अमेरिका आणि इंग्लंडनंतर गुगल आता भारतात स्वतःच्या मालकीचे कार्यालय उघडणार आहे. हैदराबादमध्ये हे कार्यालय असणार असून, त्यासाठी तेलंगणा राज्य सरकारशी करार करण्यात येणार आहे. गुगलचे सध्या हैदराबादमध्येच भारतातील कार्यालय आहे. मात्र ती जागा भाड्याने घेतलेली आहे.
तेलंगणा राज्य सरकारमधील माहिती विभागाचे सचिव हरप्रित सिंग यांनी गुगलच्या या नव्या निर्णयाबद्दल माहिती दिली. गुगलला हैदराबामध्ये स्वतःचे कार्यालय सुरू करण्यासाठी जागा देण्यात येणार असून, त्यासाठी त्यांच्यासोबत लवकच सामंजस्य करार करण्यात येईल, असे सिंग यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत केवळ अमेरिका आणि इंग्लंडमध्येच गुगलची स्वतःची कार्यालये आहेत. भारतातील इंटरनेटधारकांच्या संख्येमध्ये होत असलेली लक्षणीय वाढ लक्षात घेऊनच गुगलने येथे स्वतःचे कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जाणकारांचे मत आहे.