा काही विचार न करता वागणारे नेते जगात अनेक असतात हे अग्रलेखातील म्हणणे किती खरे आहे याची साक्ष १९८७ राजीव गांधींनी तत्कालीन परराष्ट्रसचिव वेंकटेस्वरन यांना ज्या प्रकारे काढले होते त्यातून पटते. इतक्या ख्यातकीर्त आणि कार्यक्षम ज्येष्ठ अधिकाऱ्याला त्यांनी भर पत्रकार परिषदेत परदेशी आणि देशी पत्रकार मंडळींसमोर तिथल्या तिथे काढून टाकले होते. टीव्हीच्या माध्यमातून जगभर हा प्रसंग लाखो लोकांनी पाहिला. त्यानंतर २६ वर्षांनी त्यांच्या पुत्राने स्वपक्षाच्या सरकारचा वटहुकूम प्रत्यक्ष पंतप्रधानांच्या समोर व्यासपीठावर जाऊन सर्वांसमक्ष टरकावून फेकला होता. यालाच धडाडी म्हणण्याची चूक करता कामा नये हे म्हणणेही बरोबरच आहे कारण यातूनच व्यवस्थाशून्य परिस्थिती निर्माण होते आणि व्यक्तीस्तोम माजते.
                 Reply
                 1. समीर देशमुख
                  May 12, 2017 at 10:58 am
                  रशियाप्रकरणी आपली चौकशी होऊ नये म्हणूनच ट्रम्प यांनी एफबीआयच्या प्रमुखांना दूर केले, असा समज तेथील जनतेचा झाला असून तो अनाठायी म्हणता येणार नाही. जनतेच्या मनातील भावना अग्रलेख वापस घेणाऱ्या व अकलेने भिकारी असणाऱ्या बालिश वृत्ती असणाऱ्या कुबेरास किती कळते ते अमेरिकेच्या निवडणुकीत पाहीलेच. आणि अ ी कुबेरांनी इथे महाराष्ट्रात मराठीत(त्यातही हे वृत्तपत्र विक्रीमध्ये 1 नंबरवर आहे अ ी नाही) लिहीलेले लेख अमेरिकेत ट्रम्प ला परेशान करतील असा बालिश समज ठेवणे म्हणजे भरदुपारी बारा वाजता सुर्याकडे पाहून थुंकण्यासारखे होईल एवढीही समज संपादक महाशयांना राहीली नाही हेच या लेखातून दिसते. पण काहीही म्हणा तुमची व समस्त जिहादी, शेखुलर मंडळींची ट्रम्प वर होणारी चिडचिड पाहून हसायला येत.
                  Reply
                  1. P
                   Prashant
                   May 12, 2017 at 10:44 am
                   निवडून आलो म्हणजे आपण कसेही मोकाट सुटू शकतो, असे मानणारे नेते जगात अनेक देशांत आहेत. कृपया अशा दहा नेत्यांची नावे आम्हास समजतील का? कारण ह्या बाबतीत आम्ही खूप अज्ञ आहोत.
                   Reply
                   1. S
                    satya
                    May 12, 2017 at 10:17 am
                    tyanche te pahtil tumcha andaz chukala mhanun tyanchyawar dukh dharane chukiche ahe
                    Reply
                    1. S
                     Shriram Bapat
                     May 12, 2017 at 9:30 am
                     ट्रम्प यांच्या प्रत्येक निर्णयावर अमेरिकन जनता/पत्रकार जेवढे लक्ष ठेवत नसतील तेवढे लक्ष महाराष्ट्रातील एक संपादक ठेऊन आहेत हे ट्रम्प याना कळले तर यापुढे ते संयम बाळगतील. ट्रम्प यांचे रशियाप्रेम, त्यांचे पूतिनामावशी बरोबरचे साटेलोटे फक्त मुंबईची खबर असणाऱ्या आम्हा पामरांना कसे कळले असते ? तरी आज मोदींनी मोठ्या मोठ्या लोकांना कसे अल्लद बाजूला केले याची समांतर उदाहरणे नाहीत. येऊन जाऊन रघुराम राजन याना मुदत संपल्यावर पुन्हा ने े नाही याचा काहींना राग आला. पण ते योग्यच होते हे ्ल्या प्रकरणातील राजन यांच्या दिरंगाईमुळे लोकांना कळले. बाकी राहिला फुटकळ काकोडकर यांचा किंवा कोणी सुखदेव थोरात याना न दिलेल्या मुदतवाढीचा सवाल. पण अनेकांच्या ते लक्षात सुद्धा आले नाही. तसेच या थोरांना दिखाऊ जागी ठेवल्याने त्यांच्या संशोधनात व्यत्यय येत होता तो आता येणार नाही. तसा व्यत्यय बात्रा किंवा कुमार यांच्या बाबतीत येऊ दे कारण ते थोडेच गंभीर संशोधनकर्ते आहेत ? पण हे उल्लेख न आल्याने अग्रलेख फारच मिळमिळीत वाटला.
                     Reply
                     1. P
                      Prashant
                      May 12, 2017 at 9:10 am
                      तुम्ही काय पण म्हणा संपादक साहेब, Trump साहेबांच्यात दम हाय...सध्या असल्याच "आत्मकेंद्रित" नेत्यांची गरज जगाला आहे. २०० वर्षापूर्वी अमेरिकेच्या घटनेत निवडणुकांचे जे नियम घातले होते ते अशा वेळे साठीच घातले होते. सगळा कॉमन सेन्स गुंडाळून बसलेल्या तुमच्या सारख्या सुशीक्शितांपेक्षा अशिक्षित आणि खर्या खुर्या कामगार लोकांना आपला नेता निवडता आला. तुम्ही काय पण लिहा, आम जनतेला असलेच नेते हवेत. नाही तर तुम्ही स्वतःच्या स्वार्थ साठी आमच्या गळ्यात कोणालाही बांधायला निघाल...
                      Reply
                      1. Load More Comments