सध्या २६ हजाराच्या वर सेन्सेक्स असताना कुठला उत्तम शेअर घ्यावा ज्याच्यात आपले नुकसान होणार नाही, असा प्रश्न अनेकांना पडणे साहजिक आहे. अशावेळी उत्तम व्यवसाय आणि ऊतम प्रवर्तक असलेली कंपनी निवडणे कधीही उत्तम. म्हणूनच पोट्फरेलिओत यंदा ओरॅकलची शिफारस करण्यात येत आहे.
१९८९ मध्ये सिटीकोर्प इन्फॉम्रेशन टेक्नोलोजिसनंतर आय फ्लेक्स सोल्यूशन्स आणि आता ओरॅकल फिनान्शियल सव्र्हिसेस सॉफ्टवेअर लिमिटेड (डारर) ही केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील एक मोठी सॉफ्टवेअर कंपनी असून १३० देशांतील ८०० पेक्षाही अधिक वित्तीय संस्था तसेच बँकांसाठी ती कार्यरत आहे. ओरॅकल या नावातच मोठी ताकद आहे. विक्री, विपणन आणि सहाय्य यासाठी कंपनीच्या २७ देशांमध्ये शाखा असून भारताखेरीज अमेरिका, नेदरलँड आणि सिंगापूर येथे तिच्या चार उपकंपन्या आहेत. फ्लेक्सक्युब, डे ब्रेक, मनतास, प्राइम सोìसग, आय फ्लेक्स कन्सल्ट, आयपीएफबी इत्यादी ब्रॅंड आणि पेटंट्स असलेली ही कंपनी भारतातील एक सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. बँक आणि ओरॅकल हे परस्परांशी निगडीत असल्याने कुठलीही बँक म्हटली की डोळ्यासमोर येते ती ओरॅकल.  कंपनी सातत्याने उत्तम कामगिरी करत असून जून २०१४ साठी जाहीर झालेले आíथक निष्कर्ष अपेक्षेप्रमाणेच चांगले आहेत. पहिल्या तिमाहीच्या उलाढालीत कंपनीने गेल्या वर्षीच्या तुलनेत २१.९८% वाढ दाखवून ती ९०६.९५ कोटी तर नक्त नफ्यातही २१.२१% तो ३४६.८९ कोटी रुपयांवर गेला आहे. कुठलेही कर्ज नसलेली आणि गेल्या वर्षभरातील उच्चांकावर असलेला हा शेअर तुम्हाला थोडा महाग वाटेल कदाचित; मात्र दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही निवड योग्यच ठरेल यात शंका नाही.