तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

‘निफ्टी १०,०००चा पल्ला कधी गाठणार?’ बाजाराचा चढता क्रम पाहता सर्वाची उत्कंठा व्यक्त करणारा हा प्रश्नच गेल्या आठवडय़ातील या स्तंभातील लेखाचे शीर्षक होते. प्रत्यक्षात या आठवडय़ात निर्देशांकाचे सातत्याने प्रयत्न हे दशसहस्र लक्ष्य गाठण्याकडेच होते. निर्देशांक त्यात यशस्वीही ठरत असून, अवघे लक्ष्य दृष्टिपथात असल्याने हुरहुर वाढली आहे. तर मग हे लक्ष्य सोमवारच्या व्यवहारातच गाठलेले दिसेल काय? पुढचा आठवडा कसा असेल याचा आढावा घेऊया.

UPSC Preparation Facing the Prelims Exam
यूपीएससीची तयारी: पूर्व परीक्षेला सामोरे जाताना..
dene samajache marathi news, dene samajache initiative pune marathi news
स्वयंसेवीक्षेत्राला पाठबळ देणारा ‘देणे समाजाचे’ उपक्रम!
jayant chaudhary
दहा दिवसांनंतरही रखडतोय RLD चा NDA प्रवेश; भाजपाच्या मनात नेमके काय?
conservation of land component important in agriculture business
क्षारपड जमिनीचे पुनरुज्जीवन

पुढील आठवडा कसा?

शुक्रवारचा बंद भाव  :

 सेन्सेक्स- ३२,०२८.८९

 निफ्टी-   ९,९१५.२५.

पुढील आठवडय़ात सेन्सेक्स/ निफ्टी निर्देशांकांची ‘कल निर्धारण पातळी’ ही ३१,६०० / ९,८०० असेल व या स्तरावरच निर्देशांक आहे. तो तसाच राहत असेल तर निर्देशांक – सेन्सेक्स ३२,५०० / व निफ्टी १०,०००चा जादुई आकडा गाठेल. या सर्व वरच्या चढाईत अनपेक्षितरीत्या निर्देशांक ३१,४०० / ९,७५० पर्यंत जरी खाली आला तरी निर्देशांकाचे वरच लक्ष्य हे ३२,५०० /१०,००० तर आहेच पण या तेजीच्या पर्वाचे अंतिम लक्ष्य हे त्याहून अधिक ३३,००० /१०,१०० ते १०,३०० असे असेल.

लक्षवेधी समभाग..

बजाज हिंदुस्थान लि. 

शुक्रवारचा बंद भाव : १६.४५ रु.

बजाज हिंदुस्थानचा १६.४५ हा बाजारभाव २०० (१५.०७), १०० (१५.०८), ५० (१५.४०), २० (१५.१०) या सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर आजचा बाजारभाव आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा रु. १३ ते १७ असा आहे. रु. १८च्या वर शाश्वत तेजी सुरू होऊन रु. २०, २२, ३० ही वरची इच्छित उद्दिष्टे असतील. या दीर्घकालीन गुंतवणुकीला रु. १३चा स्टॉप लॉस ठेवावा.

सोने किमतीचा आढावा : सद्य:स्थितीत सोन्याच्या भावात मंदीच्या वातावरणातील तेजीची झुळूक चालू आहे. गेल्या आठवडय़ात नमूद केलेल्या पट्टय़ात (बॅण्ड) २७,६०० ते २८,५०० या दरम्यान सोन्याच्या भावाचे मार्गक्रमण चालू आहे. रु. २८,५०० ही ‘कल निर्धारण पातळी’ आहे. रु. २८,५००च्या वर २८,७०० ते २९,००० ही वरची उद्दिष्टे असतील अन्यथा सोन्याचे भाव सातत्याने रु. २८,००० च्या खाली राहिल्यास सोने २७,७०० पर्यंत खाली येऊ शकते.

 

अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी स्टॉप लॉस व इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आशीष अरिवद ठाकूर

ashishthakur1966@gmail.com

(सोन्याचे भाव एमसीएक्सवरील व्यवहाराचे आहेत.)