portfolio4टोरंट फार्मा ही भारतातील एक आघाडीची औषध निर्मात्री कंपनी असून जागतिक बाजारपेठेतही तिने लक्षणीय स्थान निर्माण केले आहे. मुख्यत्वे काíडओ व्हॅस्क्युलर (CV) आणि सेंट्रल नव्‍‌र्हस सिस्टीम (CNS) यांच्यावर प्रभावी औषधे निर्माण करणारी ही कंपनी डाएबेटिक, अ‍ॅण्टी इन्फेक्टिव्ह आणि वेदनाशामक औषधांची देखील उत्पादन करते. जगभरातील ५० हून अधिक देशांत आपल्या औषधांची विक्री करणाऱ्या टोरेंटचे भारतात दोन औषध उत्पादन कारखाने असून त्यातील एक हिमाचलमधील बड्डी येथे तर दुसरा गुजरातमध्ये इंद्रद येथे आहे. कंपनीच्या युरोप, अमेरिका, लॅटिन अमेरिका तसेच आशिया पॅसिफिकमध्ये नऊ उपकंपन्या आहेत.
av-03
१९७२ साली स्थापन झालेली टोरेंट समूहाची ही पहिली कंपनी असून गेल्या ४२ वर्षांत कंपनीने मोठा पल्ला गाठला असून आपला विस्तारही चांगलाच वाढवला आहे. कंपनीने नुकतीच एल्डर फार्मा ही कंपनी ताब्यात घेतल्यामुळे आता टोरेंटकडे तिचे नवीन ३० ब्रॅंड आले आहेत. एल्डर फार्माची ही बहुतांशी उत्पादने ‘ओटीसी’ प्रकारात येणारी असून त्यामध्ये ‘शेलकॅल’ या प्रसिद्ध कॅल्शियम सप्लीमेंटचाही समावेश आहे. शेलकॅलचा भारतीय बाजारपेठेतील हिस्सा ३०% आहे. एल्डर फार्मा ताब्यात घेतल्यामुळे आता टोरेंटचे जाळे चांगलेच वाढले असून तिची औषधे आणि ओटीसी उत्पादने देखील बऱ्यापकी वाढली आहेत. अर्थात एल्डरसारखी मोठी कर्ज असलेली कंपनी ताब्यात घेतल्यामुळे कंपनीचे कर्जदेखील वाढेल आणि त्याचा नफ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. परंतु एल्डरच्या उत्पादनांची भाववाढ करणे तसेच येत्या दोन वर्षांत कंपनी भारत आणि अमेरिकेतील उलाढालीत वाढ करून कर्जाचा भार कमी करेल, अशीही अपेक्षा आहे.
सध्या हा शेअर उच्चांकावर असला तरीही वेळोवेळी खरेदी करून मध्यम- दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी टोरेंट फार्मा साठवत चला.   stocksandwealth@gmail.com

international monetary fund praises india for maintaining fiscal discipline in election year
निवडणूक वर्षातही भारताकडून वित्तीय शिस्त कायम; आंतरराष्ट्रीय़ नाणेनिधीकडून कौतुक; आघाडीच्या देशांमध्ये स्थान कायम राहणार
What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Bhiwandi lok sabha
महाविकास आघाडीत भिवंडीची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला ?
Tata Altroz Racer to launch in coming weeks
मारुती, महिंद्रा, ह्युंदाईची उडाली झोप, टाटा ‘या’ हॅचबॅक कारला देशात आणतेय स्पोर्टी अवतारात; कधी होणार विक्री?