हल्ली असं एक म्हणायची प्रथा रूढ झालीये.. लोकांना अलीकडे वाचायलाच आवडत नाही, म्हणे. आणि किंडल वगरे प्रकार आल्यापासून तर पुस्तकांची विक्रीच होत नाही.

पण हे वास्तव नाही हे दाखवून देणारी काही ठिकाणं आजही आहेत..

Expired chocolate
एक्स्पायरी डेट उलटलेलं चॉकलेट खाल्ल्यानंतर दीड वर्षाच्या मुलीला रक्ताच्या उलट्या; दुकानावर कारवाई
Sangli, Citizens Rescue Crocodile, Hand Over to Forest Department, crocodile in sangli, crocodile in human area, crocodile in sangli, Rescue crocodile, crocodile Rescue,
सांगली : नागरी वस्तीत आलेल्या मगरीची नैसर्गिक अधिवासात पाठवणी
dombivli ganesh nagar marathi news, dombivli concrete road broken marathi news
डोंबिवली: पंधरा दिवसांपूर्वी तयार केलेल्या गणेशनगर मधील काँक्रीट रस्त्याची तोडफोड, नागरिकांमध्ये तीव्र संताप
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड

न्यूयॉर्कला जेव्हा केव्हा जायला मिळतं तेव्हा तिथं भेट द्यायच्या यादीत एक नाव सर्वप्रथम असतं. स्ट्रँड बुक स्टोअर. त्या महानगराची आकर्षणं अनेक आहेत. स्ट्रँडचं पुस्तक दुकान हे त्या अनेकांमधल्या पहिल्या काहींतलं.

अगदी भर मॅनहटनला ब्रॉडवेच्या रस्त्यावर हे दुकान आहे. रस्त्याच्या कोपऱ्यावरती. इंग्रजीतल्या एल अक्षरासारखा हा कोपरा पसरलाय. या दुकानाचं आकर्षण फक्त दुकान हे नाही. तर दुकानाचा एल अक्षरात पसरलेला पदपथसुद्धा तितकाच आकर्षक आहे. पुस्तकप्रेमींच्या जगात या पदपथाचं महत्त्व अनन्यसाधारण. कारण पुस्तकं तिथूनच भेटायला सुरुवात होते.

एक डॉलर, दोन डॉलर ते पाच डॉलर अशा दराच्या चिठ्ठय़ा दोन दोन फुटी कपाटांवर तिथं लावलेल्या असतात. म्हणजे त्यातलं कोणतंही पुस्तक एक डॉलरला वगरे असं. आणि ही फडताळं सर्व बाजूंनी फिरणारी. चारही बाजूंनी त्याला पुस्तकं लगडलेली. जुनी. त्यातली बरीचशी दुर्मीळ. त्यांची विषयवार मांडणी केलेली. राजकारण, समाजकारण ते वास्तुकला वगरे अशी. संपूर्ण एल पट्टय़ात एकाला लागून एक अशी ही कपाटं. आपलं विषयाचं आवडतं कपाट घ्यायचं आणि पुस्तकं शोधत बसायचं. या प्रवासात एखादा सुखद धक्का बसतोच बसतो. बऱ्याच दिवसांपासून आपण शोधत असलेलं, वाचायची इच्छा असलेलं पुस्तक त्या कपाटात अगदी सहज सापडतं.

पदपथावरची ही ग्रंथयात्राच मुळात दोनेक तास चालते. एव्हाना हातातल्या पिशवीत दहा-बारा पुस्तकं जमा झालेली असतात. ती घेऊन तोल सांभाळण्याचा आपला प्रयत्न सुरू असतो तर आतनं दुकानातनं एखादी कर्मचारी येते आणि पुन्हा नव्यानं कपाट भरते. किंवा नवीनच एखादं कपाट बाहेर आणते. म्हणजे पुन्हा तासभराची नििश्चती.

हे झालं की मग आतमध्ये जायचं. तिकडे तर बहारच बहार. दारातच अगदी आदल्या दिवशी प्रकाशित झालेली पुस्तक छान हारीनं मांडलेली असतात. त्याच्या बाजूला दोन मोठी टेबलं आणि तशीच कपाटं. त्यावर लिहिलेलं असतं, ई-पुस्तकांपेक्षाही कमी दरात. तिथेही अनेक नवनवीन पुस्तकं.

पण खरी गंमत आणखी पुढे गेल्यानंतर लागणाऱ्या कपाटांत. ही कपाटं अगदी दाटीवाटीनं उभी केलेली. शिवाय उंच. म्हणजे अगदी छताशी गेलेली. दोन कपाटांच्या मध्ये जेमतेम एखादाच जाऊ शकेल इतकीच जागा. त्यात ती शिडी. वरच्या रांगेतल्या पुस्तकांपर्यंत पोहोचण्यासाठी. या कपाटांचं महत्त्व अशासाठी की इथली सगळीच्या सगळी मांडणी ही विषयावर असते. म्हणजे इतिहास, भूगोल, राजकारण वगरे. परत इतिहासाचे कप्पे मध्ययुगीन, युरोपीय, आशियाई, अमेरिकाज असे. चरित्रांचा असा एक परत वेगळा कक्ष. त्यातही पुन्हा विषयवार विभागणी.

पुस्तकातला हा कक्ष पूर्णपणे हरखून टाकणारा. आपल्याला हव्या असलेल्या विषयाचा उल्लेख नाही आणि त्यातलं एकही पुस्तक नाही, असं होण्याची शक्यताच नाही. त्यात परत काही पुस्तकांवर लिहिलेलं, अत्यंत दुर्मीळ. दुसऱ्यावर असतं जगात सध्या उपलब्ध असलेल्या पाच प्रतींतली एक असं काही. त्यामुळे यातली काही पुस्तकं आपोआप आपल्या हातातल्या पिशवीत जातात.

ही कपाटं पाहून, त्यांची छाननी करून एव्हाना मान दुखायला लागलेली असते. हातातल्या पुस्तकांचंही ओझं असतं. आता बास असं वाटून आपण आसपास पाहायला लागतो.

जगभरातले अनेक पुस्तकवेडे आसपास असतात. आफ्रिकी. आशियाई. युरोपीय. काही प्राध्यापकी दिसणारे. काही विज्ञान संशोधक वाटणारे. मध्येच एखादा हिप्पी काळाचा इतिहास शोधत बसलेला. विषयानुरूप व्यक्तिमत्त्व असलेला. काही जणांच्या हातात वाणसामानाची असावी तशी यादी असते. ते अगदी भंजाळलेले दिसत असतात. नाकावरनं चष्मा घसरत चाललाय आणि यादीतली एकेक पुस्तकं शोधणं सुरू आहे. त्यांना काही त्याची पर्वा नसते. मध्येच मग यादीतलं एखादं पुस्तक सापडतं आणि गोंधळलेल्या चेहऱ्यावर हलकेच स्मित उमटतं.

किती पुस्तकं असावीत इथं?

२५ लाख. साडेतीन मजल्यांचा संसार आहे या दुकानाचा. गेली जवळपास ८९ वर्षांचा. १९२७ साली बेंजामीन बास या गृहस्थानं हे दुकान सुरू केलं. त्या वेळी जागा ही नव्हती. पलीकडच्या गल्लीतला पुस्तकांचा रस्ता..त्याचं नावच बुक रो.. ही या दुकानाची पहिली जागा. त्या वेळी आसपास फक्त पुस्तकांची अशी ४८ दुकानं होती.

आता फक्त एक राहिलंय. स्ट्रँड बुक स्टोअर.

आता दंतकथाच बनून गेलंय ते. अनेक सिनेमांत वगरे तर ते दिसतंच. पण त्याचबरोबर ज्या काही नवनव्या सेवा ते देतं ते दुकानाच्या व्यवस्थापनाचं चातुर्यच दाखवतं. म्हणजे स्ट्रँड अनेक कंपन्या, खासगी व्यक्ती किंवा संस्था यांना स्वत:च वाचनालय उभं करून देतं. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात. म्हणजे आपण फक्त आपल्याला कोणत्या विषयाची किती पुस्तकं हवी आहेत, जागा किती आहे वगरे तपशील द्यायचा. स्ट्रँड आपल्याला अख्खं वाचनालय उभं करून देतं. परत आणखी वैशिष्टय़ म्हणजे हे पुस्तक विक्रीचं दुकान असलं तरी आपलीही पुस्तकं ते घेतं. त्यामुळे अनेक व्यक्तींचा खासगी संग्रह इथे आपल्याला सहज सापडतो. काही काही जुनी पुस्तकं मग स्ट्रँडतर्फे विकायला काढली जातात.

बेंजामीननंतर त्याच्या मुलामुलींनी या पुस्तकाचा व्याप उत्तम सांभाळलाय. तब्बल २०० कर्मचारी आहेत या दुकानात. यावरून त्याच्या उलाढालीची कल्पना यावी. आता तर ओरेगॉनचे खासदार रॉन वायडेन हे स्ट्रँडच्या मालकापकी एक आहेत. बासच्या नातीनं त्यांच्याशी विवाह केल्यानंतर ते स्ट्रँड व्यवस्थापन परिवाराचे घटक झाले. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार आहेत ते. एखाद्या खासदारानं ग्रंथव्यवहाराचं दुकान चालवावं, म्हणजे जरा फारच.

हल्ली असं एक म्हणायची प्रथा रूढ झालीये.. लोकांना अलीकडे वाचायलाच आवडत नाही, म्हणे. आणि किंडल वगरे प्रकार आल्यापासून तर पुस्तकांची विक्रीच होत नाही.

अशांनी स्ट्रँडसारख्या दुकानांना भेट द्यावी. दुकानातल्या व्यवस्थापकाला हा प्रश्न मी विचारला.. काय परिणाम झाला हो तुमच्यावर ई-पुस्तकांमुळे? त्यानं मागच्या गर्दीकडे बोट दाखवलं आणि विचारलं. डु यु िथक सो?

किंडलनं पुस्तक वाचण्याची सवय बदलली अशी तक्रार अनेक जण करतात. काही प्रमाणात ती रास्तही आहे. कारण बार्न्‍स अ‍ॅण्ड नोबेल्ससारखी अनेक दुकानं बंद पडायच्या मार्गावर आहेत. काही बंद पडलीदेखील. न्यूयॉर्कचं स्ट्रँड, लंडनला ऑक्स्फर्ड स्ट्रीटवरची काही असे अपवाद. पण गंमत अशी की किंडल आहे म्हणून पुस्तकं विकत घेणाऱ्यांचं, ती छापणाऱ्यांचं आणि अर्थातच वाचणाऱ्यांचं प्रमाण कमी झालंय असं नाही. म्हणजे पुस्तकाच्या दुकानाचं महत्त्व कमी झालेलं नाही.

ही बाब पुढे सिएटलमध्ये अधोरेखित झाली. सिएटल हे अ‍ॅमेझॉनकर्ता जेफ बेझोस, मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स यांचं गाव. किंडल हे अ‍ॅमेझॉनचं अपत्य. सिएटलमध्ये म्हणून अ‍ॅमेझॉनचं कार्यालय आणि बेझोस याचं घर पाहायचं होतं. पाहता आलंही. पण एका नवीन वास्तूनं चक्रावलं.

ही वास्तू अ‍ॅमेझॉननं बांधलेली. कशासाठी?

पुस्तकाच्या दुकानासाठी. म्हणजे अ‍ॅमेझॉननं पुस्तक विक्रीवर गदा आणली असं म्हटलं जात असताना, पुस्तक विक्री कालबाह्य़ झालीये असं काही म्हणत असताना स्वत: अ‍ॅमेझॉननं मात्र पुस्तकाचं दुकान काढलंय.

ते पाहिलं आणि स्ट्रँडवरची पाटी आठवली.  18 Miles Of Books. म्हणजे या दुकानातली पुस्तकं एकापुढे एक लावली तर १८ मलांचं अंतर भरेल.

डिजिटल क्रांतीनं सगळं जग व्यापलंय. पण १८ मलांची ही ग्रंथयात्रा तशीच सुरू आहे.

girish.kuber@expressindia.com

@girishkuber