अल्प प्रतिसादाअभावी निर्गुतवणुकीचे उद्दिष्ट कमी करणाऱ्या सरकारची चालू आर्थिक वर्षांतील सर्वात मोठी हिस्सा विक्री येत्या सोमवारी होऊ घातली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशनमधील १० टक्के हिस्सा सरकार विकणार आहे. यासाठी सोमवारी, २४ ऑगस्ट रोजी कंपनीतील २४.२८ लाख समभाग बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जात आहेत. याद्वारे सरकार ९५०० कोटी रुपये उभारण्याची शक्यता आहे. कंपनीत सरकारचे ६८.६० टक्के भागभांडवल आहे. दरम्यान, मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या समभागाला शुक्रवारी ०.७० टक्के कमी भाव मिळत मूल्य ३९४.४५ रुपये मिळाले. निर्गुतवणुकीसाठी होणाऱ्या भागविक्रीत समभागासाठी बोलीची किमत शनिवारी सायंकाळी जाहीर होणार आहे.