देशातील प्रमुख उद्योग क्षेत्राचा मार्चमधील प्रवास शून्यावर रेंगाळला आहे. ०.१ टक्के घसरणीसह मार्चमधील उद्योग क्षेत्राची वाढ ही गेल्या १७ महिन्यांतील तळात विसावली आहे.
स्टील, सिमेंट तसेच इंधनाच्या घसरत्या उत्पादनामुळे मार्चमधील आठ उद्योगांची वाढ फेब्रुवारीतील १.४ टक्के व वर्षभरापूर्वीच्या, मार्च २०१४ मधील ४ टक्क्यांपासून दुरावली आहे. प्रमुख उद्योग क्षेत्र यापूर्वी ऑक्टोबर २०१३ मध्ये शून्य स्थितीत होता. २०१४-१५ दरम्यान आठ उद्योग क्षेत्रांची वाढही वर्षभरापूर्वीच्या ४.२ टक्क्यांवरून यंदा ३.५ टक्क्यांपर्यंत मंदावली आहे. एकूण उत्पादन क्षेत्रात आठ प्रमुख उद्योगांचा हिस्सा ३८ टक्के आहे.