मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भारतीय उद्योजक रजत गुप्ता हे मायदेशी पलायन करण्याची शक्यता गृहीत धरून त्यांचा जामीन अर्ज फेटाळावा, अशी मागणी येथील सरकारी वकिलांनी न्यायालयाला केली आहे.
वॉल स्ट्रीट शेअर बाजारात इनसायडर घोटाळा केल्याप्रकरणी ६३ वर्षीय गुप्ता यांना प्राथमिक न्यायालयाने दोन वर्षांचा कारावास सुनावला असून आठ जानेवारीला त्यांना अटक होणार आहे. मात्र या निर्णयाला गुप्ता यांनी सेकंड सर्किट कोर्टात आव्हान दिले असून या निर्णयाला स्थगिती द्यावी व जामिनावर मुक्त राहाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली आहे. सरकारी वकिलांनी मात्र गुप्ता यांच्या या याचिकेस कडाडून विरोध केला आहे. भारतात गुप्ता यांचा मोठा परिवार, मित्रमंडळी व मालमत्ता असल्याने अटकेची परिस्थिती निर्माण झाल्यास ते मायदेशी पलायन करण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून त्यांचा हा अर्ज फेटाळावा, असे वकिलांनी म्हटले आहे. गुप्ता यांच्या पलायनाची शक्यता गृहीत धरूनच त्यांना एक कोटी अमेरिकी डॉलरचा बाँड लिहून देण्याचा आदेश कनिष्ठ न्यायालयाने दिला आहे, याकडे या वकिलांनी लक्ष वेधले.
कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यास आठ जानेवारीला अटक झाल्यानंतर गुप्ता यांचे पारपत्रही सरकारदरबारी जमा होणार आहे.



















युनियन कार्बाइड च्या संचालकाला पळून जाण्यास मदत करणाऱ्या राजीव गांधीच्या कुटुंबियांचेच सरकार आहे सत्तेत. आता त्यांनी अमेरिकन सरकारला सांगावे कि आम्ही सहकार्य केले तसे तुम्ही आता करा व रजत गुप्ताला भारतात पाळण्यास मदत करा. पाहू अमेरिका असे करते का? जर केले तर करा त्याचा भारतात बोलावून सरकार व द्या त्याला अर्थशास्त्री म्हणून पदवी आहे काय नि नाही काय? आम्ही आहोतच म्हणायला कॉंग्रेस का हात आम आदमी के साथ.