सामूहिक बलात्कार झालेल्या एका दलित महिलेने पेटवून घेतल्याची घटना सोमवारी येथे घडली, त्यानंतर सिकंदारू भागात या महिलेच्या कुटुंबीयांनी व बसपा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. इटवाह येथे जसवंत नगर वसाहतीत राहणाऱ्या या महिलेचे अपहरण करून १२ जुलैला तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता, सोमवारी तिने पेटवून आत्महत्या केली.
पोलिसांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन देत निदर्शकांवर लाठीमार केला. बसपा कार्यकर्त्यांनी व या महिलेच्या कुटुंबीयांनी सिकंदारू-इटाह रस्ता रोखून आंदोलन केले. काही आंदोलकांनी दगडफेक केली. त्यात वाहनांचे नुकसान झाले. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी उदयराम यांच्या गाडीचेही नुकसान झाले, नंतर पोलिसांनी लाठीमार केला.
या महिलेने मृत्युपूर्व जबानी दिली असून तिने काही आरोपींची नावे सांगितली होती, त्यांची ओळख पटली असून त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक दीपिका तिवारी यांनी सांगितले.