दुचाकी, मोटारसायकल आणि बाइक या तीनही शब्दांकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळाच असतो. इच्छाधारी प्रवासाची सखी, असं फार तर तिला म्हणता येईल. म्हणजे कधीही, कुठेही आणि कशीही दामटवण्याचे वाहन म्हणून सोयीची. दुचाकीकडे पाहण्याचा हा तसा संकुचित दृष्टिकोन. अनेकांकडे तसा तो असतो. याउलट अनेकांच्या डोक्यात ती प्रवासापलीकडली असते. समोर निर्मनुष्य रस्ता आहे. डोक्यात वेग भरर..फटफट करीत दबा धरून बसलाय.. क्षणार्धात हॅण्डलवरील मुठी आवळल्या जातात आणि मग इलेक्ट्रिक किकने आरंभ झाला की, लवलेली पापणी, टॉप गीअर..आणि टॉपस्पीड यांचे भन्नाट कॉम्बिनेशन जुळून येते. ही निव्वळ कल्पनेत रंगवण्याचीच चीज नाही. शहर, गावातील कानाकोपऱ्यात कुठे तरी एखादा वेगवेडा इम्पोर्टेड बाइकवर मांड ठोकण्यासाठी इच्छुक असतोच. म्हणून काही कंपन्यांनी आपल्या इनोव्हेशनमधून ती इच्छा पूर्ण करण्याची संधी दारात आणून ठेवलीय.

17होंडा
होंडा गोल्ड िवग एफ 6बी (२०१५) ही दोन चाकांवरील क्रुझर अत्याधुनिक वैशिष्टय़ांसह तयार केली आहे. यासाठी ती इतरांच्या एक वर्षांने पुढे आहे.
 निळा मेटॅलिक रंग धारण केलेल्या या बाईकच्या इंजिनची क्षमता १८३२ सीसी.
 संगणक नियंत्रित डिजिटल थ्रीडी मॅिपग यंत्रणा. अ‍ॅप्पल आयपॉड म्युझिक प्लेअर. यूएसबी फ्लॅश एमपी-थ्री
 स्टॅण्डर्ड आणि डिलक्स या दोन्ही गटांत बांधणी, पॅसेंजर बॅकरेस्ट सीट, सेंटर स्टॅण्ड, स्वयंचलित वळण सिग्नल.
 प्रत्येकी दोन व्हॉल्व्हसह सहा सििलडर इंधनधारित इंजिन आणि त्याला पाच गिअर्सची साथ.
 तिसऱ्या गिअरनंतर वेगसातत्य कायम ठेवण्यासाठी गिअरबॉक्समध्ये ओव्हरड्राइव्ह तंत्राची जोड.
 चौखूर उधळल्यानंतर नियंत्रण मिळविण्यासाठी मागील आणि पुढील चाकांना २९६ मिमी. डिस्क ब्रेक.
 रिमोट कंट्रोलवरील आवश्यकतेप्रमाणे सस्पेन्शन, टचस्क्रीन.

18हल्रे डेव्हिडसन- सॉफ्टटेल डिलक्स

  १५८५ सीसी इंजिन, दुहेरी चेन खेचणारे  ट्विन कॅम इंजिन. ५ लिटर इंधनावर साधारण दरताशी १०० किलोमीटर  इतके मायलेज.
 डिलक्स गटातील कूल मोटारसायकल
 कमी उंची, अरुंद आसन, मागे कललेला हॅण्डलबार, अ‍ॅण्टी लॉक ब्रेक्स.
 स्टील फोक्स चाके. एकात्मिक सामान रॅक

20बीएमडब्ल्यू के – १६०० जीटीएल
भव्य, आरामदायी आणि शक्तिशाली अशी तीन वैशिष्टय़ांसह बाजारात आलेली बीएमडब्ल्यूची बाइक अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. सहलीनिमित्त बाहेर पडण्यास काहीच हरकत नाही.
 १६४९ सीसी क्षमतेचे इंजिन, सहा गिअरची क्षमता, वॉटरकूल तंत्रज्ञान
 ६ सििलडरच्या साहाय्याने इंजिनला इंधनपुरवठा, इंजिनला चार व्हॉल्व्हची जोड.
 टॉप गिअरवर ताशी वेग १२५ किलोमीटर.
 डिजिटल इंजिन व्यवस्थापन, दुरुस्तीची आवश्यकता नसलेली बॅटरी.
 पुढील आणि मागील चाकांना डिस्क ब्रेक.

19डीएसके -बेनेली
बेनेली टीएनटी ६०० व टीएनटी ८०० ही डीएसके समूहाने भारतात सुरू केलेली इटालियन कंपनीची पहिली मोटारसायकल आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये या बाइकसाठी शोरूम उपलब्ध आहेत.
 २५० ते ३०० सीसी इंजिन                                                                                                  
 स्पोर्ट्स टूर आणि रोड फायटर या दोन वैशिष्टय़ांसह
 या दोन गटातील बाइकची इंजिन क्षमता ६०० सीसी.
 तिहेरी सििलडरमधून इंधनपुरवठा. पिक-अप क्षमता अधिक.
 सहा गिअर  आणि स्लीपर क्लच.

21सुझुकी बोलेवार्ड सी-९०
 क्लासिक गटातील आजवरची सर्वात आकर्षक बाइक
 ग्रिप हॅण्डलबार, काळ्या रंगाची अलॉय व्हिल, एक्सॉस्ट यंत्रणा, रुंद टायर
 १४६२ सीसी इंजिन, लिक्विड कूल गिअर बॉक्स तंत्र.
 ५ गिअरवरील दुहेरी इंजिन, टॉप गिअरवरील ताशी वेग.

22यामाहा पीडब्ल्यू-५०
वजनाला अत्यंत हलकी पण कोणत्याही रस्त्यावर हरणासारखी धावणारी आणि स्पोìटगचा आनंद देणारी यामाहाची यंदाची नवी बाइक आहे.
 ४९ सीसी इंजिन, दोन गिअर क्षमता. सेन्ट्रिफ्युगल  ट्रान्समिशन नियंत्रण
 टेलिस्कोपिक शॉकअ‍ॅब्झॉर्बर
 अधिक खडबडीत टायरमुळे निसरडय़ा रस्त्यांवरही सुरक्षा

इतक्या साऱ्या अत्याधुनिक वैशिष्टय़ांनी सिद्ध करण्यात आलेल्या अनेक बाइक रस्त्यावर दौडवल्या जातील, तेव्हा कंपनीने संकेतस्थळावर दिलेल्या अचूक वर्णनानुसार त्या चालतीलच असं नाही, अशी एक सूचनाही करण्यात आली आहे. बाइक चालविण्याची पद्धत, वाहनाची काळजी, हवामान, रस्त्यांची स्थिती, चाकांवरील दाब, बाइकवर लादलेले वजन, याशिवाय बाइकस्वाराच्या शरीराचे वजन आणि इतर अनेक गोष्टींवर बाइकचा वेग आणि कार्यक्षमता अवलंबून असते.