जागतिक पातळीवर हरितगृह वायूंचे उत्सर्जन हे १९९० च्या दशकाच्या तुलनेत तीन पटींनी वाढले असून इ.स. २१०० पर्यंत ४ ते ६ अंशांनी तपमानवाढ होणार आहे, असा इशारा ऑस्ट्रेलियातील एका वैज्ञानिकाने दिला आहे. पेप कॅनडेल यांनी लिहिलेल्या शोधनिबंधात असे म्हटले आहे, की २०१२ मध्ये हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले आहे.  जीवाश्म इंधनाच्या वापरामुळे ३६ अब्ज टन इतके हरितगृह वायू वातावरणात सोडले गेले आहेत. प्रमाण १९९०च्या दशकाचा विचार करता ५८ टक्के आहे व तुलनेने ही वाढ तीन पटींनी अधिक आहे.  कॅनडेल यांच्या मते हरितगृह वायूंच्या उत्सर्जनातील वाढीत ८० टक्के वाटा हा चीनचा आहे उर्वरित वाटा हा  विकसित देशांचा आहे. विकसनशील देशांचा क्रमांक खूप खाली आहे.