कोकमचा उपयोग खूप पूर्वीपासून आहारीय पदार्थाबरोबरच औषधी म्हणूनही करतात. आमटी, भाजीत याचा उपयोग केला जातो. तर अनेक आजार बरे करण्यासाठी औषध म्हणूनही याचा वापर केला जातो. कोकमला मराठीत आमसूल तर संस्कृतमध्ये साराम्ल, इंग्रजीमध्ये कोकम तर शास्त्रीय भाषेत गार्सिनिया इंडिकाया नावाने ओळखले जाऊन कोकम ही वनस्पती गटिफेरी या कुळातील आहे. याची झाडे केरळ, कर्नाटक व कोकणामध्ये पुष्कळ प्रमाणात असतात. याचे फळ जांभळट लाल रंगाचे असते. हे फळ सुकल्यानंतरच त्याचा कोकम किंवा आमसूल म्हणून वापर करतात. याच फळांचा रस काढून त्याचे सरबत, सोलकढी बनविली जाते. कोकमच्या बीमधून तेलही काढले जाते. हेच तेल खाण्यासाठी व औषध म्हणूनही वापरतात.
औषधी गुणधर्म
कोकममध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, प्रथिने, तंतूमय पदार्थ व क जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार कोकम हे रक्तपित्तशामक, दीपक, पाचक व ग्राही गुणधर्माचे आहे. कोकमची साल स्तंभन कार्य करते तर बीयांचे तेल स्तंभन व व्रणरोपक आहे.
उपयोग
० चरकाचार्याच्या मते चिंचेपेक्षा कोकम हे जास्त औषधी गुणधर्मयुक्त व शरीरास गुणकारी आहे.
० कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते.
० कोकममध्ये पाणी घालून त्याचा कल्क बनवावा व हा कल्क पाण्यात टाकून त्यात वेलची, खडीसाखर घालून सरबत बनवावे. हे सरबत प्यायल्याने आम्लपित्त, दाह, तृष्णा, उष्णतेचे विकार दूर होतात.
० कोकमचा कल्क, नारळाचे दूध, कोिथबीर व थोडे ताक एकत्र करून त्याची सोलकढी बनवून जेवणासोबत प्यावी. यामुळे घेतलेल्या अन्नांचे पचन व्यवस्थित होते.
० अतिसार, संग्रहिणी आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकमच्या कुस्करुन गाळलेले पाणी प्यावे.
० अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा कल्क संपूर्ण अंगास लावावा.
० पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा.
० हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे. यामुळे उष्णता कमी होऊन दाह कमी होतो.
० हिवाळ्यात थंडीमुळे जर ओठ फुटत असतील तर कोकमचे तेल कोमट करून ओठांवर लावावे. ओठ मऊ होतात.
० हिवाळ्यामध्ये शरीराची त्वचा कोरडी होऊन भेगा पडत असतील तर कोकमचे तेल गरम करून शरीरावर चोळल्यास भेगा नाहीशा होतात.
० रोजच्या आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास अरुची, आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होऊन आहाराचे पचन चांगले होते.
० कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो.
० कोकमचा उपयोग नियमितपणे आहारात केल्याने आतडे कार्यक्षम होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
० १० तोळे कोकम पाण्यात भिजत घालावे. नंतर ते कोकम पाण्यात कुस्करून ते पाणी गाळून घ्यावे व त्यात जिरेपूड, साखर घालून ते पाणी प्यायले असता शरीरावर आलेले शीतपित्त दूर होते.
० मूळव्याधीचा त्रास होत असेल व त्यातून रक्त पडत असेल तर कोकमचा कल्क दह्य़ावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी. यामुळे रक्त पडणे बंद होते.
डॉ. शारदा महांडुळे sharda.mahandule@gmail.com

Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
kairi curry recipe in marathi
Recipe : हिरव्यागार कैऱ्यांचे आंबटगोड सार; कसे बनवायचे पाहा कृती अन् प्रमाण