(उंदीरमामाचं वेलकम् कार्ड)

साहित्य – कार्डपेपर, कात्री, गम, स्केचपेन, क्रेयॉन्स, ज्युट कॅनव्हासचा तुकडा, झिगझॅग कात्री, इ.

कृती- प्रथम कार्डपेपरला मध्यावर दुमडून त्यावर इतर रंगीत कागद व ज्युट कॅनव्हासचे घर  बनवा व सुशोभित करा.

आतील भागात मध्यभागी बिळासारखे, दुसऱ्या रंगाचे कागद शंकरपाळ्याच्या आकारात अर्धे उजवीकडे, अर्धे डावीकडे चिकटवून घ्या. वेगळ्या पांढऱ्या कार्डपेपरवर मध्यावर दुमडून उंदीरमामाचे मोठ्ठे कान व तोंड काढा. हात, पाय, धड काढा. (आकृतीत दाखविल्याप्रमाणे) दुमडलेले असतानाच कापून घ्या. बाहेरच्या बाजूस दुमडा; पण चिकटवताना मागील बाजूस गम लावा. छायाचित्रात दाखविल्याप्रमाणे उंदीरमामा चिकटवून घ्या. नाक, डोळे, मिशा स्केचपेनने काढा व थोडेसे रंगकाम क्रेयॉन्सने करा. वेगळ्या रंगाची साधारण दीड इंच बाय सहा इंचाची पट्टी झिगझॅग कात्रीने कापा व मधोमध दुमडून घ्या. दोन्ही बाजूस समांतर संदेश लिहा व रंगवा. उंदीरमामाप्रमाणेच हे संदेश बाहेरील बाजूस दुमडा व चिकटवून घ्या. झाले आपले उंदीरमामाचे वेलकम कार्ड तय्यार!

bal04

अर्चना जोशी muktkalanubhuti@gmail.com