कृषी संशोधन विकास परिषदेतर्फे प्रशासकीय अधिकारी निवड परीक्षा-२०१४ अंतर्गत प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या निवड परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.
जागांची संख्या व तपशील : एकूण उपलब्ध जागांची संख्या १० असून यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
आवश्यक पात्रता : अर्जदारांनी कुठल्याही विषयातील पदवी कमीत कमी ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. त्याशिवाय ते संगणक विषयातील पात्रताधारक असायला हवेत.
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय ३० वर्षांहून अधिक नसावे.
निवड परीक्षा : अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा देशातील निवडक परीक्षा केंद्रांवर २३ नोव्हेंबर २०१४ रोजी घेतली जाईल. त्यामध्ये राज्यातील मुंबई व नागपूर या परीक्षा केंद्रांचा समावेश आहे.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
वेतनश्रेणी व लाभ : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १५,६००-३९,१०० + ५,४०० या वेतनश्रेणीत इतर भत्ते व लाभांसह नेमण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून ५०० रु. रोखीने प्रवेश शुल्क म्हणून सिंडिकेट बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती : अर्जाचा नमुना आणि अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २६ जुलै ते १ ऑगस्ट २०१४ च्या अंकात प्रकाशित झालेली कृषी संशोधन विकास मंडळाची जाहिरात पाहावी अथवा मंडळाच्या http://www.icar.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख : संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१४.