मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- 'एलबीटी' संदर्भात व्यापा-यांची बैठक
- सीमा तपासणी नाक्यांमुळे राज्याच्या महसूल उत्पन्नात वाढ होणार- मुख्यमंत्री
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कर्नाटक सरकारला तामिळनाडूला दोन दशलक्ष घनमीटर (२ टीएमसी) पाणी देण्याचे निर्देश दिले. याबरोबरच या दोन राज्यांना पाण्याची किती आवश्यकता आहे, याबाबतचा अहवाल सादर करावा, असे आदेश केंद्रीय जल आयोगाला देण्यात आले आहेत.
याबाबत न्या. आर. एम. लोढा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्रीय जल आयोगाला तीनसदस्यीय तज्ज्ञ समितीची स्थापना करून पुढील दोन दिवसांत या समितीकडून या दोनही राज्यांना भेट देऊन आपला अहवाल सादर करण्यास सांगावे, असे बजावले आहे.
दरम्यान, तामिळनाडू पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने दोन टीएमसी पाणी देण्याचे आदेश खंडपीठाने कर्नाटकला दिले आहेत.
तामिळनाडूने कर्नाटककडून १२ टीएमसी पाणी देण्यासाठी याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना खंडपीठाने हे आदेश दिले असून या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. तज्ज्ञ समितीचा याबाबतचा अहवाल काहीही असला तरी कर्नाटकला तामिळनाडूला दोन टीएमसी पाणी द्यायचे निर्देश देण्यात आले आहेत.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















