बीई/एमएस्सी उमेदवारांना पीएच.डी/ग्रुप अधिकारी होण्याची संधी

टीआयएफआरच्या होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशनमध्ये पीएच.डी. प्रवेशासाठी अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे. हा प्रोग्राम  शिक्षणप्रक्रियेशी संबंधित असून ज्यांना विज्ञान शिक्षण क्षेत्रात रस आहे, अध्यापनाची आणि लिखाणाची आवड आहे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रक्रियेबाबत जिज्ञासा आहे, विश्लेषणात्मक कौशल्य आहे अशा युवा उमेदवारांची प्रवेश परीक्षा २२ मे २०१६ रोजी घेतली जाईल. मुलाखत जूनच्या तिसऱ्या आठवडय़ात होईल. शैक्षणिक अर्हता- एम.एस्सी. (कोणत्याही विषयात)/ एम.एस.डब्ल्यू/ एम.ए. (कॉग्निटिव्ह सायन्स/ सायकॉलॉजी एज्युकेशन) बीई/ बीटेक/ एमबीबीएस. परीक्षा शुल्क-  रु. ४००.

अधिक माहिती www.hbcse.tifr.res.in/graduate या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्ज www.hbcse.tifr.res.in/admission या संकेतस्थळावर  ३१ मार्च २०१६ पर्यंत करावेत. शिष्यवृत्ती – रु. २५ हजार दरमहा नोंदणीपर्यंत. नोंदणीनंतर रु. २८ हजार दरमहा (दोन्हीवर ३० टक्के घरभाडे भत्ता अधिक). आनुषंगिक खर्चासाठी वार्षकि रु. ३२ हजार.

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली येथे पदभरती 

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (फायनान्स)- ४६ पदे. पात्रता-  सी.ए./आयसीडब्ल्यूए

एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (ह्य़ुमन रिसोर्स)- २५ पदे. पात्रता- पदवी + मॅनेजमेंटमधील २ वर्षांची पदवी/पदविका. वयोमर्यादा- (१) अणि (२) साठी २९ वष्रे.

ट्रेनी असिस्टंट (केमिस्ट)- २५ पदे. पात्रता- एमएस्सी (केमिस्ट्री) किमान ६० टक्के गुणांसह. अंतिम वर्षांचे विद्यार्थी अर्ज करू शकतात. वयोमर्यादा-  २७ वष्रे.

निवड पद्धती- बहुपर्यायी पद्धतीची ऑनलाइन चाचणी मे २०१६ च्या पहिल्या आठवडय़ात घेतली जाईल. या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असून प्रत्येक चुकीच्या उत्तराला १/४ गुण वजा होतील. अर्ज ऑनलाइन पद्धतीने  www.ntpccareers.net या संकेतस्थळावर २९ फेब्रु. २०१६ पर्यंत करावा.

केंद्रीय राखीव पोलीस दलात कॉन्स्टेबल (तांत्रिक/ट्रेडस्मन) च्या  १९० पदांची भरती

रिक्त पदे- पुरुषांसाठी-  सीटी ड्रायव्हर- ३८ जागा. फिटर- १३ . बगलर- ३३. कुक- ३९. वॉटर कॅरिअर- २२. सफाई कर्मचारी- १५. टेलर- ४. कॉबलर- ४. बार्बर- ४. वॉशरमन- ३. आणि इतर- ५.

महिलांसाठी-  सीटी- सफाई कर्मचारी- ३. वॉशर वुमन- २. इतर- ५.

वयोमर्यादा- सीटी- ड्रायव्हरसाठी. २१-२७ वष्रे. इतरांसाठी- १८ ते २३ वष्रे (अजा/अज, ५ वष्रे, इमाव ३ वष्रे शिथिलक्षम) शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण. तांत्रिक पात्रता- सीटी-ड्रायव्हर – वाहतूक वाहन चालकाचा परवाना. सीटी- फिटर- मेकॅनिक मोटर वेहिकलमधील आयटीआय + १ वर्षांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव. अन्य ट्रेड्ससंबंधित ट्रेडमध्ये कामाचा अनुभव व व्यावसायिक क्षमता.  शारीरिक प्रमाणबद्धता-  उंची : पुरुष- १७० सेंमी, महिला- १५७ सेंमी, छाती- पुरुष ८०-८५ सेंमी, अर्ज शुल्क- ५० रु. (महिला /अजा/ अजसाठी फी माफ) अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.crpfindia.com वर १० मार्च पूर्वी करावा.

महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती २०१५-१६

राज्यभरातील ९ पोलीस आयुक्त (शहर), ६ जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण), ३ रेल्वे पोलीस अधीक्षक, २७ जिल्हा पोलीस अधीक्षक अणि १६ समादेशक राज्य राखीव पोलीस दल यांच्या आस्थापनांतर्गत पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, रेल्वे पोलीस शिपाई इ. पदांच्या भरतीसाठी एकाच वेळेला सर्व आस्थापनांनी जाहिरात दिली आहे. एकूण रिक्त पदांची संख्या- सुमारे ४,३००. वयोमर्यादा- उमेदवाराचे वय १८ ते २५ वष्रे. शैक्षणिक अर्हता- बारावी उत्तीर्ण. शारीरिक पात्रता- महिला- उंची १५५ सेंमी.  पुरुष- उंची १६५ सेंमी., छाती-  ७९-८४ सेंमी. परीक्षा शुल्क- खुला प्रवर्ग- ३२० रु. ऑनलाइन अर्ज व अधिक माहिती mahapolice-mahaonline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

निवड पद्धती – १) शारीरिक चाचणी- जे उमेदवार शारीरिक चाचणी ५० टक्के गुण मिळवून पूर्ण करतील त्यांच्यापकी प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या १:१५ या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात येईल.

२) लेखी चाचणी – १०० गुण. कालावधी- ९० मिनिटे; माध्यम- मराठी. उमेदवारांची शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये प्राप्त केलेले गुण एकत्रित करून गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. अर्ज- ऑनलाइन पद्धतीने अर्ज www.mahapolice.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर १८ फेब्रुवारी २०१६ पर्यंत सादर करावेत.

सीएसआयआरची राष्ट्रीय अर्हता चाचणी

कौन्सिल ऑफ सायंटिफिक अ‍ॅण्ड  इंडस्ट्रियल रिसर्चतर्फे ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि लेक्चरशिप निवडीसाठी १९ जून २०१६ रोजी पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता-  एमएस्सी/ बीई/ बी.फार्म./ एमबीबीएस किमान ५५ टक्के गुण (अजा/ अज/ पीएच/ व्हीएच यांना ५० टक्के गुण). ज्यांनी एमएस्सीसाठी प्रवेश घेतला आहे किंवा १०+२+३वष्रे वरील अभ्यासक्रमाअंतर्गत १ मार्च २०१६ रोजी पूर्ण केली आहेत अशा उमेदवारांना अर्ज करता येईल. निकालाच्या प्रतीक्षेत असणारे उमेदवारहीअर्ज करू शकतात.

वयोमर्यादा- ‘जेआरएफ’साठी- २८ वष्रे (अजा/ अज/ इमाव ३३ वष्रे). लेक्चरशिपसाठी वयोमर्यादा नाही. परीक्षा शुल्क- खुल्या गटासाठी- एक हजार रु., इतर मागास वर्गासाठी रु. ५००, अजा/अजसाठी- २५० रु. अर्ज ऑनलाइन पद्धतीने  www.csirhrdg.res.in या संकेतस्थळावर १ मार्च २०१६ पर्यंत करावा. मात्र परीक्षा शुल्क  २९ फेब्रु. २०१६ पर्यंत भरावे.

सुहास पाटील

 

जवाहरलाल नेहरू अ‍ॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिझाइन सेंटर, नागपूर येथे संशोधकांच्या २ जागा

उमेदवारांनी केमिकल, मेटॅलर्जी मटेरियल सायन्स विषयातील पदवी प्रथम श्रेणीसह अथवा या विषयातील पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. वयोमर्यादा ३५ वर्षे.

अधिक माहिती व अर्जाच्या नमुन्यासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.jnarddc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. विहित नमुन्यातील अर्ज असिस्टंट अ‍ॅडमिन ऑफिसर, जवाहरलाल नेहरू अ‍ॅल्युमिनियम रिसर्च डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड डिझाइन सेंटर, अमरावती मार्ग, वाडी, नागपूर- ४४००२३ या पत्त्यावर १७ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

नॅशनल प्रोजेक्ट कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लि. मध्ये मॅनेजमेंट ट्रेनी (सिव्हिल) च्या २५ जागा

उमेदवारांनी सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी परीक्षा चांगल्या शैक्षणिक आलेखासह उत्तीर्ण केलेली असावी व त्यांनी गेट २०१५ प्रवेश पात्रता परीक्षा दिलेली असावी. वयोमर्यादा २७ वर्षे.

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.upcc.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज जनरल मॅनेजर (एचआर), एनपीसीसी लिमिटेड, कॉर्पोरेट ऑफिस, प्लॉट नं. ६७-६८, सेक्टर- २५, फरिदाबाद १२१००४, हरियाणा या पत्त्यावर २२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

रेल लॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटीमध्ये कनिष्ठ कारकुनांसाठी ६ जागा

अधिक माहितीसाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी अथवा www.rida.indianrailways.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.  अर्ज रेल लॅण्ड डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी, सफदरजंग रेल्वे स्टेशनजवळ, मोती बाग-१, नवी दिल्ली- ११००२१ या पत्त्यावर

२२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

सशस्त्र सीमा बलमध्ये महिला स्टाफ नर्सच्या १५ जागा

अर्जदार महिला बारावी उत्तीर्ण व नर्सिगमधील पात्रताधारक असाव्यात. त्यांची नर्सिग कौन्सिलकडे नोंदणी झालेली असावी. त्या शारीरिकदृष्टय़ा पात्र असाव्यात. वयोमर्यादा ३० वर्षे.

अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या २३ ते २९ जानेवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. अर्ज असिस्टंट डायरेक्टर (रिक्रुटमेंट), फोर्स हेडक्वार्टर्स, सीमा सुरक्षा बल, ईस्ट ब्लॉक- ५, आर. के. पुरम, नवी दिल्ली- ११००६६ या पत्त्यावर २२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

इंडो-तिबेटन सीमा पोलीस दलात असिस्टंट कमांडंटच्या (इंजिनीअर)११ जागा

अर्जदार सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवीधर व शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. वयोमर्यादा- ३० वर्षे. www.recritment.itbpolic.nic.in या संकेतस्थळावर अधिक माहिती उपलब्ध आहे. विहित नमुन्यातील अर्ज कमांडंट (रिक्रुटमेंट), डायरेक्टोरेट जनरल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स, ब्लॉक-२, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर २२ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा- २०१६ अंतर्गत वनक्षेत्रपालाच्या ५५ जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेविषयीच्या अधिक माहितीसाठी प्रमुख वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली  जाहिरात पाहावी अथवा आयोगाच्या http://www.mpsc.gov.indIaY½FFmahaupsc.mahaonlive.gov.in या संकेतस्थळांना भेट देऊन संगणकीय पद्धतीने अर्ज करावेत.

हवाई दलात खेळाडूंसाठी संधी

उमेदवार बारावी उत्तीर्ण, शारीरिकदृष्टय़ा सक्षम असावेत. त्यांनी विविध क्रीडा प्रकारांत उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा २१ वर्षे. अर्जाचा नमुना व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ च्या ३० जानेवारी ते

५ फेब्रुवारी २०१६ च्या अंकातील जाहिरात पाहावी. विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज सेक्रेटरी, एअर फोर्स स्पोर्टस् कंट्रोल बोर्ड, एअर फोर्स स्टेशन, नवी दिल्ली, रेस कोर्स, नवी दिल्ली- ११०००३ या पत्त्यावर २१ फेब्रुवारी २०१६ पर्यंत पाठवावेत.

द. वा. आंबुलकर