गृहवित्त क्षेत्रातील अग्रणी ‘एचडीएफसी’ने रिझव्‍‌र्ह बँकेने केलेल्या कपातीनंतर त्याचा लाभ ग्राहक-कर्जदारांना देण्याच्या हेतूने गृहकर्जाचे व्याजदर ०.१० टक्क्यांनी कमी केले आहेत. कंपनीचा नवा किरकोळ प्राधान्य ऋणदर (आरपीएलआर) बुधवारपासून अंमलात येत आहे. यानुसार ३० लाख रुपयांर्पयच्या कर्जाचा व्याजदर १०.१५ टक्के तर त्यापेक्षा अधिक रकमेच्या कर्जाकरिता १०.४० टक्के राहिल. कंपनीने याचबरोबर अनिवासी भारतीयांसाठीही कर्ज व्याजदर कमी केला आहे. याच समूहातील एचडीएफसी बँकेने गेल्याच आठवडय़ात वाहन कर्ज व्याजदर अर्धा टक्क्यापर्यंत कमी केले होते.