‘सेन्सेक्स’ने सलग तिसऱ्या आठवडय़ात नकारात्मक कामगिरी बजावत २०१३ मधील नवा नीचांक गाठला आहे. शुक्रवारी सप्ताहाची अखेर करताना मुंबई निर्देशांक २९.०३ अंशांने घसरत १९,४६८.१५ पर्यंत खाली आला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ही ९.५५ अंश घसरणीसह ५,८८७.४० वर बंद झाला.
‘सेन्सेक्स’ने कालच्या सत्रातही शतकी नुकसान नोंदविले होते. भांडवली बाजारात सलग तिसऱ्या सत्रात घसरण नोंदविताना आठवडय़ाच्या शेवटच्या व्यवहारात माहिती तंत्रज्ञान निर्देशांक (-०.५८%), तेल व वायू निर्देशांक (-०.८३%) विक्रीच्या माऱ्याने घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीज (-१.२०%), डॉ. रेड्डीज लेबोरेटरीज (-३.५५%), डीएलएफ (-२.०३%) यांच्यासह बजाज ऑटो, मारुती सुझुकी यांची घसरणीत आघाडी राहिली.