*  मला कॉस्मालॉजिस्ट व्हायचे आहे. त्यासाठी कोणते अभ्यासक्रम शिकावे लागतील? कोणती चाळणी परीक्षा द्यावी लागेल का?

– विहंग पगारे

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
dd news new logo
“DD चं आता भगवीकरण झालंय”, लोगोचा रंग बदलल्यावरून माजी CEO चा हल्लाबोल; म्हणाले, “प्रसार नव्हे, प्रचार भारती!”
Vanchit Bahujan Aghadi s sarvjeet bansode said Nana Patole Will Be Most unhappy person If Nitin Gadkari Loses
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हरले तर सर्वात जास्त दुःख नाना पटोले यांना…, वंचितचे राज्य उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे यांचा टोला
lokmanas
लोकमानस: भाजपची हूल आणि गडी बाद

सर्वात आधी येथे कॉस्मॉलॉजी आणि कॉस्मेटॉलॉजी या शब्दांतला फरक लक्षात घ्यायला हवा. बऱ्याच जणांचा त्यात गोंधळ होतो. कॉस्मेटॉलॉजी ही सौदर्यशास्त्रातील एक शाखा आहेत. तर कॉस्मॉलॉजी ही अ‍ॅस्ट्रॉनॉमीची शाखा आहे. या क्षेत्रात येण्यासाठी तुला भौतिकशास्त्र, गणित, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, अ‍ॅस्ट्रोनॉमी किंवा एरोस्पेस इंजिनीअरिंग या विषयांमध्ये पदवी वा पदव्युत्तर पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना कॉस्मॉलॉजिस्ट म्हणून करिअरची सुरुवात करता येऊ  शकते. बेंगळुरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये अ‍ॅस्ट्रोनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये संशोधन करण्याची संधी मिळू शकते. प्रवेशासाठी चाळणी परीक्षा द्यावी लागते.

संपर्क – http://www.iisc.ac.in/

पुणे येथील इंटरयुनिव्हर्सिटी सेंटर फॉर अ‍ॅस्ट्रॉनॉमी अँड अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेत फिजिक्स, अ‍ॅस्ट्रॉनॉमी आणि अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि संशोधन अभ्यासक्रम करता येतो. त्यासाठीही चाळणी परीक्षा द्यावी लागते. संपर्क- http://www.iucaa.ernet.in

बेंगळुरु येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स या संस्थेत इंटिग्रेटेड एम.एस्सी-पीएचडी इन अ‍ॅस्ट्रोफिजिक्स हा अभ्यासक्रम करता येतो. संपर्क – http://www.iiap.res.in

*   मी दहावीची परीक्षा दिली आहे. मला थिआरॉटिकल अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट व्हायचे आहे. त्यासाठी मला कोणती परीक्षा द्यावी लागेल. जेईई किंवा सीईटी परीक्षा दिल्यास मला माझ्या उद्दिष्टापर्यंत पोहचता येईल का? मला नासामध्ये काम करायची इच्छा आहे. मी काय करू?

जतीन तलवडकर

जतीन, तू आधी उत्तम गुणांनी बारावी उत्तीर्ण हो. जेईई मेन आणि जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवून इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स किंवा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेतील अभ्यासक्रमांना प्रवेश मिळव. तुझ्या स्वप्नपूर्तीची दिशा तुला या संस्थांमध्ये अभ्यासक्रम करताना मिळू शकेल.

तुमचे अभ्यासक्रम अथवा करिअरसंबंधीचे प्रश्न

career.vruttant@expressindia.com  या पत्त्यावर पाठवा.